भारताचे पंतप्रधान एकेकाळी चहा विकत असल्याचे आपण अनेकदा ऐकले आहे. त्यांनी एक चहावाला ते भारताचे पंतप्रधान हा प्रवास करताना मोठा संघर्ष केला. आज आपण अशा एका चहावालीची गोष्ट बघणार आहोत जिच्या स्वाभिमानासाठी देश तिला नमन करत आहे. उत्तराखंडची हि महिला चहा आणि भज्यांचं छोटं दुकान चालवते. पण याच चहावालीचा छोटा भाऊ हा एका मोठ्या राज्याचा मुख्यमंत्री आहे.
ज्या महिलेची आपण गोष्ट बघणार आहोत ती महिला आहे उत्तराखंडच्या पौडी गढवाल जिल्ह्यातील कुठार गावची राहणारी शशी देवी. शशीचा भाऊ आज उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री आहे. होय तुम्हाला विश्वास बसणार नाही पण शशी देवी या यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या बहीण आहेत. शशी योगींची मोठी बहीण आहेत. त्या योगीपेक्षा ६ वर्षांनी मोठ्या आहेत.
शशी आपल्या पतीसोबत मिळून चहा आणि भज्यांचं हॉटेल चालवतात. त्यांना एक मुलगा आणि २ मुली आहेत. त्यांचे चहाचे दुकान ऋषिकेश या तीर्थ नगरीमध्ये आहे. खरंतर ऋषिकेश शशी यांचं सासर आहे. त्यांच्या पतीचे नाव पुरण सिंह पयाल आहे. ते ग्रामपंचायत चे सरपंच देखील राहिले आहेत. चहाच्या दुकानाशिवाय त्यांचा नीलकंठ मंदिराजवळ एक लॉज देखील आहे.
नीलकंठ मंदिराजवळच त्यांचं चहाचं दुकान आहे. त्यांचं दुसरं चहाच दुकान भुवनेश्वरी मंदिर(पार्वती मंदिर) जवळ आहे. या दुकानात त्या चहा भज्याशिवाय प्रसाद देखील विकतात. शशी देवी या भावाविषयी बोलताना सांगतात कि योगी आदित्यनाथ यांचं खरं नाव अजय बिष्ट आहे. त्यांनी जेव्हा सन्यास घेतला तेव्हा त्यांनी आपलं नाव बदललं.
शशी देवी या जेव्हा घरी भावासोबत म्हणजे योगींसोबत रहायच्या तेव्हा त्या त्यांना त्यांच्या हाताने बनवलेले जेवण खाऊ घालायच्या. योगींना देखील ते खूप आवडायचं. पण जेव्हापासून योगींनी सन्यास घेतला तेव्हापासून त्यांनी बहिणीच्या हातचं जेवण कधीच चाखलं नाही. याची शशी यांना खंत आहे. शशी देवी या शेवटचं आपल्या भावाला ११ फेब्रुवारी २०१७ ला भेटल्या होत्या. हि तेव्हाची भेट होती जेव्हा योगी आदित्यनाथ हे त्यांच्या भागात प्रचारासाठी आले होते.
शशी सांगतात कि जेव्हा योगी त्यांच्याकडे येतात तेव्हा ते शशीच्या मुलांना खूप बोलतात पण मोठ्यांना मात्र काही बोलत नाहीत. शशी देवीची इच्छा आहे कि भावाने उत्तर प्रदेशप्रमाणे उत्तराखंड साठी देखील काही तरी मोठं करावं. पहाडी लोकांसाठी त्यांनी काही करावं अशी त्यांची इच्छा आहे. आपला भाऊ मुख्यमंत्री असूनही हि बहीण आपल्या स्वाभिमानामुळे साधे जीवन जगत आहे. तिच्या या स्वाभिमानाला सलाम.
योगींनी घर सोडून घेतला होता सन्यास-
५ जून १९७२ ला जन्मलेल्या योगी आदित्यनाथ यांच जन्मगाव उत्तराखंड मधील गढवाल. योगींनी सन्यास घेतल्यानंर ते गोरखनाथ मंदिरात महंत अवैद्यनाथच्या गादीचे उत्तराधिकारी बनले. महंत अवैद्यनाथ हे ४ वेळा खासदार होते. त्यांच्या जागेवर योगी हे १९९८ ला २६ व्या वर्षीच पहिल्यांदा खासदार बनले. त्यानंतर त्यांनी राजकारणात मागे वळून पाहिलंच नाही.
२०१७ विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाल्यानंतर उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदासाठी त्यांचे नाव समोर आले आणि ते मुख्यमंत्री बनले.