Monday , June 5 2023
Breaking News
Home / जीवनशैली / मोठ्या नेत्यांसोबत पंगा घेणारी महिला IPS अधिकारी, २० वर्षात ४० वेळा झाली बदली..

मोठ्या नेत्यांसोबत पंगा घेणारी महिला IPS अधिकारी, २० वर्षात ४० वेळा झाली बदली..

UPSC परिक्षेत पास होऊन IAS IPS होण्याचं अनेकजण स्वप्न बघतात. यामध्ये काहीजण असतात जे चांगली तयारी करून या पदावर पोहचतात देखील. IAS अधिकारी बनल्यानंतर देखील पुढचा प्रवास खूप खडतर असतो. अनेकदा IAS IPS अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आणि सरकारचे चमचे झाल्याचे आरोप होतात. पण असे देखील काही अधिकारी असतात जे कोणापुढे झुकत नाहीत. ते भ्रस्टाचार करणाऱ्यांना देखील सोडत नाहीत आणि सरकारची हांजी हांजी देखील करत नाहीत. ते देशाच्या लोकांच्या सेवेत स्वतःला झोकून देतात.

पण अशा अधिकाऱ्यांना नोकरी करताना अनेक अडचणी येतात. त्यांना चांगले काम करूनही खूप वेळा बदलीला सामोरे जावे लागते. सतत एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी त्यांची बदली होत राहते. आज आपण अशाच एका महिला IPS अधिकाऱ्याबद्दल जाणून घेणार आहोत ज्या पूर्ण इमानदारीने आपली सेवा बजावत असतात. त्या महिला अधिकाऱ्याचं नाव आहे रूपा दिवाकर मौदगिल. त्यांना लोक डी रूपा नावाने देखील ओळखतात. रूपा त्या अधिकाऱ्यांपैकी एक आहे ज्यांना सतत बदल्यांचा सामना करावा लागतो. रूपा यांची २० वर्षाच्या सेवेत आतापर्यंत ४० वेळा बदली झाली आहे. म्हणजेच ६ महिन्यात एकदा तरी त्यांच्या बदलीचा किंवा दुसऱ्या पोस्टिंगचा आदेश निघतो.

डी रूपा या कर्नाटकच्या दावणगेरे येथील मूळच्या आहेत. एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या रूपा यांचे वडील एच दिवाकर हे इंजिनिअर आहेत तर आई हेमवती या गृहिणी आहेत. रूपाचे प्राथमिक शिक्षण दावणगेरेमधेच झालं. त्यानंतर कुवेम्पू विश्वविद्यालयातून त्यांनी ग्रॅज्युएशनच शिक्षण पूर्ण केलं. ग्रॅज्युएशनला गोल्ड मेडल मिळवत रूपा पास झाल्या. पुढे पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी रूपा या बंगळुरू ला गेल्या.

रूपा या जेवढ्या अभ्यासात हुशार होत्या तेवढ्याच त्या गायनात देखील पुढे होत्या. त्यांना गायन खूप आवडायचं. त्यांनी सांस्कृतिक गायनासोबत भरतनाट्यम देखील शिकलं होतं. त्यांच्या मनात लहानपणीपासूनच अधीकारी होऊन देशसेवा करण्याचे स्वप्न होते. त्यांनी UPSC ची तयारी सुरु केली आणि २००० मध्ये त्यांनी UPSC परीक्षेत यश देखील मिळवलं. त्यांचं कर्नाटक केडर मधेच सिलेक्शन झालं. त्या UPSC मध्ये ४३ वि रँक मिळवत पास झाल्या होत्या. रूपा कर्नाटक केडरच्या IPS झाल्या.

पोलीस सेवेत जॉईन झाल्यानंतरही रूपा या भरतनाट्यम आणि सांस्कृतिक गायनाचे धडे घ्यायच्या. त्यांनी काही कन्नड सिनेमांमध्ये गायनही केले आहे. रूपा या शार्प शुटर देखील आहेत. त्यांना यासाठी पुरस्कार देखील मिळाले आहेत. रूपा यांनी २००३ मध्ये IAS मुनीश मौदगिल यांच्याशी लग्न केलं. रूपा या त्यांच्या स्टाइलमुळे नेहमी चर्चेत असतात. त्या सिस्टिमच्या विरुद्ध काम करणाऱ्यांना, गरिबांवर अन्याय करणाऱ्यांना आणि भ्रस्टाचार करणार्यांना कधीच सोडत नाहीत.

त्या अशा आरोपीना नेहमीच समोर आणतात. विशेष म्हणजे त्यांच्यावर कितीही राजकीय दबाव आला तरी त्या झुकत नाहीत. याच कारणाने त्यांची २० वर्षाच्या सेवेत ४० वेळा बदली झाली आहे. गुन्ह्यात सामील असणाऱ्या नेत्यांच्या नजरेत त्या नेहमीच खटकत असतात. एकदा त्यांना बंगळुरू शहर सुरक्षा प्रोजेक्टची जबाबदारी दिली गेली होती. यावेळी त्यांनी वरिष्ठ IPS अधिकारी हेमंत निंबाळकर यांच्यावर टेंडरमध्ये घोटाळा केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर रूपाची तात्काळ बदली करण्यात आली होती.

एकदा त्यांना हातमाग व्यापाराच्या कामकाजाची जबाबदारी देण्यात आली होती. २०१७ मध्ये रूपाने एक मोठा खुलासा केला होता. जेलमध्ये असलेल्या AIADMK च्या नेत्या शशिकला यांना इतर कैद्यांपेक्षा वेगळ्या विशेष सेवा मिळत होत्या. त्यावेळी रूपा यांनी आरोप केला होता कि शशिकला यांना विशेष सेवा देण्यासाठी मध्यवर्ती कारागृहाचे महासंचालक आणि काही पोलीस कर्मचाऱ्यांनी २ कोटीची लाच घेतली आहे. एकदा तर त्या कोर्टाच्या आदेशानंतर मध्यप्रदेशच्या तत्कालीन मुख्यमंत्री उमा भरती यांना अटक करण्यासाठी पोहचल्या होत्या. त्या अशा धडाकेबाज गोष्टींसाठी नेहमीच चर्चेत असतात.

एका मुलाखतीत रूपा यांनी सांगितलं होतं कि त्या बदल्याना बिलकुल घाबरत नाहीत. त्या म्हणतात बदल्या या सरकारी नोकरीचा एक भाग असतात. त्यांनी आजपर्यंत जेवढे वर्ष सेवा केली आहे त्याच्या दुप्पट वेळा त्यांची बदली झाली. यामध्ये कधी कधी त्यांची बदली एखादी मोठी जबाबदारी सांभाळण्यासाठी देखील झाली. तर जास्तीत जास्त वेळा त्यांच्या धडाकेबाज शैलीमुळे त्यांची बदली झाली. त्यांना सोशल मीडियावरून नेहमीच खूप पाठिंबा मिळतो. त्यांना २ वेळा राष्ट्रपती पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं आहे. रूपा यांची हि शैली बघून आपल्या महाराष्ट्राच्या धडाकेबाज अधिकारी तुकाराम मुंढेंची आठवण आल्याशिवाय राहत नाही.

About Mamun

Check Also

आईच्या मृत्यूमुळे आतून तुटलेली अकाउंटंटची मुलगी दुसऱ्या प्रयत्नात टॉपर येत बनली IAS !

यश श्रीमंत किंवा गरीब किंवा लहान, मोठे पाहत नाही, जो योग्य दिशेने कठोर परिश्रम करतो, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *