‘पति-पत्नी और वो’ हे आजकाल काही नवीन नाही राहीलं. अनेकदा आपण याबद्दल ऐकलं असेल. मध्यप्रदेशातील भोपाळ मध्ये अशीच एक घटना घडली आहे. पण हि घटना थोडी विचित्र आहे आणि यावर तुमचा विश्वास बसणार नाही.
कारण येथिल एका महिलेनं आपल्या पतीचे लग्न प्रेयसीशी लावून दिलं आहे. ते हि लग्नानंतर थोड्या थोडक्या दिवसानंतर नाही तर लग्नाला तब्बल तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर. ज्या महिलेनं आपल्या पतीचं प्रेयसीशी लग्न लावून दिलं आहे तिच्या पतीचे त्याच्या प्रेयसीशी जवळपास १ वर्षांपासून संबंध होते. कौटुंबिक कोर्टाचे वकील रजनी रजानी यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी एक दाम्पत्य समुपदेशनासाठी त्यांच्याकडे आले होते.
त्या व्यक्तीने सांगितले की, ”आमचे लग्न तीन वर्षांपूर्वी झाले आहेत. परंतु गेल्या एका वर्षापासून त्याचे एका मैत्रिणीशी प्रेमसंबंध आहेत. हे प्रकरण इतके टोकाला पोहोचले की, विवाहित नसतानाही प्रेयसीने आत्म ह त्या करण्याचा प्रयत्न केला. काही दिवसांनी मला जाणवलं की, मी माझ्या प्रेयसीशिवाय राहू शकत नाही. मग मी काय करायला हवं? मला माझ्या पत्नीबाबत कोणतीही तक्रार नाही. ती नेहमीच मला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करते. माझ्या पत्नीला प्रेयसीसाठी सोडण्याची इच्छा अजिबात नाही. ”
कायद्याचा विचार केल्यास दोन महिलांसोबत राहणं अशक्य असल्याचं वकिल रजनी रजानी यांनी सांगितले. एवढेच नव्हे तर वकील रजनी यांनी दाम्पत्याचा संसार तुटू नये यासाठी त्या माणसाच्या प्रेयसीची समजूत काढली पण ती काही ऐकण्यास तयार नव्हती.
दुसर्याच दिवशी कौटुंबिक कोर्टाच्या वकिलाने त्या व्यक्तीला आणि त्याच्या पत्नीला बोलावून सल्ला दिला. यादरम्यान, पतीने काय हवे आहे ते पत्नीला सांगितल्यावरत्याची पत्नी दुखवली आणि ती रडू लागली.त्यानंतर पत्नीने पतीसोबत राहू शकत नसल्याचे सांगितले आणि स्वतःच घटस्फोट घेण्याचा निर्णय वकिलांना सांगितला. ती म्हणाली आम्ही आता एका छताखाली राहू शकत नाही.
पत्नीने कायद्याच्या नियमांचे पालन करत घटस्फोट घेण्याची माहिती दिली. त्या व्यक्तीच्या पत्नीने आत्मसन्मान म्हणून पतीने देऊ केलेले पैसे आणि प्रॉपर्टी देखील घेतली नाही. कोर्टात घटस्फोटाचा अर्ज दाखल करून पतीशी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्या व्यक्तीचे प्रेयसीशी लग्न होऊ शकले.