अंगावर मोस किंवा चामखीळ असणे हे काही आता नवीन राहिले नाही. अनेकांच्या अंगावर या समस्या असतात. याचे कारण म्हणजे शरीरात असणारे ह्यूमन पापिल्लोमा व्हायरस. मोस अथवा चामखीळ शरीरासाठी धोकादायक नसतात पण त्यामुळे शरीराची सुंदरता मात्र खराब होऊ शकते. पण यावर देखील आयुर्वेदिक उपचार आहेत ज्यामुळे तुम्ही यातून सुटका करून घेऊ शकता.
त्वचेवर होणाऱ्या या असमान वाढीला स्किन ट्युमर देखील म्हंटले जाते. त्वचेवर झालेल्या असमान वाढीनेच मोस तयार होतात. जाणून घेऊया काही घरगुती उपाय ज्यामुळे मोस अथवा चामखीळ घालवता येऊ शकते.
यामध्ये सर्वात पहिला उपाय म्हणजे सफरचंदाचं व्हिनेगर. सफरचंदाच्या व्हिनेगरने मोस नाहीशी केली जाऊ शकते. यासाठी रोज कमीत कमी ३ वेळा मोसवर कापसाच्या मदतीने व्हिनेगर लावा. यामुळे त्या मोसचा रंग बदलत जातो आणि काही दिवसात ते नष्ट होते.
लिंबाचा रस देखील यासाठी खूप फायदेशीर आहे. यासाठी तुम्हाला कापसाच्या साहाय्याने मोसवर लिंबाचा रस लावावा लागेल आणि तो कापूस तसाच तिथे लावून ठेवावा लागेल.
बटाट्याचा किंवा अननसाचा रस देखील असाच खूप फायदेशीर आहे. बटाटा किंवा बटाट्याचा रस मोसवर काही दिवस लावल्यास मोस कमी होते. सोबतच तुम्ही अननस रस, कांद्याचा रस, किंवा मधाचा वापर करून देखील यापासून सुटका मिळवू शकता. या सर्वच पदार्थात मोस नष्ट करणारे एंझाइम्स असतात.
बेकिंग सोडा म्हणजेच खायचा सोडा देखील मोस अथवा चामखिळीवर मोठा फायदेशीर ठरू शकतो. यासाठी खायचा सोडा आणि एरं डीचे तेल याचे पेस्ट करा. हे पेस्ट काही दिवस मोसवर लावा. तुम्हाला थोड्याच दिवसात फरक स्पष्ट दिसेल.
लसणाचे आपल्याला असंख्य आयुर्वेदिक फायदे माहिती आहेत. मोसपासून सुटका मिळवण्यासाठी देखील लसूण फायद्याचा आहे. यासाठी लसणाच्या पाकळ्या मोसवर घासा किंवा त्याचे पेस्ट मोसवर लावा. तुम्हाला थोड्याच दिवसात फरक दिसू लागेल.