जिकडे तिकडे चोहीकडे चर्चा फक्त पांडूची.. मंडळी, कितीतरी दिवसांनी थेटरमध्ये जावून सिनेमा पाहण्याची परिस्थिती पुन्हा आलीये. त्याचबरोबर, धमाल तूफान विनोदी सिनेमाही रिलीज झालाय. होय, तुम्ही बरोबर ओळखलत ‘पांडू’. चला हवा येउद्या ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात पोहचलेले, महाराष्ट्राचे लाडके अभिनेते भाऊ कदम आणि कुशल बद्रिके. ह्या धमाल जोडीची विनोदी जुगलबंदी बऱ्याच दिवसांनी आपल्याला पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
काही दिवसांपूर्वीच ‘पांडू’ ह्या सिनेमाचा ट्रेलर आणि त्यातली गाणी सोशल मीडियावर रिलीज करण्यात आली. त्यातलं ‘बुरूम बुरूम’ गाणं असो किंवा केळेवाळी, प्रत्येक गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय म्हणायला हरकत नाही. इनस्टावरील रीलस्टार पब्लिक तर, ह्या गाण्यांवर फिदाच आहेत असं म्हंटल तर हरकत नाही..
ट्रेलरलाही प्रेक्षकांचा तूफान असा प्रतिसाद मिळाला. टीजर, गाण्याने प्रेक्षकांची मनं जिंकली असं म्हंटलं तर, वावग ठरणार नाही. मंडळी, सांगायचा मुद्दा हा की, पांडू बोले तो पैसा वसूल..! आणि फॅमिलीबरोबर पाहायला हरकत नाही बरं का..सिनेमा रिलीज झाला, बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळाली. नुसती गर्दी नाही मंडळी, काही थेटरच्या बाहेर हाऊसफूलचा बोर्डही लावावा लागला.
बरं सिनेमा आहे तरी काय..? पांडू आणि महादू ह्या दोन जिगरची ही विनोदी गोष्टय. आत्तापर्यंत कुशल भाऊ, आणि सोनाली यांना आपण वेगवेगळ्या भूमिकेत पाहिलय. मात्र ह्या सिनेमात भाऊ आणि कुशल यांना हवालदाराच्या भूमिकेत पाहणार आहोत.विशेष म्हणजे पांडू सिनेमातल्या उषा केळेवालीची सर्वत्र जोरदार हवा दिसतेय.. सोनाली कुलकर्णी ह्या सिनेमात हटके भूमिकेत पाहायला मिळणार आहे. मंडळी, हा सिनेमा नक्कीच आपलं मनोरंजन करणार आहे.
कुशल बद्रिके भाऊ कदम यांच्या सोबत हरहुन्नरी, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांचा अभिनयाचा आविष्कार आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर ह्या सिनेमात प्रवीण तरडे, हेमंगी कवी, प्राजक्ता माळी यांच्या देखील भूमिका आहेत. सिनेमाचं दिग्दर्शन विजू माने यांनी केलं आहे. तर संपूर्ण सिनेमा अवधूत गुप्ते यांनी संगीतबद्ध केला आहे.
मंडळी,पांडू हा सिनेमा थेटरमध्ये जावून आपण पाहायलाचं हवा.. तर मग काढा पटकन आपल्या गाड्या आणि बुरूम बुरूम करत थेटरमध्ये जावून पांडू बघा..!