वडिलांना दारूचे मोठे व्यसन. आईसोबत सतत वाद व्हायचा. वाद वाढला आणि दोघे वेगळे झाले. मुलीवर मोठं संकट आलं. शाळेतून काढून टाकण्यात आलं. तिच्या सावल्या रंगामुळे, घरच्या परिस्थितीमुळे, शिक्षणामुळे सतत तिला नाकारलं. तीच लग्न देखील मोडलं होतं. पण ती खंबीर होती आणि जिद्दीच्या बळावर तिने PSI बनून सर्वाना सणसणीत उत्तरच दिलं.
स्वतःच घर नसलेली, वडिलांनी लहानपणी सोडून दिलेली आणि लग्न मोडलं म्हणून तुटलेली कल्याणी राजगुरू आज PSI आहे. कल्याणीला अनेकदा शिकून काय करणार म्हणून हिणवलं गेलं. वडील व्यसनी तर आई धुणीभांडी करून घर चालवायची. वडिलांनी घर सोडून दिलं. २ भाऊ आणि एक बहीण अशी जबाबदारी आईवर होती. मावशीने कल्याणीचं सांभाळ करण्याचं वचन आईला दिलं.
आईने अनेक संकटं येऊन मुलांचा मोठ्या कष्टाने मुलांचा सांभाळ केला. लोकांच्या घरी धुणीभांडी करणारी कल्याणीची आई मुलांना शिकवत होती. जेव्हा खेळायचं वय होतं तेव्हा कल्याणी श्रीमंतांच्या घरी आईसोबत भांडे घासायला जायची. कल्याणीचे सुरुवातीचे शिक्षण झाल्यावर डीएडला प्रवेश घेतला सोबत तिने बीएला देखील मुक्त मध्ये प्रवेश घेतला. तिने ट्युशन घेऊन आईला हातभार देखील लावला. कल्याणीने टीईटी देऊन शिक्षण होण्याचा प्रयत्न केला पण तो फसला.
कल्याणीच्या आयुष्यात एक धक्का बसला ज्यामुळे तिचं आयुष्य बदललं. १५०० रुपये महिना असलेला तिचा शाळेतील शिक्षिकेचा जॉब गेला. शाळेने तिला काही कारण नसताना काढून टाकले. तिला मोठा धक्का बसला होता पण तिने याला संधी बनवत पुढे स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याचं ठरवलं. ती २२-२३ वर्षाची झाली होती. तयारी सुरु करून ५-६ महिने गेले अन लोकं म्हणायला लागली हीच शिकून काय उपयोग होणार. हिच लग्न लावून टाका. घरीही नातेवाईक बोलत होते.
१५-२० मुलं बघून गेले. पण तिच्या सावल्या रंगामुळे घरच्या परिस्थितीमुळे अत्याधिक जणांनी तिला नाकारलं. पण एक स्थळ आलं आणि लग्न ठरलं. ८ दिवसात साखरपुडा देखील झाला. पण तिला मनातून वाटत होतं कि लग्न झालं तर आपलं स्वप्न पूर्ण होणार नाही. तिने मोठा निर्णय घेतला आणि स्वतः लग्न मोडलं. तिला अन आईला लोकांचे खूप टोमणे ऐकावे लागले. जास्त शिकवलं तर असच होणार असं लोक म्हणायचे. लोकांनी खूप टोमणे मारले.
कल्याणीसमोर आता यश मिळवणे हाच एकमेव रस्ता होता. तिला आता त्याशिवाय पर्याय नव्हता. तिने खूप अभ्यास चालू ठेवला. २०१८ मध्ये एसटी महामंडळात क्लार्क म्हणून तिला नोकरी मिळाली. तिने PSI पूर्व परीक्षा दिली होती त्यात देखील ती पास झाली. क्लार्क म्हणून जॉईन करावा का नाही असं तिच्यासमोर संकट होतं. तिने जॉईन केलं खरं पण तिला पैठणला नोकरी मिळाली. त्यामुळे औरंगाबाद वरून प्रवास करून जावं लागायचं. PSI च्या परीक्षेच्या तयारीसाठी वेळ कमी मिळू लागला.
पुढे मुख्य परीक्षेत देखील ती पास झाली. तिच्या जॉबमुळे शरीराकडे दुर्लक्ष होऊन ती आजारी राहू लागली. आधीच तब्येत बारीक असल्याने तिला PSI च्या फिजिकल साठी मोठी अडचण येणार होती. पण तिने नोकरी करून फिजिकल ची तयारी केली. १२ हजार पगारात सर्व काही चालायचं. त्यामुळे जॉब सोडता येत नव्हता. फिजिकल चांगली देऊन तिने मुलाखतहि चांगली दिली.
आता वेळ आली होती निकालाची. तिने निकाल पाहताना तिचा भूतकाळ तिला आठवत होता. आईसोबत केलेली धुणीभांडी, शाळेतला अपमान, नंतर लोकांचे टोमणे. हे सर्व आठवत असताना निकाल हाती आला आणि कल्याणी राजगुरू PSI झाली. तिच्या डोळ्यात अश्रू होते. आईला पहिला फोन करून तुझ्या कष्टाचं सार्थक झालं म्हणून सांगितलं.