Sunday , May 28 2023
Breaking News
Home / देश-विदेश / जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफावर जाहिरात करायला किती खर्च येतो?

जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफावर जाहिरात करायला किती खर्च येतो?

बुर्ज खलिफा जगातील सर्वात मोठी मानवनिर्मित इमारत असून ती दुबईमध्ये स्थित आहे. कशाचाही आधार न घेता उभी असलेल्या या इमारतीची उंची जवळपास ८३० मीटर आहे. तिच्यामध्ये तब्बल १६३ मजले आहेत. या इमारतीला एकूण ५७ लिफ्ट आहेत. बुर्ज खलिफाच्या तळमजल्यावरील आणि सर्वात वरच्या मजल्यावरील तापमानात १५ अंश सेल्सिअसचा फरक असतो. सुरुवातीला या इमारतीचे नाव बुर्ज दुबई होते, पण इमारत बांधकामासाठी आर्थिक मदत करणाऱ्या दुबईचे राष्ट्रपती खलिफा बिन जायेद अल नाहयान यांच्या सन्मानार्थ तिला बुर्ज खलिफा नाव देण्यात आले.

बुर्ज खलिफा ही जगातील सर्वात उंच इमारत असल्याने जगातील अनेक कंपन्या रात्रीच्या वेळी लेझरच्या झोतात डिजिटल जाहिरात करण्यासाठी बुर्ज खलिफाला प्राधान्य देतात. १५ ऑगस्ट रोजी भारताच्या स्वातंत्र्यदिनी भारताचा तिरंगा ध्वज बुर्ज खलिफावर झळकलेला आपण पाहिला असेल. पण बुर्ज खलिफावर या जाहिराती करण्यासाठी त्यांची मॅनेजमेंट टीम इतर कंपन्यांकडून किती पैसे घेत असेल ? हा विचार आपण कधी केला का ? चला तर मग, आपल्या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊया…

बुर्ज खलिफावर जाहिरात करण्यासाठी नेमका किती खर्च येतो ?

आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की बुर्ज खलिफावर जाहिराती या काही दिवसभर चालवल्या जात नाहीत. सररोज रात्री ८ ते १० वाजेपर्यंतच या जाहिराती झळकावले जातात. बुर्ज खलिफा इमारतीच्या बाहेरच्या बाजूवर ३ मिनिटांची जाहिरात झळकवण्यासाठी मॅनेजमेंट टीम कडुन तब्बल ५० लाख रुपये शुल्क आकारले जाते. ही झाली वर्किंग डे च्या दिवशी असणारे शुल्क. मात्र एखाद्या कंपनीला जर विकेंडला त्यांची जाहिरात बुर्ज खलिफावर झळकावयाची असेल तर मॅनेजमेंट टीम तेच शुल्क ७० लाख रुपयांपर्यंत वाढवते.

भारताचा तिरंगा झळकावला त्यावेळी किती पैसे घेतले ?

बुर्ज खलिफावर आजपर्यंत अनेकवेळा भारताचा तिरंगा झळकावण्यात आला आहे. परंतु भारताचा राष्ट्रधव्ज झळकवण्यासाठी भारताकडून पैसे आकारले जात नाहीत. कारण बुर्ज खलिफावर भारताचा तिरंगा झळकावणे हे UAE देशाच्या परराष्ट्र धोरणांपैकी एक धोरण आहे. केवळ भारताचं नाही, तर जगातील अन्य देशांचे राष्ट्रध्वज बुर्ज खलिफावर झळकावून UAE त्यांच्यातील मैत्री दृढ असल्याचा संदेश देते. “मुलन लोव मिना” ही मार्केटिंग कंपनी लाईट शोचे व्यवस्थापन करते.

About Mamun

Check Also

जेव्हा सलूनमध्ये पडलेल्या केसांवरुन “रॉ” अधिकाऱ्यांनी पाकिस्तानचा ऍटोमिक प्लांट शोधला होता

कुठल्याही देशाच्या सुरक्षेमध्ये गुप्तचर संस्थांची भूमिका खूप महत्वाची असते. भारतातही अशी एक गुप्तचर संस्था आहे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *