दामोदरदास मूळचंद मोदी या वडनगरच्या चहा विक्रेत्याला १७ सप्टेंबर १९५० रोजी तिसरे अपत्य झाले. या मुलाचे नाव ठेवले नरेंद्र. हिराबेन आणि दामोदरदास याना ६ अपत्य होती. नरेंद्र बालपणीच वडिलांना वडनगर रेल्वेस्थानकात चहा विकण्यास मदत करायला लागला. पुढे त्यांनी भावासोबत बस स्टॅन्डजवळ चहाची टपरी देखील टाकली.
नरेंद्र मोदी यांचे शालेय शिक्षण वडनगर मधेच झाले. १९६७ मध्ये त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केलं. मेहसाणा जिल्ह्यातील वडनगरचे मोठं ऐतिहासिक महत्त्व आहे. कुटुंबाच्या रूढीपरंपरानुसार नरेंद्र मोदी यांचे बालपणीच लग्न झाले होते. जशोदाबेन या मुलीशी त्यांचं लग्न झालं होतं. पण हे जोडपे लवकरच वेगळे राहू लागले. त्यामुळे नरेंद्र आणि जशोदाबेन यांनी संसार केलाच नाही.
शाळेनंतर नरेंद्र मोदी यांनी संघात प्रवेश घेतला होता. नरेंद्र मोदींच्या कुटुंबात एक संत आले होते आणि त्यांनी मोदींची पत्रिका बघून सांगितले होते की हा मुलगा मोठा होऊन संत किंवा महान नेता बनेल. नरेंद्र मोदी हे NCC चे कॅडेट देखील होते. त्यांच्या गावातील शाळेत ते कॅडेट म्हणून काम करायचे. NCC चे कॅडेट असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिस्तीचे पालन खूप काटेकोरपणे करावे लागते.
नरेंद्र कॅडेट असताना त्यांच्यासोबत एक किस्सा घडला होता. जो त्यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होता. NCC च्या कॅडेटनी शिस्त मोडली किंवा काही चुकीचे केलं कि शिक्षा मिळायची. पण नरेंद्र मात्र नेहमीच एक चांगले कॅडेट होते. ते शिस्तीचे तंतोतंत पालन करायचे. पण एकदा मात्र एक गैरसमज झाला होता ज्यामुळे सर्वाना वाटले आता नरेंद्रला शिक्षा मिळणार.
नरेंद्र हे NCC च्या कॅम्प मध्ये अचानक एका झाडावर चढले. सर्वाना वाटले कि आता झाडावर चढणे म्हणजे नियमांचा भंग झाला. आता नरेंद्रला शिक्षा मिळणार. पण नरेंद्र हा झाडावर असच कारण नसताना चढला नव्हता. तो एका चांगल्या कामासाठी झाडावर चढला होता. नरेंद्रला त्या झाडावर एक पक्षी पतंगाच्या दोऱ्यामध्ये अडकलेला दिसला. तो पक्षी तडफडत होता. नरेंद्रने झाडावर चढण्यास बंदी असताना देखील कुठलाही विचार न करता झाडावर चढून त्या पक्षाला पतंगाच्या दोऱ्यातून काढले.
नरेंद्रला देखील झाडावरून उतरताना वाटले कि आता शिक्षा मिळेल. पण खाली उतरल्यावर मात्र उलटंच झालं. नरेंद्रची सर्व जण वाहवा करायला लागले. शिक्षेऐवजी सर्वानी स्तुती केली. कारण त्यांनी एक खूप चांगलं काम केलं होतं. नरेंद्र मोदी यांचं जीवन बालपणापासूनच खूप शिस्तप्रिय आहेत. कोणताही ऋतू असो ते सकाळी ५-५.३० दरम्यान उठतात. मग रात्री उशीर झाला तरी ते वेळ बदलत नाहीत.
मोदींना बालपणापासून सैन्यात जाण्याची आवड होती. त्यांना जामनगर जवळ असलेल्या सैनिकी शाळेत शिकायचं होतं. पण तेव्हा कुटुंबाची त्या शाळेत फीस भरण्यासारखी परिस्थिती नव्हती. लहानपानपासूनच ते सैनिकींना किंवा इतर गरजूंच्या सेवा करण्यासाठी पुढे असायचे.