Sunday , May 28 2023
Breaking News
Home / ट्रेंडिंग / प्रिय नवरोबा…! दीपाली चव्हाण यांनी नवऱ्याला लिहिलेलं भावनिक पत्र त्यांच्याच शब्दात..

प्रिय नवरोबा…! दीपाली चव्हाण यांनी नवऱ्याला लिहिलेलं भावनिक पत्र त्यांच्याच शब्दात..

दीपाली चव्हाण या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याने जगाचा निरोप घेतला. लेडी सिंघम अशी ओळख असलेल्या दीपाली यांनी आपल्या पतीला एक शेवटचं पत्र लिहिलं होतं. ते पत्र आता समोर आलं आहे. या भावनिक पत्रात काय लिहिलंय वाचा त्यांच्याच शब्दात..

प्रिय नवरोबा,
लिहून लिहून थकले. खूप डोकं दुखत आहे. मला तुझी आठवण येत आहे. तुमच्या सोबत बोलत बोलत मी तुम्हाला पत्र लिहीत आहे. माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. आता नाही म्हणू शकत जिवापेक्षा जास्त कारण आता मी जीव देत आहे…
साहेब मला काय काय बोलले ते सगळं मी तुला सांगितलं. तू मला शांत राहायला सांगतोय मी शांत राहते. पण मला सहन नाही होत. तू नेहमी म्हणतोस माझी हार्डडिस्क भरली आहे. खरंच भरली आहे.

साहेबाने मला पागल करून सोडलय. माझा इतका अपमान कधीच कोणी केला नाही जितका शिवकुमार साहेब करतात… मी खूप सहन केलं पण, आता माझी लिमिट खरच संपली आहे… यावर उपाय असू शकतो. मी सुट्टी घेऊ शकते पण, सुट्टी देखील तो मंजूर करत नाही.

तुझ्याशी बोलायला हवं होत. मी तुझी वाट पाहत होते घरी यायची… आज आई पण गावी गेली. घरी कोणीच नाहीये घर खायला उठत आहे. मी हे पाऊल उचलत आहे मला माफ कर. जगातला सगळ्यात चांगला नवरा तु आहेस. माझ्यावर खूप प्रेम करतोस… मला मानसिक त्रा स होत आहे म्हणून तू माझ्या जवळ येऊन राहिलास. आपण रेड्डी सरांना सगळं सांगून सुद्धा त्याच त्रा स देन कमी झालं नाही.

मला माफ कर मी आपल्या बाळाला गमावलं… मला माफ कर तुला लग्नात दिलेली सगळी वचन अर्धवट सोडून मी जात आहे… आपल्या संसाराला नजर लागली.. माझ्या बोलण्याने मी कधी तुला दुखावलं असेल तर मला माफ कर.

मी नेहमी म्हणते तू मला सोडून नको जाऊ पण, आज मी तुला सोडून जात आहे. माझ्या आ त्म ह त्येला सर्वस्वी जबाबदार विनोद शिवकुमार, उपवनसंरक्षक गुगामल वन्यजीव विभाग चिखलदरा यास धरावे. त्याच्या मानसिक त्रा साला कंटाळून मी जी व देत आहे.

आपला संसार अपूर्ण राहिला. पुढच्या जन्मी आपण नव्याने सुरुवात करू. माझ्यासाठी तू सगळं काही केलंस मीच कमी पडत आहे. माझी हार्डडिक्स फुटत आहे. त्यामुळे मी हा निर्णय घेत आहे. मला माफ कर. माझ्या मृ त्यूला सर्वस्वी जबाबदार शिवकुमार आहे…
– दीपाली चव्हाण

About Mamun

Check Also

धीरूभाई अंबानी यांनी नसली वाडियांची सुपारी दिल्याचा मुबई पोलीस आयुक्तांनी केला होता गौप्यस्फोट

धीरूभाई अंबानी आणि नसली वाडिया ही भारतीय उद्योग जगतातील बलाढ्य अशी नावे आहेत. गुजराती कुटुंबात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *