भारतीय क्रिकेट टीमचा दिग्गज गोलंदाज जसप्रीत बुमराह आज स्पोर्ट्स अँकर संजना गणेशन सोबत गोव्यात लग्नबंधनात अडकला. जसप्रीत बुमराह हा लग्न बंधनात अडकणार म्हणून तेव्हाच समजलं होतं जेव्हा तो इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या टेस्ट सामन्याआधी त्याने सुट्टी मागितली होती. आज अत्यंत मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला.
कोरोनामुळे अत्यंत मोजक्या लोकांना या लग्नाला आमंत्रित करण्यात आलं होतं. जसप्रीत बुमराहचं मागील अनेक दिवसांपासून एका साऊथच्या अभिनेत्री सोबत नाव जोडलं जात होतं. पण आज या चर्चाना पूर्णविराम मिळाला. विशेष म्हणजे जसप्रीत बुमराह आणि संजना हे सार्वजनिकरित्या कधीच भेटल्याचे समोर आले नव्हते. थेट त्यांच्या लग्नाची बातमी आल्यावरच त्यांच्या ना त्याविषयी माहिती समोर आली.
संजना गणेशन हि जसप्रीत बुमराह पेक्षा वयाने मोठी आहे. यापूर्वी सचिन तेंदुलकर, अनिल कुंबले, अजीत अगरकर, जवागल श्रीनाथ, शिखर धवन या क्रिकेटपटूंनी देखील आपल्या पेक्षा जास्त व याच्या मुलीसोबत लग्न केलं आहे. जाणून घेऊया संजना गणेशन बद्दल..
बघा लग्नाचे खास फोटो-
जसप्रीत बुमराह बनला पुण्याचा जावई-
संजना गणेशनचा जन्म ६ मे १९९१ ला पुण्यात झाला. तर बुमराहचा जन्म हा ६ डिसेंबर १९९३ ला झाला. संजना ने पुण्याच्या एका नामांकित कॉलेजमधून इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर तिने नोकरी देखील केली. तिला मॉडेलिंगची विशेष आवड होती. त्यामुळे ती मॉडेलिंगकडे करिअर म्हणून वळली.
पुढे २०१३ मध्ये संजना ने फेमिना मिस इंडिया पुणे स्पर्धेत भाग घेतला होता. या स्पर्धेत ती फायनलमध्ये पोहचली खरी पण जिंकू शकली नव्हती. यानंत तिने एमटीव्ही स्प्लि टव्हीलाच्या सातव्या सिजनमध्ये देखील भाग घेतला होता. या शो मध्ये तिचा जोडीदार अश्विन कौल होता. अश्विनसोबत ती ना त्यात देखील राहिली आहे. २०१५ मध्ये दोघे वेगळे झाले.
२०१६ मध्ये संजनाने अँकरिंग मध्ये करिअरला सुरुवात केली. त्यानंतर ती स्टार स्पोर्ट्स सोबत जोडली गेली. तेव्हापासून ती सतत स्पोर्ट्स अँकरिंग करत आली आहे. क्रिकेटशिवाय ती अन्य खेळांमध्ये देखील अँकरिंग करताना नजरेस पडते. संजनाने आयसीसी वर्ल्डकप २०१९ चे देखील अँकरिंग केले आहे. याशिवाय ती आयपीएलचे अँकरिंग करताना देखील अनेकदा दिसली आहे.
भारतीय क्रिकेटचा स्टार जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशनला त्यांच्या वैवाहिक आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.. बुमराह लवकरच भारतीय संघात येऊन आपला ज लवा पुन्हा दाखवेल अशी आशा करूया.