रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी हे देशातील सर्वात श्रीमंत आणि जगातील आठवे श्रीमंत व्यक्ती आहेत. मुकेश अंबानी हे आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. रिलायन्स जिओ मध्ये तर मागील वर्षभरात हजारो कोटींची गुंतवणूक झाली होती. यामध्ये फेसबुक, सिल्व्हर लेक, व्हिस्टा इक्विटी पार्टनर्स, जनरल अँटालॅंटिक आणि ‘केकेआर’ या कंपन्यांनी मोठी गुंतवणूक केली होती.
१९ एप्रिल १९५७ रोजी यमनच्या एडन येथे जन्मलेल्या मुकेश यांचं सुरुवातीचं शिक्षण मुंबई येथील हिल ग्रेंज हायस्कूलमध्ये झाले. मुकेश यांनी केमिकल टेक्नॉलॉजी (यूडीसीटी), माटुंगा येथून केमिकल इंजिनिअरिंगमध्ये बीई ची पदवी घेतली आहे. त्यांनी १९८१ मध्ये वडील धीरूभाई अंबानी यांच्यासोबत रिलायन्स मध्ये काम करण्यास सुरुवात केली.
मागील वर्षी देशभर सर्वच जण लॉकडाऊन मुळे त्रस्त होते. पण जीओमध्ये मात्र ७८५६२ कोटी रुपयांची गुंतवणूक आली होती. या सर्व डील करण्यात जो व्यक्ती होता तो व्यक्ती मुकेश अंबानी यांचा मास्टरमाइंड म्हणून आज ओळखला जातो. अंबानी यांच्या सर्व मोठ्या डील हा व्यक्ती झटक्यात पूर्ण करतो. हा व्यक्ती मुकेश अंबानी यांचा खास दोस्त देखील आहे. चला तर जाणून घेऊया मुकेश यांचा चाणक्य असलेल्या मोदी यांच्या विषयी.
कोण आहेत हे मोदी?
कोरोना काळात फेसबुक सहित जगातील ८ मोठ्या कंपन्यांनी जिओ प्लॅटफॉर्म मध्ये गुंतवणूक केली होती. या काळात कंपनीने ९७,८८५ कोटी रुपये जमवले होते. यानंतर जिओसह रिलायन्सची ताकत अजून वाढली होती. पण या डिल्स करण्यात मुकेश अंबानी यांचा जेवढा हाथ आहे तेवढाच हाथ त्यांचे मित्र असलेल्या मोदींचा आहे.
मनोज मोदी हे मुकेश यांचे राईट हॅन्ड म्हणून ओळखले जातात. गुजरातच्या मनोज मोदींनी २००७ मध्ये रिलायन्स इंडस्ट्री सोबत काम करण्यास सुरुवात केली. आज त्यांचा प्रत्येक मोठ्या डिलमध्ये सहभाग असतो. मनोज हे रिलायन्सचे चाणक्य असून ते रिलायन्सच्या टॉप मॅनेजमेंट मध्ये सामील आहेत. मनोज मोदी यांनी हजीरा पेट्रो-केमिकल्स, जामनगर रिफाइनरी, रिलायंस रिटेल आणि रिलायंस जियो मध्ये आजपर्यंत काम केले आहे. त्यांनी कधीच मुकेश याना निराश केलं नाही.
मुकेश अंबानी हे नेहमी त्यांचे आभार मानतात. मनोज हे आपल्या अनुभवाच्या बळावर मोठ्या मोठ्या डील आरामात पूर्ण करतात. आज ते मुकेश अंबानी यांचे सर्वात जवळचे आणि विश्वासू आहेत. दोघे मित्र देखील आहेत.
मनोज मोदी आणि मुकेश अंबानी हे इंजिनिअरिंगला असताना एकमेकांचे क्लासमेट होते. त्याच दरम्यान दोघे मित्र बनले होते. कॉलेज संपल्यानंतर दोघे कॉन्टॅक्ट मध्ये होते. एवढा मोठा माणूस असूनही आजही मुकेश हे मनोज मोदी यांना मित्र म्हणून वागवतात.
मनोज मोदी हे रिलायन्समध्ये मोठे नाव असूनही ते प्रसिद्धीपासून मात्र नेहमी दूर राहतात. त्यांच्या खासगी आयुष्याविषयी खूप कमी लोकांना माहिती आहे. त्यांना पडद्याच्या मागून काम करण्यास आवडते. मनोज अंबानी यांनी मुकेश यांच्या मुलांना देखील ट्रेनिंग दिलेली आहे.