Monday , June 5 2023
Breaking News
Home / ट्रेंडिंग / ..म्हणून जॅकीदादा थेट मावळमध्ये पोहचला! जॅकी श्रॉफच्या या साधेपणाचे सर्वत्र होत आहे कौतुक

..म्हणून जॅकीदादा थेट मावळमध्ये पोहचला! जॅकी श्रॉफच्या या साधेपणाचे सर्वत्र होत आहे कौतुक

बॉलिवूड म्हंटलं कि डोळ्यासमोर येते ग्लॅमर्स दुनिया. पण या ग्लॅमरस दुनियेत आजही असे अनेक अभिनेते आहेत ज्यांचे पाय जमिनीवर आहेत. आणि याची ते अनेकदा प्रचिती करून देत असतात. मग ते अमिताभ बच्चन असोत किंवा मग मराठमोळे नाना पाटेकर असोत. असंच एक नाव म्हणजे अभिनेता जॅकी श्रॉफ.

बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेता असलेला जॅकी श्रॉफ देखील त्याच्या साधेपणासाठी सर्वश्रुत आहे. त्याच्या या साधेपणाचा नुकताच प्रत्येय आला आहे. झाले असे कि जॅकी श्रॉफकडे काम करणाऱ्या तरुणीच्या आजीचे निधन झाले. हे जेव्हा जॅकी दादाला कळले तेव्हा तो थेट त्या तरुणीच्या घरी पुण्यातील मावळमध्ये कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी पोहचला.

जॅकी दादाकडे काम करतात दीपाली तुपे-

पुणे जिल्ह्यातील मावळमधील पवनानगर येथील दीपाली तुपे या जॅकी श्रॉफ यांच्याकडे काम करतात. काही दिवसांपूर्वी दिपालीच्या आजी तान्हाबाई ठाकर यांचे निधन झाले. तान्हाबाई ठाकर यांनी वयाची शंभरी ओलांडली होती. दिपालीच्या आजीच्या निधनाची बातमी समजल्यानंतर आज सकाळी जॅकी स्वत: दिपालीच्या आजीच्या घरी गेले आणि त्यांनी कुटुंबाचं सांत्वन केलं.

जॅकी श्रॉफने भेट दिलेले फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. हे फोटो बघून अनेक जण जॅकीच्या साधेपणाचे कौतुक करत आहेत. जॅकी यांनी घरातील सर्व सदस्यांशी चर्चा करत त्यांची विचारपूस केली. जॅकी यांच्यासारखा मोठा अभिनेता आजीच्या निधनानंतर सांत्वन करण्यासाठी थेट आपल्या घरी आल्याचे पाहून ठाकर कुटुंब भारावून गेलं.

जॅकी यांनी अगदी सर्वसामान्यांप्रमाणे जमीनीवर बसून घरातील वरिष्ठांचीही चौकशी करत त्यांना धीर दिला. जॅकी श्रॉफ यांचा मावळ येथील चांदखेड येथे बंगला असून मुंबईमधून ते अनेकदा या ठिकाणी आराम करण्यासाठी येत असतात. जॅकी श्रॉफ यांनी आपल्या आयुष्यात खूप संघर्ष केला आहे. एका झोपड्पट्टीतुन सुरुवात केलेल्या जॅकीने आज मोठं यश मिळवलं आहे. त्याला परिस्थितीची जाणीव असल्याने तो आजही साधेपणाने आयुष्य जगतो.

संघर्षमय राहिले आहे जॅकीचे आयुष्य-

लहानपणी तो घरून श्रीमंत नव्हता चाळीतला मुलगा ते बॉलीवूड स्टार त्याचा हा प्रवास अतिशय संघर्षमय होता. तसा जैकी श्रॉफचा परिवार हिरे व्यापारी होते परंतु धंद्यात घाटा झाल्याने त्याच्या वडिलास धंद्यातून बाहेर काढले.

त्यानंतर ते मलबार हिल जवळ एका छोट्याश्या भाड्याच्या खोलीत रहायला लागले. इथेच जैकी श्रॉफ यांचा जन्म झाला वयाचे ३० वर्ष त्यांनी या छोट्याश्या घरात काढली. आजही रोज अंघोळ झाल्यावर जैकी श्रॉफ आपल्या आईच्या फोटोच्या पाया पडतात.

About Mamun

Check Also

धीरूभाई अंबानी यांनी नसली वाडियांची सुपारी दिल्याचा मुबई पोलीस आयुक्तांनी केला होता गौप्यस्फोट

धीरूभाई अंबानी आणि नसली वाडिया ही भारतीय उद्योग जगतातील बलाढ्य अशी नावे आहेत. गुजराती कुटुंबात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *