एक काळ असा होता जेव्हा सर्वत्र नाना पाटेकर आणि मनीषा कोईरालाच्या अफेअरची चर्चा असायची. दोघे देखील एमकेकांवर खूप प्रेम करायचे. पण जेव्हा मनीषा कोईरालाने नाना पाटेकरांना एका अभिनेत्रीसोबत खोलीत रंगेहात पकडलं तेव्हा दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आणि दोघे कायमचे दूर झाले. कोण होती ती अभिनेत्री? कशी होती नानांची लव्हस्टोरी वाचा..
असं तुटलं नाना आणि मनीषाचं नातं-
नाना नेहमीच वादात अडकलेले असायचे. लव्ह अफेअरच्या बाबतीत देखील नाना पाटेकर अनेकदा अडचणीत सापडलेले आहेत. या दोघांची प्रेमकहाणी देखील एका विवादामुळेच संपली. नाना आणि मनिषाने ‘खामोशी द म्यूजिकल’, ‘अग्निसाक्षी’ ‘युगपुरुष’ या सिनेमात सोबत काम केलं. २१ वर्षांनी लहान असलेल्या मनीषा कोईरालाच्या प्रेमात नाना पडले होते.
सोबत काम करताना मनीषाला देखील नानांवर प्रेम झालं. दोघांचं अफेअर चांगलंच चर्चेत आलं होतं. विशेष म्हणजे तेव्हा नाना पाटेकर यांचं लग्न झालेलं होतं. पण त्यांची पत्नी नीलाकांति आणि त्यांच्यात सर्वकाही आलबेल नव्हतं. तेव्हा पत्नी वेगळी राहत होती असे म्हंटले जाते. ‘खामोशी द म्यूजिकल’ दरम्यान नाना मनीषाच्या प्रेमात पडले. या सिनेमात त्यांनी तिच्या वडिलांची भूमिका केली होती.
दोघांची मैत्री या सिनेमातून वाढली आणि दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. नाना मनीषाच्या बाबतीत एवढी पजेसिव्ह होते कि जेव्हा मनीषा सेटवर छोटे कपडे घालून यायची तेव्हा ते तिथेच तिला ओरडायचे. मनीषाला नानासोबत लग्न करायचं होतं. पण नाना आपल्या पत्नीला घटस्फोट देऊ इच्छित नव्हते.
या अभिनेत्रीसोबत रंगेहात सापडले होते नाना-
नाना पाटेकर आणि मनीषा कोईरालाचे नाते तुटण्याचे कारण अभिनेत्री आयशा जुल्का होती. बोलले जाते कि मनिषाने नाना आणि आयशाला एका खोलीत पकडले होते. मनीषा तेव्हा दोघांना बघून चांगलीच भडकली होती. या घटनेनंतर दोघांमध्ये कटुता निर्माण झाली. नानांवर ती पत्नीसोबत घटस्फोट घेऊन लग्न करण्यासाठी दबाव टाकायला लागली.
नाना पत्नीपासून दुर होऊ इच्छित नव्हते. नानाच्या वागण्याने मात्र मनीषाचं मन दुखावलं. त्यानंतर तिने कायमचंच नानापासून दूर जाणे पसंत केले. पुढे आयशा आणि नाना पाटेकर यांचं देखील नातं तुटलं. २००३ मध्ये नाना आणि आयशाने ‘आंच’ मध्ये काम केलं.
आयशा देखील नानापेक्षा २४ वर्षांनी छोटी होती. बो ल्ड सीनमुळे दोघांमध्ये जवळीक वाढली आणि ते प्रेमात पडले. पुढे दोघे लिव्ह इन मध्ये देखील राहिले. अनेक वर्ष नात्यात राहिल्यानंतर नाना जेव्हा आयशाला स्टेजवर ओरडले आणि तिचा अपमान केला तेव्हा आयशा देखील त्यांना सोडून गेली.