Sunday , May 28 2023
Breaking News
Home / ट्रेंडिंग / महाराष्ट्रात २१ वर्षाच्या सरपंचाने ही पंचसूत्री वापरुन आपले गाव केले आहे कोरोनामुक्त

महाराष्ट्रात २१ वर्षाच्या सरपंचाने ही पंचसूत्री वापरुन आपले गाव केले आहे कोरोनामुक्त

कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत कोरोना व्हायरस मुंबई पुण्यासारख्या शहरांमधून आता गावागावांमध्ये पसरला आहे. लोकांना कोरोना संक्रमणापासून वाचवण्यासाठी उपाययोजना करताना सरकार आणि प्रशासनाची चांगलीच दमछाक होत आहे. खेड्यापाड्यात हा रोग जलदगतीने पसरत असून अनेक ठिकाणी उपचाराअभावी लोकांना आपला जीव गमवावा लागत असल्याचे चित्र दिसत आहे.

या सगळ्या वातावरणामध्ये महाराष्ट्रातील एक २१ वर्षांचा सरपंच सर्वांसाठी आदर्श बनून समोर आला आहे. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात या सरपंचाचे कौतुक केल्याने त्याच्याविषयी जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.

कोण आहे तो २१ वर्षांचा सरपंच ?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणातून ज्या २१ वर्षीय सरपंचाचे कौतुक केले त्या सरपंचाचे नाव आहे ऋतुराज देशमुख. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात असणाऱ्या घाटने या गावचा सरपंच असणारा हा तरुण सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. यावर्षीच्या एप्रिल महिन्यात घाटने गावात अचानक कोरोनाचे रुग्ण आढळू लागले होते. परंतु ऋतुराज देशमुखांनी आपल्या गावात पंचसूत्रीचा अवलंब करून आपले गाव कोरोनमुक्त केले आहे. त्यांचा हा पॅटर्न देशभर कोरोनमुक्ती पॅटर्न म्हणून गाजत आहे.

काय आहे ही कोरोनामुक्तीची पंचसूत्री ?

आपल्या गावावर आलेल्या कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करुन गाव कोरोनमुक्त करण्यासाठी तरुण सरपंच ऋतुराज यांनी सर्वप्रथम गावकऱ्यांना एकत्र केले आणि त्यांना विश्वास दिला. आपल्या गावात आपण “बी पॉझिटिव्ह, आपला गाव ठेवू कोरोना निगेटिव्ह” ही मोहीम राबवत असल्याची माहिती दिली.

मी सरपंच असलो तरी आपल्या ग्रामपंचायतीचा एक सेवक म्हणूनच मी काम करणार आहे आणि त्यात मला तुमच्या सहकार्याची आवश्यकता आहे असे आवाहन त्यांनी केले. आपले गाव कोरोनमुक्त करण्यासाठी सर्वांनी “रुग्णांचा शोध, स्वतःची तपासणी, आवश्यक उपचार, लसीकरण आणि शासनाच्या नियमांचे कडक पालन” या पंचसूत्रीचा अवलंब करण्याचे आवाहन त्यांनी केले.

कसे झाले घाटने गाव कोरोनमुक्त ?

सरपंचांनी पंचसूत्री दिल्यानंतर गावकऱ्यांनी त्यांना मनापासून सहकार्य केले. शहरात जाणाऱ्या आणि कामाच्या निमित्ताने विविध लोकांच्या संपर्कात येणाऱ्या गावकऱ्यांच्या रॅपीड अँटिजन चाचण्या केल्या. गावातील ४५ वय पूर्ण असणाऱ्या सर्वांचे लसीकरण केले. आशा वर्कर्सच्या मदतीने दर आठवड्यात घरोघरी जाऊन ग्रामस्थांची ऑक्सिजन लेव्हल, ताप यांची तपासणी केली. प्रत्येक कुटुंबामध्ये “कोरोना सुरक्षा किट” वाटप केले ज्यात व्हिटामिनच्या गोळ्या, सॅनिटायजर, मास्क, इत्यादींचा समावेश होता. बाहेरगावाहून कोणी व्यक्ती आला तर त्याला सक्तीने तीन दिवसांसाठी क्वारंटाईन करुन ठेवले.

About Mamun

Check Also

मोठ्या नेत्यांसोबत पंगा घेणारी महिला IPS अधिकारी, २० वर्षात ४० वेळा झाली बदली..

UPSC परिक्षेत पास होऊन IAS IPS होण्याचं अनेकजण स्वप्न बघतात. यामध्ये काहीजण असतात जे चांगली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *