आपल्या मुलाला चांगलं शिक्षण द्यावं हे अनेक आईवडिलांचं स्वप्न असतं. पण अनेकदा इच्छा असूनही परिस्थितीमुळे चांगलं शिक्षण ते आपल्या मुलांना देऊ शकत नाहीत. खासकरून ग्रामीण भागात तर शिक्षणासाठी मुलांना मोठा संघर्ष करावा लागतो. घरची परिस्थिती हे त्यासाठी प्रमुख कारण असते. मुलांच्या शिक्षणाचा खर्च अनेक पालक उचलू शकत नाहीत. पण आज अशा एका वडिलांना भेटणार आहोत ज्यांनी आपल्या मुलाला चांगलं शिक्षण मिळावा म्हणून त्यांनी आपलं घर विकलं. आज त्याच वडिलांचा मुलगा २३ व्या वर्षीच IAS अधिकारी बनला आहे. जाणून घेऊया या मुलाची यशोगाथा..
बिहारच्या गोपाळगंज येथे राहणारा प्रदीप सिंह वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी आयएएस अधिकारी झाला आहे. गरीब कुटुंबातील प्रदीप सिंह याला लहानपणापासूनच अधिकारी व्हायचे होते. मात्र, कुटुंबाची आर्थिक स्थिती इतकी चांगली नव्हती की त्याला चांगली कोचिंग मिळू शकेल. पण प्रदीप सिंगने हार मानली नाही आणि मेहनत करून आपले स्वप्न साकार केले आहे. यामध्ये त्याला वडिलांची देखील खूप मोलाची साथ मिळाली.
प्रदीप सिंह हा मागच्या वर्षीच 2020 मध्ये UPSC परीक्षा पास करून IAS अधिकारी झाला आहे. मात्र, हा प्रवास त्याच्यासाठी तितका सोपा नव्हता. पैशांअभावी प्रदीपच्या वडिलांनी आपले घरही विकले होते. वडिलांना घर विकून मिळालेल्या पैशातून प्रदीप दिल्लीला आला आणि चांगल्या कोचिंग क्लासेसमध्ये त्याने प्रवेश घेतला.
प्रदीप सिंहचे कुटुंब मूळचे बिहारचे आहे. पण ते इंदूरमध्ये राहतात. त्याने आपले शिक्षण इंदूरमधूनच पूर्ण केले आहे. बारावीनंतर त्याला यूपीएससीच्या तयारीसाठी दिल्लीला यायचे होते. पण कुटुंबाची स्थिती चांगली नव्हती. त्याचे वडील पेट्रोल पंपावर काम करायचे आणि कमाई खूप कमी होती. अशा परिस्थितीत आपल्या मुलाला दिल्लीला पाठवणे त्यांच्यासाठी सोपे नव्हते.
त्याच्या वडिलांना माहित होते की प्रदीप सहजपणे UPSC परीक्षा पास होऊ शकतो. फक्त त्याला थोडं मार्गदर्शन चांगलं मिळाली आणि चांगल्या शिक्षकाकडून जर शिक्षण मिळालं तर तो यश मिळवेलच हा आत्मविश्वास वडिलांना होता. मग काय प्रदीपच्या वडिलांनी पैशाची व्यवस्था करण्यासाठी आपले घरच विकले. त्यानंतर प्रदीप दिल्लीला आला आणि कोचिंग घेऊ शकला.
प्रदीप सिंह याने 2018 मध्ये पहिल्यांदा UPSC परीक्षा दिली आणि भारतात 96 वा क्रमांक मिळवला. पण त्याची IAS साठी निवड झाली नाही. 96 व्या क्रमांकामुळे प्रदीपला भारतीय महसूल सेवा (IRS) हे पद मिळाले. प्रदीप सिंह याच्या मते, 2018 मध्ये UPSC पास झाला पण IAS एका रँक मुले होऊ शकला नाही. त्याच्याकडे आयपीएस होण्याचा पर्यायही होता. पण तो परराष्ट्र सेवेत रुजू झाला आणि सुट्टी घेऊन पुन्हा तयारीला सुरुवात केली.
एका रँकमुळे आयएएस बनू न शकल्यामुळे, तो दुःखी राहू लागला आणि तणावाखाली देखील गेला. पण त्याने मेहनतीने पुन्हा तयारी केली आणि एक वर्षानंतर पुन्हा परीक्षा दिली. या वेळी त्याची रँक भारतात 26 वि आली. यानंतर त्याची IAS साठी निवड झाली आणि त्याने त्याचे स्वप्न पूर्ण केले. आज एक IAS अधिकारी म्हणून तो देशाला आपली सेवा देत आहे.
प्रदीपच्या मते संयम आणि चिकाटी परीक्षा उत्तीर्ण होण्यात महत्वाची भूमिका बजावते. ही एक मोठी प्रक्रिया आहे. जी वर्षानुवर्षे चालते. या काळात हार मानू नका आणि कठोर परिश्रम करा. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात कितीही चांगले असलात तरी सुधारणेसाठी नेहमीच जागा असते. तर आपण कुठे सुधारू शकता ते पहा. दररोज रिविजन करा आणि मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांमधून एकदा नजर फिरवा. तसेच योग आणि ध्यान करत रहा. या काळात आपल्या आरोग्याची काळजी घ्या. एक दिवस तुम्हाला नक्कीच यश मिळेल.