Sunday , May 28 2023
Breaking News
Home / जीवनशैली / मंगळसूत्र गहाण ठेवून शिकली, उपाशीपोटी रस्त्यावर काढले दिवस, आज आहे करोडोंचा बिजनेस

मंगळसूत्र गहाण ठेवून शिकली, उपाशीपोटी रस्त्यावर काढले दिवस, आज आहे करोडोंचा बिजनेस

पाणी प्यायला देखील स्वतःचं जवळ काही नसलेली ती आपल्या ३ महिन्याच्या मुलाला घेऊन राहिली. रस्त्यावर उपाशीपोटी झोपून तिने दिवस काढले. मंगळसूत्र गहाण ठेवून विकून शिकलेली आणि रस्त्याच्या कडेला टेबलवर १० रुपयाच्या मसाल्याच्या पुड्या विकणाऱ्या तिने आज एका करोडोंच्या कंपनीचा मालक होण्यापर्यंतचा थक्क करणारा प्रवास केला आहे. जाणून घेऊया शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या या स्त्रीचा संपूर्ण जीवनप्रवास..

हि स्वतःचे विश्वास निर्माण करणारी स्त्री आहे सुषमा कोलवणकर. सुषमाच्या आयुष्यात लहानपणीपासूनच संघर्ष आला. तिला दहावीपर्यंत वडील पण घरात असतात हेच माहिती नव्हतं. कारण लहान वयातच सुषमाने वडिलांना गमावले. कुटुंबात फक्त आई आणि बहीणच. दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा द्यायच्या वयात तिला बघायला पाहुणे आले. शाळेच्या गणवेशात २ वेण्या घातलेली हातात दप्तर असलेली सुषमा मोठ्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी गेली तेव्हा तिला एका खुर्चीवर बसवून प्रश्न विचारण्यात आले. मुलगा आणि त्याची आई समोर बसलेले होते. तिच्यासाठी हे धक्कादायक होते. तिला हे कळण्याचं देखील ते वय नव्हतं.

तिने त्या परिस्थितीचा सामना केला. आजोबानी सांगितलं कि माझ्या मुलीला अजून शिकायचं आहे. त्यामुळे ते लग्न काही झालं नाही. तिला तेव्हा वडील नसल्याचं दुःख झालं. बालवाडीपासून दहावीपर्यंत सुषमा पहिल्या क्रमांकाने पास व्हायची. दहावीला तर ती उंब्रजच्या केंद्रात पहिली आली. पण पहिली येऊनही तुला विचारायला कोणी नसायचं. वडील आणि भाऊ नसल्याने आईवर २ मुलींचे लग्न कधी करणार यासाठी दबाव असायचा. मुलींची जबाबदारी संपवण्यासाठी आईला भावनिक करून दबाव आणला जायचा. वडील नाहीत मुली शिकून काय करणार म्हणून पाहुणे सारखं टोकायचे.

दहावीत प्रस्ताव नाकारला पण अकरावी आणि बारावीत पुन्हा लग्नाचे प्रस्ताव सुषमाला आले. शेवटी बारावीत घरच्या दबावामुळे सुषमाने लग्नाला होकार दिला. पण नशिबाने साथ दिली आणि तेही लग्न झालं नाही. तिने बारावी सायन्सनंतर डॉक्टर व्हायचं स्वप्न पाहिलं होतं. पण अंथरून बघून पाय पसर असं तिला ऐकवलं गेलं. लहानपणीपासून कोणी जवळ करायचं नाही म्हणून तिने काही तरी करून दाखवण्याचं स्वप्न पाहिलं होतं. उंब्रजमध्ये सायन्स कॉलेज नसल्याने तिला कराड किंवा साताऱ्याला प्रवेश घ्यावा लागणार होता. घरच्या परिस्थितीमुळे कराडला तर कोणी ठेवणार नव्हतं.

सुषमाने साताऱ्यात आर्मीच्या हॉस्टेलमध्ये सवलतीत प्रवेश घेतला. सायन्सला तिने प्रवेश घेतला. कॉलेज सुरु असताना बहिणीने सांगितलं कि तुझं कॉलेज पूर्ण झाल्यावर तुझं लग्न लावून देणार आहेत. सर्व पक्के झालं आहे. तिला कॉलेजमध्ये अनेक मुलं प्रपोज करायची पण समाजामुळे आणि बहिणी आई मुळे ती नकार द्यायची. पण घरून लग्नाचा दबाव बघून तिने एका मुलाला होकार दिला आणि लव्ह मॅरेज केलं. तिने तिला समजून घेणारा मुलगा शोधला होता. लग्नानंतर पहिल्याच वर्षी सुषमाला मुलगा झाला. सुषमा फक्त शिक्षण घेऊ शकत होती पण स्वप्न मात्र अजूनही दूर होतं.

