Sunday , May 28 2023
Breaking News
Home / महाराष्ट्र / पोलीस अधीक्षक विश्वास नांगरे पाटील आणि अभिनेता आर माधवनचं हे नातं खूप कमी लोकांना माहिती

पोलीस अधीक्षक विश्वास नांगरे पाटील आणि अभिनेता आर माधवनचं हे नातं खूप कमी लोकांना माहिती

आर माधवन हा साऊथचा एक सुप्रसिद्ध अभिनेता आहे. साऊथचा सुपरस्टार असण्यासोबत त्याने बॉलिवूडमध्ये देखील खूप नाव कमावलं आहे. त्याने बॉलिवूडच्या अनेक सुपरहिट सिनेमात काम केलं आहे. त्याने मोजक्याच बॉलिवूड सिनेमात भूमिका साकारल्या पण त्या खूप गाजल्या. आर. माधवनचे रहना है तेरे दिल मैं, थ्री इडियट्स, तनू वेड्स मनू हे सिनेमे खूप गाजले.

आर. माधवनने आपल्या करिअरची सुरुवात मालिकांपासून केली. त्याने बनेगी अपनी बात, साया, घर जमाई, सी हॉक्स या मालिकांमध्ये काम केलं. २ वेळा फिल्मफेअर जिंकलेल्या आर माधवनचा जन्म जमेशदपूर येथे १ जून १९७० रोजी झाला.

आर माधवनने आपल्या करिअरची सुरुवात चंदनाच्या जाहिरातींपासून केली होती. त्यानंतर त्याने एका इंग्लिश सिनेमात देखील काम केलं. पुढं तो साऊथच्या सिनेमात अभिनय करायला लागला. तिथे त्याने अनेक हिट सिनेमे दिले. त्याला बॉलिवूडमध्ये खरी ओळख मिळाली ती रहना है तेरे दिल मे या सिनेमातून.

आर. माधवनचं शिक्षण-

आर माधवन लहानपणीपासूनच शिक्षणात खूप हुशार होता. त्याने १९८८ मध्ये शाळेत असताना सांस्कृतिक अँबेसेडर म्हणून कॅनडा मध्ये नेतृत्व केलं होतं. तो कॉलेजमध्ये असताना एक चांगला कॅडेट देखील राहिला आहे. त्याला महाराष्ट्राचा बेस्ट कॅडेट म्हणून देखील गौरविण्यात आले आहे. त्याला अभिनेता होण्याची एकेकाळी आवड देखील नव्हती.

त्याला एक आर्मी ऑफिसर बनायचे होते. त्याने आर्मी जॉईन करण्यातही तयारी केली पण त्याचे वय त्यावेळी ६ महिने कमी भरले आणि त्याची इच्छा अपूर्ण राहिली.

कोल्हापूरशी आहे आर. माधवनचे वेगळे नाते-

आर माधवनचे बालपण बिहारमध्ये गेले असले तरी त्याचं शिक्षण हे महाराष्ट्रात कोल्हापूरमध्ये झालं आहे. कोल्हापूरमधील राजाराम कॉलेजमध्ये त्याने शिक्षण घेतले आहे. आर माधवन शिक्षण घेत असलेल्या या कॉलजेमध्ये पोलीस अधीक्षक विश्वास नांगरे पाटील हे देखील शिक्षण घेत होते. दोघांची इथं चांगली मैत्री झाली.

विश्वास नांगरे पाटील आणि आर माधवन हे चांगले मित्र तर होतेच पण दोघांमध्ये गुरु शिष्याचं नातं होतं. नांगरे पाटील हे आर माधवनला आदर्श मानत असत. कारण तो महाराष्ट्रातील बेस्ट कॅडेट होता. त्याची जिद्द, आत्मविश्वास आणि कष्ट करण्याची तयारी खूप होती. त्याच्यापासून प्रेरणा घेऊनच नांगरे पाटील शिक्षण घेत राहिले.

अतिशय शांत असलेल्या आर माधवनला इंग्रजी खूप चांगली बोलता यायची. त्याचे इंग्रजी खूप चांगले असल्याने तो सर्वाना इंग्रजी शिकवत असे. इतरांच्या काही चुका होत असतील तर तो त्या चुका दुरुस्त करायचा. विश्वास नांगरे पाटील देखील त्याच्याकडून इंग्रजीचे धडे घेत असत. त्यामुळे ते त्याला गुरु मानत असत.

About Mamun

Check Also

…जेव्हा नितीन गडकरींनी दिल्लीत भारत सरकारचा बोर्ड उखडून लावला होता महाराष्ट्राचा बोर्ड!

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. त्यांचे असंख्य किस्से …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *