छोट्या पडद्यावरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ हि मालिका प्रेक्षकांना खूप आवडते. हि मालिका अनेक दिवसांपासून छोट्या पडद्यावर गाजत आहे. शिकलेली मुलगी सून म्हणून नको या मताशी ठाम असणाऱ्या जीजी अक्कांना कीर्ती हि उच्चशिक्षित सून मिळते. कीर्तीचा खडतर प्रवास या मालिकेत दाखवला आहे.
मालिकेत कीर्तीला पती शुभम खूप चांगली साथ देतो. या मालिकेतील कीर्ती स्वभावाने खूप शांत आणि सोज्वळ दाखवण्यात आली आहे. मालिकेत कीर्तीची भूमिका साकारली आहे अभिनेत्री समृद्धी केळकर हिने.
समृद्धी केळकर हि अभिनेत्री सर्वप्रथम कलर्स मराठीवरील लक्ष्मी सदैव मंगलम मालिकेतून प्रेक्षकांच्या समोर आली होती. अभिनयासोबत समृद्धी हि एक चांगली डान्सर देखील आहे. समृद्धीने ढोलकीच्या तालावर २०१७ या कार्यक्रमामध्ये देखील सहभाग घेतला होता. ती या स्पर्धेत टॉप ५ डान्सर मध्ये राहिली होती.
२३ डिसेंबर रोजी ठाण्यात जन्मलेल्या समृद्धीने अभिनयात आज चांगले नाव कमावले आहे. सरस्वती माध्यमिक शाळेतून तिने आपले शिक्षण पूर्ण केले तर व्हीजी वाझे केळकर कॉलेज मुलुंड मधून तिने आपले बीकॉम चे शिक्षण पूर्ण केले आहे. शिक्षणानंतर अभिनयाकडे वळलेल्या समृद्धीला कलर्स मराठी वर अगोदर संधी मिळाली.
सध्या फुलाला सुगंध मातीचा मध्ये काम करणाऱ्या कीर्ती उर्फ समृद्धीचा खास डान्सचा व्हिडीओ आज आपण बघूया. या व्हिडिओमध्ये मालिकेत सोनालीची भूमिका करणारी अभिनेत्री देखील तिची साथ देत आहे..
बघा व्हिडीओ-
बघा मालिकेतील दुसऱ्या कलाकारांसोबतचा जबरदस्त डान्स-