तिने पुन्हा स्वप्नाकडे वाटचाल सुरु केली. ती ३ महिन्याच्या मुलाला घेऊन बाहेर पडली. एका खोलीतून तिने संसाराला सुरुवात केली. त्याआधी तर ३ दिवस तिने मुलाला घेऊन एका दुकानात ३ दिवस काढले. स्वतःच जवळ तर पाणी प्यायला ग्लास देखील नव्हता. लव्ह मॅरेज केल्यामुळे तिला काहीच मदत कोणी केली नव्हती. एक एक भांड जमा करत संसार उभारला. शेजाऱ्यांनी त्यांना गरजेच्या वस्तू देऊन खूप मदत केली. तिने नंतर ट्युशन घ्यायला सुरु केलं. सोबतच त्यांनी एक छोटं दुकान टाकलं होतं. ते देखील ती चालवायची.

दुकान चालत नसल्याने पती जॉब करायचा तर ती दुकान घर आणि ट्युशन असं सर्वच सांभाळायची. दुपारी दुकान बंद असायचं तेव्हा तिने फॅशन डिझायनिंगचा कोर्स शिकून घेतला. ती कपडे शिवायला लागली. ३ वर्ष असेच गेली. ५००-१००० रुपये ती कमवायची पन त्यात काही होणार नव्हतं. तिने नंतर सर्वांचा विरोध झुगारून MBA केलं. तिने MBA फीस लोन घेऊन भरली. ती सकाळी ६-१० जॉब करून त्या लोनचे हप्ते भरायची तर १०-६ कॉलेज करायची. MBA ला पहिली येत पास झाली पण दुसऱ्या वर्षात प्रवेश घ्यायला पैसे नव्हते. तिने मंगळसूत्र गहाण ठेवून पुढे प्रवेश घेतला. MBA झालं.

तिला चांगला जॉब मिळाला पण स्वताचं काही तरी करायचं होतं. पती आणि तिने सोबतच जॉब सोडला आणि पुण्यात ते दोघे आले. तिला १ लाख रुपये महिन्याची नोकरी मिळाली होती. ती सोडून ती बाहेर पडली होती. तिला मुलगीही झाली. मुलीसोबतच बिजनेस देखील सुरु झाला. मार्केटमधून मसाले आणून स्वतःच्या ब्रॅण्डिंगमध्ये ती विकायला लागली. रस्त्यावर टेबल टाकून १० रुपयाचे पॅकेट तिने विकले. तिला कधीही याची लाज वाटली नाही. १० लाखाचं पॅकेज कमावणारी सुषमा १० रुपयाचे मसाले विकण्यासाठी रस्त्यावर बसायची.

तिने मसाल्याच्या व्यवसाय उभारला. ते मसाले त्या दुसऱ्या देशात पाठवायला लागल्या. सोबतच भाजीपाला आणि फळ देखील एक्स्पोर्ट करायला सुरुवात केली. तिने सोबतच एका इन्स्टिट्यूट मध्ये ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली. तिची कंपनी आज ट्रेनिंग आणि कन्सल्टन्सी मध्ये काम करते. एक टेबल २ खुर्च्यांपासून चालू झालेला तिचा हा बिजनेस आज देशभरात पसरला आहे. सुषमाने बिजनेस चालू केल्यानंतर ६ महिन्यातच पुण्यात घर घेतलं. उपाशी राहून १ रूमच्या खोलीतून सुरु झालेला सुषमाचा बिजनेस आज करोडोंची उलाढाल करत आहे.

About Mamun

Check Also

आईच्या मृत्यूमुळे आतून तुटलेली अकाउंटंटची मुलगी दुसऱ्या प्रयत्नात टॉपर येत बनली IAS !

यश श्रीमंत किंवा गरीब किंवा लहान, मोठे पाहत नाही, जो योग्य दिशेने कठोर परिश्रम करतो, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *