कदाचित आपण राधाविनोद पाल या थोर माणसाचे नाव कधीच ऐकले नसेल. भारतातील अनेक लोकांना हा व्यक्ती कोण आहे हे देखील माहित नाही. पण जपानमध्ये मात्र या माणसाचा बोलबाला आहे. तिथं केवळ या माणसाला ओळखतात किंवा त्यांना माहित आहे असं नाही, तर जपानमध्ये या माणसाची पूजा केली जाते. जपानच्या यासुकूनी मंदिर आणि क्योटोमधील योर्जेन गोकोकू मंदिरात या माणसाच्या आठवणी म्हणू एक विशेष स्मारक बनवण्यात आले आहे.
कोण आहे ही व्यक्ती ?
दुसऱ्या महायुद्धानंतर जपानने केलेल्या युद्ध गुन्हांबाबत आंतरराष्ट्रीय न्यायालयात “टोकियो ट्रायल्स” मध्ये हा खटला सुरु होता. त्या खटल्यात राधाविनोद पाल हे न्यायाधीश म्हणून काम पाहत होते. ब्रिटिश सरकारने त्यांना भारताचा प्रतिनिधी बनवले होते.
खटल्यातील एकूण ११ न्यायाधीशांपैकी राधाविनोद पाल हे एकमेव असे न्यायाधीश होते, ज्यांनी सर्व युद्धगुन्हेगार निर्दोष असल्याचा निर्णय दिला होता. या युद्धकैद्यांमध्ये जपानचे तत्कालीन प्रधानमंत्री हिदेकी तोजो यांच्यासोबतच २० पेक्षा जास्त नेते आणि सैन्य अधिकाऱ्यांचा समावेश होता.
न्यायाधीश पाल यांनी आपल्या निर्णयामध्ये असे सांगितले होते की, कोणतीही घटना घडून गेल्यानंतर त्याबाबत कायदे करणे आणि त्यानुसार गुन्हेगारांना शिक्षा देणे योग्य नाही आणि म्हणूनच आम्ही सर्व युद्धकैद्यांवर खटला चालवणे ही महायुद्धातील विजयी देशांनी केलेली बळजबरी आहे. त्यामुळेच मि सर्वांना सोडून देण्याचा निर्णय दिला होता. मात्र अन्य न्यायाधीशांनी त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. याच कारणाने जपानमध्ये अजूनही त्यांचा “महान व्यक्ती” म्हणून सन्मान केला जातो.
२००७ साली जेव्हा जपानचे प्रधानमंत्री शिंजो आबे भारत दौर्यावर आले होते, तेव्हा त्यांनी कोलकाता येथे राधाविनोद पाल यांच्या मुलाची भेट घेतली आणि छायाचित्रांची देवाणघेवाण केली. त्या काळातील युद्धगुन्हेगारांमध्ये शिन्झो आबे यांचे आजोबा नोबुसुके किशी यांचेही नाव होते, जे नंतर पंतप्रधान झाले.