सध्या राज्यभरात MPSC च्या परीक्षावरून राज्यभरात गदारोळ निर्माण झाला आहे. २ दिवसावर आलेली MPSC ची परीक्षा अचानक रद्द केल्याने मोठ्या प्रमाणात विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेत राज्यभरात तीव्र आंदोलन केले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ ऍक्शनमध्ये येत MPSC ची नवीन तारीख जाहीर केली.
याच गदारोळादरम्यान एका MPSC च्या विद्यार्थ्यांचे ट्विट सध्या जोरात चर्चेत आले आहे. या तरुणाने MPSC ची परीक्षा तर पास केली मात्र त्याला अद्यापही नियुक्ती मिळालेली नाहीये.
या विद्यार्थ्याचे नाव आहे प्रवीण कोटकर. प्रवीणने एमपीएससीमधून परीक्षा उत्तीर्ण केली असून त्याची ना. तहसीलदार म्हणून निवड झाली. मात्र दहा महिने उलटले तरी त्याला अद्याप नियुक्ती मिळाली नाहीये. त्यामुळे प्रविनवर सध्या मजुरी करण्याची वेळ आली आहे.
राज्यात एमपीएससीच्या कारभारावरून सर्वत्र चर्चा सुरु झाल्यानंतर प्रवीणने ट्विट करून आपल्या व्यथा मांडल्या आहेत. प्रवीण कोटकर ट्विटमध्ये म्हणाला की, MPSC मधून माझी ना. तहसीलदार म्हणून निवड झाली. मात्र १० महिने झाले तरी सरकारने नियुक्ती दिलेी नाही. त्यामुळे सध्या मी शेतमजूर म्हणून काम करतोय. लोकं आम्हाला हसतात आणि सरकरला शिव्या देतात. नियुक्ती कधी मिळणार?
MPSC मधून माझी ना. तहसीलदार म्हणून निवड झाली.10 महिने झाले तरी सरकारने नियुक्ती दिली नाही. सध्या शेतमजूर म्हणून काम करतोय.लोकं आम्हाला हसतात आणि सरकरला शिव्या देतात. नियुक्ती कधी ?
#MPSC_2019_Joining @AjitPawarSpeaks@CMOMaharashtra @Dev_Fadnavis@OfficeofUT @waglenikhil— Pravin Kotkar (@pravinrkotkar) March 11, 2021
MPSC पास झालेले अनेक असे तरुण आहेत जे सध्या नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. या तरुणांनी प्रचंड मेहनत घेऊन यश मिळवले खरे मात्र त्यांच्या आयुष्यातील संघर्ष काही अजून संपलेला नाहीये.
१४ मार्चची पूर्वपरीक्षा रद्द केल्यानंतर पुण्यासह राज्यभरातील विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. राज्यसेवा पूर्व परीक्षा आता २१ मार्च रोजी आयोजित करण्यात येणार असून आयोगाकडून परिपत्रक जारी करण्यात आले आहे.