Monday , June 5 2023
Breaking News
Home / ठळक बातम्या / त्या एका कारणामुळे परमबीर आणि वाझेंना बळीचा बकरा बनवल्याची होतेय दबक्या आवाजात चर्चा!

त्या एका कारणामुळे परमबीर आणि वाझेंना बळीचा बकरा बनवल्याची होतेय दबक्या आवाजात चर्चा!

गेल्या महिन्याभरात मुंबई पोलिस आणि गृहमंत्रालयाचे नाव देशभरात चर्चेत आहे. अँटीलिया स्फो टक प्रकरण, मनसुख हिरन याचा मृत्यू, वाझेची अटक, परमबीर सिंह यांचे बिनबुडाचे आरोप असा सगळा गदारोळ चालू आहे. पण यात एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे वेळ आणि व्यक्ती. परमबीर सिंग आणि सचिन वाझे यांची टीआरपी स्क’म प्रकरण, अन्वय नाईक आत्म ह त्या प्रकरणात ज्या धडाक्यात कामगिरी सुरू होती. तसेच सुशांत सिंग रजपूत प्रकरणात त्यांचे काम ज्या पद्धतीने चालू होते ते पाहता काही दिवसात त्यांनी एकदम अशी विरोधात भूमिका का घेतली असेल अशी शंका येणे रास्त आहे.

माध्यमातील टीआरपी स्क’म मुंबई पोलिसांनी उजेडात आणून अनेकांचे बिंग फोडले होते. त्याच प्रमाणे अन्वय नाईक आत्मह त्या प्रकरणात वादग्रस्त अँकर अर्णब गोस्वामीला अटक देखील केली होती. टीआरपी स्क’ममध्ये पार्थो दासगुप्ता आणि अर्णबचे वादग्रस्त संवाद देखील सार्वजनिक झाले होते. अशी चर्चा आहे की, अन्वय नाईक प्रकरणात अटक झाली होती तेव्हा सचिन वाझे याने त्याची चांगलीच मानहानी केली होती ( काही जणांच्या मते अर्णबला मा रहाण देखील झाली होती ) या सगळ्या प्रकरणाचा बदला आता घेतला जात असल्याचे देखील बोलले जात आहे.

सचिन वाझेकडे अर्णबच्या व्हॉटसअप संवादमधील काही गोष्टी असून त्याचा काहीजणांना त्रास होवू शकतो. त्यामुळेच वाझे याला ऐनकेन प्रकरणी फसवण्यात आले असावे असे बोलले जाते. वाझे याने काही चुकीचे केले असेल तर त्याचा तपास करणे व शिक्षा देण्यासाठी मुंबई पोलिस, एटीएस सक्षम आहे. असे असताना दिल्लीतील काही जणांना हे असे नको होते. म्हणून त्यांनी या प्रकरणाचा तपास घाईघाईत एनआयएकडे दिला. या प्रकरणातील बारीकसारीक माहीती माध्यमांमध्ये पसरवून आपल्याला हवे तशी लोकभावना निर्माण केली जात आहे. अर्णबला अटक झाली त्यावेळपासून ‌वाझे भाजप आणि केंद्राच्या हिट लिस्टवर होता. काहीही करून त्याला धडा शिकवायचा असा चंग बांधला गेला होता की काय अशी शंका आता निर्माण होत आहे.

ज्याप्रमाणे वाझे काहीजणांच्या हिटलिस्टवर होता तसे परमबीर सिंह यांच्याबाबतीत मात्र नव्हते. २०१० मध्ये विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीस हे साध्वी प्रज्ञासिंग याचा छ ळ केला जात असल्याच्या कारणावरून परमबीर सिंह यांच्या निलंबनाची मागणी विधानसभेत करत होते. मात्र ते जेव्हा सत्तेत आले तेव्हा त्यांनी परमबीर सिंह यांच्यावर कारवाई न करता, त्यांना २०१५ मध्ये ठाणे शहराचे आयुक्त केले होते. तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना डावलून ही नेमणूक झाली होती.

त्यावेळी वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांनी याबाबत आपली नाराजी व्यक्त केली होती. तरी देखील परमबीर सिंह हे पदावर कायम राहिले आणि पुढे मुंबईचे आयुक्त देखील झाले. त्यामुळे त्यांचे व भाजपचे संबंध कडवट होते असे नाही. पण टीआरपी स्क’मनंतर त्याच्या पत्नीची एलआयसीच्या कंपनीतून झालेली तडकाफडकी उचलबागंडी, परमबीर सिंह यांच्या अंगरक्षकाची एनआयएकडून झालेली चौकशी यासर्वबाबी संशयास्पद दिसतात. वाझे, परमबीर सिंह यांना केंद्रातील काहीजणांनी जाणीवपूर्वक लक्ष बनवले की चौकशीच्या सिसेमिरा टाळण्यासाठी या दोघांनी दिल्लीसमोर शरणागती पत्करली हा आता खरा मुद्दा आहे.

About Mamun

Check Also

रंगा-बिल्ला या गुंडांची इतकी दहशत होती की देशाचे प्रधानमंत्रीही तणावाखाली आले होते

रंगा-बिल्ला ही नावं आपण अनेकदा कुठे ना कुठे वाचली असतील. हिंदी किंवा मराठी चित्रपटामध्ये तर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *