भारताच्या अनेक क्रिकेटपटूंनी बॉलिवूडच्या सेलेब्रिटींसोबत किंवा स्पोर्ट्स अँकर सोबत लग्न केल्याचे आपण अनेकदा बघितलं आहे. पण भारताच्या क्रिकेट विश्वास एक अशी गोष्ट घडली होती जिच्यावर विश्वास ठेवणे थोडे कठीण जाते. भारतीय संघात सोबत खेळणाऱ्या एका खेळाडूला दुसऱ्या खेळाडूच्या ग र्भवती बायकोवर प्रेम झाले आणि दोघांनी लग्न देखील केलं. हा क्रिकेटर आहे भारताचा विकेटकिपर फलंदाज दिनेश कार्तिक.
दिनेश कार्तिकचं नशीब थोडं खराब आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. कारण दिनेश कार्तिकचं क्रिकेटर म्हणून आयुष्य आणि खासगी आयुष्य देखील खूप संघर्षमय राहीलं आहे. महेंद्रसिंग धोनीच्या आधी भारतीय संघात आलेल्या दिनेश कार्तिकला धोनीच्या कामगिरीमुळे संघात अनेक वर्ष स्थानच मिळालं नाही. त्याने चांगलं खेळूनही त्याला संघात स्थान मिळवण्यासाठीझगडावं लागलं. धोनीच्या सुरुवातीच्या काळात तरी कार्तिकला थोड्याफार संधी मिळाल्या पण धोनी कर्णधार झाल्यावर त्या संधी पण संपल्या.
क्रिकेटर म्हणून आयुष्यात संघर्ष करावा लागल्यानंतर कार्तिकला खासगी आयुष्यात देखील जिवलग मित्र आणि बायकोकडून धोका झाला. १ जून १९८५ रोजी चेन्नईमध्ये जन्मलेल्या दिनेश कार्तिकने आजपर्यंत भारतीय संघाला अनेकदा विजय मिळवून दिला आहे. दिनेश कार्तिकने आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात ५ सप्टेंबर २००४ रोजी केली होती. लॉर्ड्स मैदानावर त्याने पहिला सामना खेळला होता. चांगली कामगिरी करूनही तो भारतीय संघात आत बाहेर होत असे.
दिनेश कार्तिकने २००७ मध्ये वंजारा सोबत लग्न केलं. पण लग्नानंतर ६ वर्षातच त्यांचा घटस्फो ट झाला. याला कारण ठरला दिनेश कार्तिकचा जिवलग मित्र मुरली विजय. त्यावेळचा भारताचा टेस्ट ओपनर मुरली विजय आणि दिनेश कार्तिक हे तामिळनाडू या एकाच राज्यातले होते. ते तामिळनाडू संघासाठी रणजी खेळूनच भारतीय संघात आले होते. त्यामुळे दोघांची मैत्री खूप चांगली होती. पण मुरली विजयने दोस्तीत कुस्ती केली आणि दिनेश कार्तिकच्या बायकोसोबत त्याच जुळलं. दिनेश कार्तिकची बायको निकिता देखील दिनेश कार्तिकच्या प्रेमात पडली.
दोघांच्या अफेअरच्या चर्चा सर्वत्र पसरल्या. दिनेश कार्तिकला हे काही सहन झालं नाही आणि त्याने निकिताला सोडायचं ठरवलं आणि घटस्फो ट घेतला. दिनेश कार्तिक पासून वेगळं झाल्यानंतर निकिताने थोड्याच दिवसात मुरली विजय सोबत लग्न केलं. त्यावेळी ती गर्भवती होती असे देखील बोलले जाते. दिनेश कार्तिक मात्र या धक्क्यामुळे खूप खचला होता. तो मानसिक तणावात राहायचा व आजारी देखील राहू लागला. बायकोला तो सहजासहजी विसरू शकत नव्हता. पण त्याच वेळी त्याच्या आयुष्यात दीपिका पल्लिकल आली आणि तिने दिनेशला सावरलं.
दिनेश कार्तिक आणि दीपिकाची भेट २०१३ मध्ये झाली. दीपिका आणि दिनेशची मैत्री झाल्यावर दोघे प्रेमात पडले. २ वर्षांनी २०१५ मध्ये त्यांनी लग्न करण्याचं ठरवलं. दोघांनी परंपरेनुसार १८ ऑगस्ट २०१५ रोजी लग्न केलं. दिनेश कार्तिकच्या कामगिरीत देखील लग्नानंतर खूप सुधारणा झालेली बघायला मिळाली. दिनेश कार्तिकने २०१७ मध्ये निभास ट्रॉफीच्या फायनलमध्ये शेवटच्या बॉलवर ५ धावांची आवश्यकता असताना सिक्स मारून भारताला विजय मिळवून दिला होता. आयपीएलमध्ये देखील दिनेश कार्तिकने कोलकाता नाईट रायडर्स कडून खेळताना चांगली कामगीरी केली आहे.
दीपिका पल्लिकल हि भारताची स्क्वॉशपटू आहे. भारताची आघाडीची स्क्वॉशपटू म्हणून तिने नाव कमावले आहे. जागतिक स्क्वॉश क्रमवारीत अव्वल दहा महिला खेळाडूंमध्ये स्थान पटकावणारी ती पहिली भारतीय खेळाडू आहे. तिची आई सुसान पल्लिकल या भारतीय महिला क्रिकेट संघाकडून खेळल्या होत्या. अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणारी ती पहिली स्क्वॉशपटू आहे. 2012 मध्ये तिला हा पुरस्कार देण्यात आला होता, तर 2014 मध्ये तिला पद्म श्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते.