देशात सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. तरीही देशात विविध राज्यात निवडणुका असल्याने सध्या प्रचाराच्या सभांचा धडाका सुरु आहे. महाराष्ट्रातही पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे. तर पश्चिम बंगाल सह इतरही ४ राज्यात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकांसोबत सध्या एका पोटनिवडणुकीची सर्वत्र चर्चा आहे. ती म्हणजे बेळगावची लोकसभा पोटनिवडणूक.
सलग ४ वेळा बेळगावचे खासदार राहिलेले केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं काही महिन्यांपूर्वी कोरोनाने निधन झालं होतं. या निवडणुकीत भाजपने त्यांच्या पत्नी मंगला अंगडी यांना तिकीट दिलं आहे. मंगला अंगडी या सहज विजयी होतील असे सुरुवातीला वाटत होते पण त्यांच्यासमोर तगडे आव्हान उभे केले आहे अवघ्या २६ वर्षाच्या एका मराठी तरुणाने. जाणून घेऊया कोण आहे तो तरुण.
मागील ६२ वर्षांपासून बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीचा ल ढा सुरु आहे. भाषावार प्रांतरचना झाल्यानंतर बेळगावसह सीमाभाग मराठी भाषिकांचे प्राबल्य असूनही कर्नाटकात डां बला गेला. तेव्हा महाराष्ट्र एकीकरण समितीची स्थापना करून सीमा ल ढ्याला प्रारंभ करण्यात आला. महाराष्ट्र एकीकरण समिती खूप ताकतीने संघर्ष करून हा ल ढा ल ढवत आहे. बेळगाव मध्ये समितीचे आतापर्यत अनेक आमदार देखील निवडून आले आहेत. याच महाराष्ट्र एकीकरण समितीने लोकसभा पोटनिवडणुकीत शुभम शेळके या २६ वर्षाच्या तरुणाला संधी दिली आहे.
१ नोव्हेंबर रोजी कर्नाटक राज्याची निर्मिती झाली होती. हा दिवस येथील सरकारकडून आनंदोत्सवात साजरा केला जातो. तर महाराष्ट्र एकीकरण समितीकडून हा काळा दिवस पाळला जातो. बेळगावसह कर्नाटकात सीमाभागात असलेल्या मराठी माणसाला कानडी लोकांनी नेहमीच त्रा स दिला आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती मात्र मजबुतीने आपला ल ढा ल ढवत आहे. त्यांनी कानडींच्या त्रा साला कधी जुमानले नाही. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचा शुभम शेळके हा अध्यक्ष आहे. शुभमने खूप कमी वयातच समितीत काम चालू केले. त्याच्या नावावर आजपर्यंत अनेक खोट्या के स कर्नाटक पोलिसांनी टाकलेल्या आहेत. मराठी माणसाच्या हक्कासाठी शुभमही के स अंगावर घ्यायला जुमानत नाही.
शुभम शेळकेच्या प्रचारासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस देखील मैदानात उतरली आहे. शिवसेनेचे हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने हे बेळगावात तळ ठोकून आहेत. तर खासदार संजय राऊत यांनी देखील शुभमसाठी प्रचारसभा आणि रॅली घेतली. तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे देखील प्रचारासाठी बेळगावात आहेत. त्यांच्याआधी राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी देखील प्रचारसभा घेतल्या.
येथे भाजप, काँग्रेस आणि महाराष्ट्र एकीकरण समिती अशी तिरंगी लढत होत आहे. उद्या १७ तारखेला मतदान पार पडणार असून २ मे रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. भाजपकडून मंगला सुरेश अंगडी, काँग्रेसकडून यमकणमर्डीचे आमदार सतिश जारकिहोळी तर महाराष्ट्र एकीकरण समितीकडून शुभम शेळके मैदानात आहेत. या लोकसभा मतदारसंघातील ८ तालुक्यात ६ भाजपचे तर २ काँग्रेसचे आमदार आहेत. मराठी भाषिकांचा शुभमला खूप मोठा पाठिंबा मिळत असल्याचे सध्या चित्र आहे. मराठा समाज या मतदार संघात मोठ्या प्रमाणात असून त्यांचा शुभमला भरघोष पाठिंबा आहे. मराठी भाषिकांनीही शुभमला भरघोष साथ दिल्यास येथे उलटफेर होऊ शकतात.
दरम्यान भाजपच्या उमेदवारासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल हिंडलगा येथे प्रचारसभा घेतली. याआधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची सभा येथे होणार होती. संजय राऊत यांनी बेळगावात पत्रकार परिषद घेत भाजप नेते आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना बेळगावात प्रचारास न येण्याचे आवाहन केले होते. नितीन गडकरी हे मोठे नेते आहेत. ते केवळ विदर्भाचे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे नेते आहेत. त्यामुळे नितीन गडकरी यांनी बेळगावातील लोकसभा पोटनिवडणुकीत मराठी उमेदवाराविरोधात प्रचार करण्याची बेईमानी करु नये, असे संजय राऊत यांनी म्हंटले होते. त्यानंतर गडकरींची येथील सभा रद्द झाली. संजय राऊत यांच्या सभेआधी कानडी प्रशासनाने साऊंड स्पिकर्ससह व्यासपीठाची मो डतोड केल्याने मोठा त णाव तिथे निर्माण झाला होता.
शुभम विक्रांत शेळके हा खूप सर्वसामान्य घरातील तरुण आहे. त्याचा फॉर्म हा एकीकरण समितीने भरला तर त्याचे डिपॉजिट देखील एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी पैसे गोळा करून भरले आहे. शुभम हा लहानपणीपासून सीमाप्रश्नाचा ल ढा जवळून बघत आहे. शुभमचे दहावीपर्यंत शिक्षण झाले असून तो युवासेनेच्या माध्यमातून सुरुवातीला काम करत होता. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला शुभम आज या चळवळीतील महत्वाचा घटक बनला आहे. कार्यकर्ते स्वतः पैसे जमा करून या निवडणुकीत प्रचार करत आहेत. या निवडणुकीत शुभमला विजय मिळून समितीच्या लढ्याला बळ मिळेल अशा शुभेच्छा देऊया.