सध्या कोरोनाच्या सावट असताना आयपीएलचे सामने सुरु आहेत. भारतात कोरोनाने थैमान घातले असताना आयपीएल खेळण्यावर प्रश्नचिन्ह देखील उपस्थित राहिले होते. अनेकांनी BCCI च्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. देशात अनेक रुग्ण बेडविना ऑक्सिजनविना आपले प्राण गमावत आहेत. अशा परिस्थितीत आयपीएल नको असा पवित्रा अनेकांचा होता. पण BCCI मात्र आयपीएल खेळण्यावर ठाम आहे.
आज आयपीएलमध्ये कोरोनाचा शिरकाव देखील झाला असून KKR च्या २ खेळाडूंना आणि CSK च्या ३ मेंबर्सना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे आज होणारा KKR विरुद्ध RCB सामना देखील पुढे ढकलण्यात आला आहे. KKR च्या गोलंदाज वरून चक्रवर्ती आणि संदीप वारीअर या खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. तर पॅट कमिन्स या ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजाला देखील कोरोनाची लक्षणं असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान पॅट कमिन्स हा काही दिवसांपूर्वी खूप चर्चेत आला होता. कारण होतं त्याने कोरोना लढ्यात भारताला देऊ केलेल्या आर्थिक मदतीचं. पॅट कमिन्सने भारताच्या कोरोना लढ्यात हातभार लावण्यासाठी ५० हजार डॉलर्स म्हणजेच ३७ लाख रुपयांची मदत करण्याची घोषणा केली होती. पॅट कमिन्सने इतर खेळाडूंना देखील अशीच आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर अनेकांनी तशी मदत केली देखील. पॅट कमिन्सवर देशभरातून कौतुकाचा वर्षाव त्यानंतर झाला होता.
पॅट कमिन्स हि ३७ लाखांची मदत PM केअर फंड मध्ये देणार होता. यामधून ऑक्सिजन आणि इतर औषधी रुग्णांना पुरवावी अशी त्याची इच्छा होती. त्याला अनेकांनी हि मदत PM केअरला न देता इतर संस्थांना द्यावी किंवा राज्यांना द्यावी अशी विनंती केली होती. दरम्यान पॅट कमिन्सने आता हि ३७ लाखांची मदत PM केअर फंडमध्ये न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने भारताच्या कोरोना लढ्यात मदत करण्यासाठी देऊ केलेली हि रक्कम UNICEF ऑस्ट्रेलियाला दान करण्याचा निर्णय घेतला आहे. ५० हजार डॉलर ही रक्कम PM Care Fundला न देता तो ही रक्कम UNICEF ऑस्ट्रेलियाला देणार आहे.
ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने भारताच्या कोरोना लढ्यात मदत करण्याचं ठरवलं आहे. यासाठी त्यांनी UNICEF ऑस्ट्रेलियाला सोबत घेतलं आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्श असोसिएशन आणि यूनिसेफ ऑस्ट्रेलियाकडून भारताला कोरोना लढ्यात सहकार्य म्हणून आर्थिक मदत जाहीर केली आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने देखील ३७ लाखांची मदत घोषित केली आहे.
याशिवाय क्रिकेट ऑस्ट्रेलियाने इतरांना देखील मदत देण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या या पुढाकाराला पॅट कमिन्सनं साथ दिली असून आधी PM केअर फंडला देऊ केलेली मदत आता क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि UNICEF ऑस्ट्रेलियाला तो देणार आहे. हि मदत भारतातच वापरण्यात येणार आहे. विरोधकांनी पॅट कमिन्सने घेतलेल्या या निर्यणयामुळे जगाला PM केअरचा झोल कळला असल्याची टीका केली आहे. PM केअर फ़ंड भाजपचा फंड झाल्याचे ओळखूनच पॅट कमिन्सने हि मदत दुसऱ्या संस्थेला दिल्याची टीका सोशल मिडीयावर होत आहे.