आजकाल बदलत्या जीवनशैलीसोबत अनेक आजारांचा सामना आपल्याला करावा लागतो. पण या बदलत्या जीवनशैलीत देखील आपण हे आजार टाळू शकतो. किंवा ते झालेच तर त्यावर घरच्या घरी मात करू शकतो. पोटफुगी, गॅसेस, उदरवात, अग्निमांद्य आणि आमांश हे ५ असे आजार आहेत ज्याचा सामना माणसाला कधी ना कधी करावाच लागतो.
दैनंदिन जीवनात आवश्यक असणाऱ्या पाणी आणि विजेचा जसा छोट्या मोठ्या टाकीतून आणि वीज पावर यंत्रणेतून होत असतो तसेच काहीसं माणसाच्या शरीरात आहे. माणसाच्या शरीरात बेंबीजवळील लहान आतड्याचे कार्य होत असते. शरीरातील स्थूल पचनाकरिता पाचकाग्नीस मोठे स्थान आहे. त्या पाचकाग्नीच्या कार्यात बिघाड झाल्यास अमांशयाचे कार्य बिघडते व वरील ५ रोगलक्षणांचा सामना आपणास करावा लागू शकतो.
पण हे तुमच्या जीवनात वारंवार घडत असेल तर त्याला टाळता येते. त्याकरिता तुम्हाला डॉक्टरकडे किंवा पॅथॉलॉजिस्ट कडे धाव घेण्याची गरज नाहीये. याकरिता काही असे घरगुती उपचार आहेत ज्याचा वापर करून तुम्ही घरच्या घरी या आजारांपासून सुटका मिळवू शकता. ८-१५ दिवसातच तुम्हाला या आजारांपासून सुटका मिळेल.
आजकाल ‘भरपूर पाणी प्या ते आरोग्याला चांगले असते’ हा सल्ला आपल्याला अनेकांकडून मिळतो. हा पाणी प्यायचा सल्ला तसा उपयोगाचा आहे. पण हे पाणी गरम करून किंवा कोमट प्यावे. आयुर्वेद शास्त्रामध्ये याला महत्व आहे. जेवण करत असताना किंवा जेवणाच्या आधी पाणी पिऊ नये. जेव्हा तुम्हाला वाटेल कि आता अन्न जिरले तेव्हा पाणी प्या.
अरुची हा त्रास तुम्हाला होत असेल तर तुम्ही जेवणापूर्वी आले लिंबूरसाचे पाचक घ्यावे. जेवणात देखील आले पुदिना अशी चटणी असावी. उदरवाताचा नेहमीच त्रास होत असेल तर बरणीमध्ये लसणीचा वापर करावा. तुम्हाला जर धर्माच्या नावाने लसूण खाऊ नये असं काही सांगितल्या जात असेल तर अजिबात ऐकू नका.
ज्यांना आरोग्यदायी आयुष्य हवे त्यांच्या जेवणात लसणाचा वापर हा असलाच पाहिजे. जर खूप उन्हाळा आहे, तोंड आले आहे, रत्ती मूळव्याधीचा किंवा रांजणवाडी, मुखदूषिकाचा त्रास असल्याचं मात्र लसूण खाणे तुम्ही टाळले पाहिजे. दुपारी झोप मात्र टाळा. सायंकाळी कमी व लवकर जेवणे आवश्यक आहे. रात्री जेवणानंतर १५-२० मिनिटं चालायला जाणे गरजेचे आहे.
मिठाई, बेकारी पदार्थ, मांसाहार, पचायला जड असलेले अन्न पदार्थ अवश्य टाळावे. चहा, कॉफी, कोल्ड्रिंक्स घ्यायची तुम्हाला सवय असेल तर हि सवय बदलून गरम पाण्यातील लिंबू शरबत प्यायला सुरु करा. याशिवाय जेवणात ज्वारी मूग, उकडलेल्या भाज्या यांना प्राधान्य द्या. शक्यतो गहू वाटाणा उडीद हरभरा बटाटा कांदा डालडा खूप तेलकट पदार्थ टाळावेत. जेवणात मिरची ऐवजी लाल तिखटाऐवजी मोऱ्यांचा वापर करावा. घाईगडबडीत जेवणे टाळावे.