सलमान खान आज बॉलिवूडचा सर्वात लोकप्रिय अभिनेता आहे. सलमानने मागील काही वर्षात आपल्याला एकसे बढकर एक असे सुपरहिट सिनेमे दिलेत. बॉलिवूडमध्ये सलमान खान सर्वात यशस्वी अभिनेत्यांपैकी एक आहे. सलमानच्या अनेक सिनेमांनी १०० कोटींपेक्षा अधिक कमाई बॉक्स ऑफिसवर केली आहे. त्याच्या वॉटेंड, दबंग, बॉडीगार्ड, एक था टायगर या सिनेमांनी तर २०० कोटींपेक्षा अधीक गल्ला जमवला आहे.
बॉलिवूडच्या लाखो चाहत्यांच्या मनावर सलमान आज अधिराज्य गाजवतो. सलमानच्या तरुणी खासकरून खूप चाहत्या आहेत. सलमानच्या लोकप्रियतेत बिग बोस बॉस या रिऍलिटी शोने अजून भर घातली. त्याचे बिग बॉस मधील सूत्रसंचालन चाहत्यांना प्रचंड आवडते.
सलमानचे आयुष्य अनेक चर्चानी आणि किस्स्यांनी भरलेले आहे. त्याच्या आयुष्यात अनेक वाद आणि संकट देखील आले. पण त्याने खंबीरपणे त्यांचा सामना करत आज आपले स्थान बॉलिवूडमध्ये मजबूत ठेवले आहे.
सलमान खानच्या आयुष्यात लग्न हा विषय अनेक वर्षांपासून खूप चर्चिला जातो. त्याच्या आयुष्यात आजपर्यंत अनेक अभिनेत्री आल्या आणि गेल्या पण त्याचे लग्न काही झाले नाही. खासगी आयुष्यातील अनेक किस्से सलमानने आजपर्यंत सर्वांसमोर शेअर केले आहेत. असाच एक त्याच्या लग्नाचा किस्सा देखील त्याने कॉफी विथ करन शो मध्ये सांगितला होता.
पत्रिका वाटल्यानंतर मोडलं होतं सलमानचं लग्न-
सलमान हा अभिनेत्री संगीत बिजलानी बरोबर जवळपास १० वर्षे रिलेशनमध्ये होता. फिल्म इंडस्ट्रीमध्ये येण्याआधीच दोघे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. १९८६ पासून नात्यात असलेल्या या दोघांनी लग्न करायचं देखील ठरवलं होतं. दोघांचं लग्न जमलं, पत्रिका छापल्या गेल्या आणि त्या वाटण्यातही आल्या. पण पत्रिका वाटल्यानंतर या दोघांचं लग्न मोडलं.
या लग्नाला कारण ठरले एकमेकांवरचा विश्वास. सलमानच्या आयुष्यात त्यावेळी एक दुसरी मुलगी आली. सोमी अली त्यावेळी सलमानच्या आयुष्यत आली आणि पुढचं सर्व घडलं. सांगितलं सलमान फसवत असल्याचं समजलं आणि तिने लग्न करण्यास नकार दिल्याचे म्हंटले जाते.
त्या घटनेनंतर संगीताने भारतीय क्रिकेट टीमचा माजी कप्तान मोहोम्मद अझरुद्दीनसोबत लग्न केले तर सलमानने सिंगल राहाणेच पसंत केले. संगीता आणि सलमान यांचे लग्न मोडल्यानंतर देखील त्यांनी त्यांच्यात असलेले मैत्रीचे नाते टिकवून ठेवले आहे. आजही सलमानच्या घरगुती कार्यक्रमात संगीता आवर्जून हजेरी लावते.