आजपर्यंत आपण अनेक महागड्या भाज्या खाल्ल्या असतील किंवा बघितल्या असतील. पण आज अशा शेतकऱ्याविषयी जाणून जो आपल्या शेतात थोडी थोडकी नव्हे तर तब्बल १ लाख रुपये प्रतिकिलोने विकणारी भाजी शेतात पिकवतोय. तुमचा विश्वास बसणार नाही पण या भाजीला खरोखर एवढा भाव मिळतोय. आता हि भाजी वापरली पण तशाच ठिकाणी जाते ना. या भाजीला बिअरमध्ये फ्लेवरिंग घटक म्हणून वापरले जाते.
या भाजीचं उत्पन्न घेणारा हा शेतकरी आहे बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यातील नवीनगर भागाच्या करमडीह गावचे ३८ वर्षीय अमरिश सिंह. अमरीश सिंह हे या भाजीच उत्पन्न भारतात घेणारे पहिले शेतकरी बनले आहेत. या भाजीचं नाव आहे हॉप-शूट्स (hop-shoots). हॉप-शूट्सचा शोध सर्वप्रथम ११ व्या शतकात लागला होता. याचा वापर बिअर मध्ये केला जातो. याशिवाय अन्य काही आजारांवर प्रभावी ठरणाऱ्या औषधींमध्ये देखील हे उपयुक्त आहे.
हॉप-शूट्समध्ये एक ऍसिड असतं ज्याचं नाव ह्यूमोलोन्स (humulones) और ल्यूपोलोन्स (lupulones) आहे. असे देखील म्हंटले जाते कि हे ऍसिड माणसाच्या शरीरातील कॅन्सर सेल्सला नष्ट करण्यात महत्वाची भूमिका बजावते. ह्या सर्व गुणांमुळेच हि सर्वात महागडी भाजी आहे. या भाजीला सहा वर्षांपूर्वी १००० पाउंड्स म्हणजेच जवळपास १ लाख रुपये किलो असा भाव मिळाला होता.
युरोपियन देशांमध्ये या भाजीच उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. वाराणसीतील भारतीय सब्जी अनुसंधान संस्थानमधील कृषी शास्त्रज्ञ डॉ. लाल यांच्या देखरेखीखाली अमरिश यांची शेती सध्या केली जात आहे. वाराणसीच्या या संस्थेमधून सर्वात आधी बीज घेऊन ते अमरीश यांनी २ महिन्यांपूर्वी आपल्या शेतात लावलं आहे. त्यांना विश्वास आहे कि त्यांना या शेतीमध्ये यश मिळेल आणि हि शेतकऱ्यांसाठी एक मोठी क्रांती ठरेल.
हॉप-शूट्सचे फळं, फुल, आणि मूळ हे सर्वच पेय पदार्थ बनवण्यासाठी, बिअर बनवण्यासाठी आणि अँटिबायोटिक्स गोळ्या बनवण्यासाठी वापरली जातात. या भाजीचा वापर टीबीवरील औषधी बनवण्यासाठी देखील केला जातो. युरोपियन देशात तर हे त्वचेच्या चकाकी साठी आणि युवा राहण्यासाठी वापरले जाते. या भाजीमध्ये एंटीऑक्सीडेंट मोठ्या प्रमाणात आढळते. हॉप शूट्स पासून बनलेली औषधी पचनक्रिया सुधारण्यास उपयुक्त आहेत शिवाय डिप्रेशन पासून सुटका मिळते.
भारतात हिमाचल प्रदेशमध्ये देखील हि शेती ट्राय करण्यात आली होती. पण जास्त बाजारभाव असल्याने या भाजीला बाजारपेठ मिळाली नव्हती. शेतकऱ्याने आधी बाजारपेठ कुठे उपलब्ध आहे हे अभ्यास केला नव्हता. आता अमरीश याना मात्र सर्व विश्वास आहे कि त्यांचे पीक हे लाख रुपये किलोने बाजारात विकले जाईल. अमरिशने हि शेती हिमाचल प्रदेशमधूनच शिकली होती.
अमरीश सिंह यांनी पंतप्रधान मोदींना देखील आवाहन केलं आहे कि या शेतीला प्रोत्साहन द्यावं. या भाजीच्या शेतीने शेतकऱ्यांचे उत्पन्न अनेक पटीने वाढू शकते. भविष्यात हा प्रयोग यशस्वी ठरला तर देशातील शेतकऱ्यांसाठी अच्छे दिन येऊ शकतात हे मात्र नक्की.