सहसा केस प्रत्येकाच्याच आवडीचे असतात. पण ते आवडीचे असतात डोक्यावर. मिशा आणि दाढी तर पुरुषांची मोठी शोभा वाढवतात. दाढी मिशा आणि डोक्यावर केस असले कि माणूस रुबाबदार दिसतो. पण हेच केस महिलांना मात्र नको त्या ठिकाणी येऊन खूप त्रासदायक ठरतात. महिलांच्या शरीरावर जे नको असलेले केस येतात त्यांना हिर्सुटिज्म म्हणतात.
हे नको त्या ठिकाणी केस येणं एकप्रकारचा आजारच आहे. या आजारामुळेच महिलांना नको त्या ठिकाणी केस येतात. अनेकदा पुरुषांप्रमाणे महिलांच्या चेहऱ्यावर केस येतात. या केसांची वाढ झाल्यास ते खूप विचित्र दिसते. महिलांच्या सौंदर्याला हे केस बाधक ठरतात. हा आजार होण्यामागे वेगवेगळे कारणे असतात.
हिर्सुटिज्म आजार होण्यामागे कोणते कारणं असतात आज आपण जाणून घेऊया. आणि यापासून सुटका करण्यासाठी देखील काय उपाय आहेत हे देखील जाणून घेऊया.
महिलांना नको त्या ठिकाणी केस येण्यामागे शरीरातील हार्मोनल चेंजेस कारणीभूत असतात. महिलांच्या शरीरात एंड्रोजन हार्मोन्स ज्यांना मेल हार्मोन्स असंही म्हंटल जातं ते जेव्हा वाढतात तेव्हा हे नको त्या ठिकाणी केस येतात. या समस्येला इतरही अनेक कारणं असू शकतात. केसांना असलेल्या रोमछिद्रांची संवेदनशीलता हे देखील यामागचं एक कारण असू शकतं.
हे रोमछिद्र एंड्रोजन हार्मोन्स वाढल्याने उघडतात. ज्यामुळे महिलांना हि समस्या उद्भवते. हा आजार फॅमिली हिस्ट्रीमुळे देखील होतो. कुटुंबातील कोणाला हा आजार आधी कधी असेल तर हा आजार पुढच्या पिढीला देखील होतो.
तसेच काही असे देखील औषध असतात ज्यांच्या सेवनाने या हार्मोन्सचा स्तर वाढतो आणि हि समस्या उदभवते. औषधांमुळे हार्मोन्सचं बॅलेन्स बिघडतं. जे या आजाराचं कारण बनतं. शिवाय गर्भावस्तेत आणि मोनोपॉजच्या दरम्यान हि समस्या येऊ शकते. या दरम्यान महिलांच्या शरीरात हार्मोनल बदल होत असतात. त्यामुळे या आजाराचा धो का वाढतो.
कशी मिळवायची या नको असलेल्या केसांपासून सुटका?
या नको असलेल्या केसांपासून सुटका महिलांना मिळवायची असेल तर यासाठी काही उपाय आहेत. यासाठी साखर, लिंबाचा रस आणि पाणी एकत्र करून गरम करा. हे मिश्रण थोडं थंड करून नको असलेल्या केसांच्या जागेवर लावा. २०-२५ मिनिट तसेच ठेवल्यानंतर ते नंतर थंड पाण्याने धुवून काढा. यामुळे हि समस्या दूर होते. याशिवाय ओटमील आणि पिकलेल्या केळी एकत्र करून पेस्ट तयार करा. हे पेस्ट देखील लावल्यानंतर १५ मिनिटांनी धुवून काढा.
टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.