रंगा-बिल्ला ही नावं आपण अनेकदा कुठे ना कुठे वाचली असतील. हिंदी किंवा मराठी चित्रपटामध्ये तर तुम्ही हमखास ही नावे ऐकली असतील. वास्तविक पाहता ही काही काल्पनिक नावे नाहीत. ७० च्या दशकात खरोखरच भारतामध्ये रंगा आणि बिल्ला या नावाचे कुख्यात गुन्हेगार होऊन गेले आहेत. या दोघांची नावे एकाचवेळी घेतली जातात, कारण या दोघांनी जे काही गुन्हे केले ते सगळे एकत्र मिळूनच केले.
७० च्या दशकात छोट्यामोठ्या चोऱ्यामाऱ्या करत गुन्हेगारी विश्वात पाऊल टाकणारे रंगा म्हणजेच कुलजित सिंह आणि बिल्ला म्हणजेच जसबीर सिंह हे दोघे कुख्यात गुहेगार म्हणून गाजले होते. त्याकाळात रंगबिल्लाच्या गुन्ह्यांची चर्चा परदेशातही होत असे. १९७८ साली या दोघांच्या नावावर अनेक अप हरण आणि ह त्येच्या घटना नोंद झाल्या. एक वेळ तर अशी आली होती की त्यांच्या गुन्हेगारीमुळे भारताचे तत्कालीन प्रधानमंत्री मोरारजी देसाई हे देखील टेंशनमध्ये आले होते.
त्याचं झालं असं की रंगा आणि बिल्ला या दोघांनी २६ ऑगस्ट १९७८ यादिवशी गीता (वय १६) आणि संजय (वय १४) नावाच्या दोन बालकांचे खंड णीसाठी अप हरण केले होते. परंतु नंतर त्यांना समजले की ज्या बालकांचे आपण अप हरण केले आहे, ती तर एका नौदल अधिकाऱ्याची मुलं आहेत. हे समजताच त्या दोघांनी मिळून दोन्ही बालकांवर अनैतिक अत्या चार केले आणि दोन्ही बालकांची ह त्या केली. अप हरणाच्या दोन दिवसानंतर २८ ऑगस्ट १९७८ रोजी दोन्ही बालकांचे मृतदेह मिळाले.
या घटनेने दिल्लीसहित संपूर्ण देशाला हादरवून सोडले होते. परदेशातही या घटनेचे पडसाद उमटले. त्यानंतर लोकांच्या मनात रंगा बिल्लाची दहशत निर्माण झाली. देशभरातून आक्रोश सुरु झाला. लोक रस्त्यावर आले. संसदेत विरोधी पक्षांनी तत्कालीन प्रधानमंत्री मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखालील सरकारची अक्षरशः पिसे काढली. रंग बिल्लाला पकडण्यासाठी विरोधक आणि मीडियाच्या वाढत्या दबावामुळे मोरारजी देसाई चिंतेत पडले. त्यांनी स्वतः या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले.
रंगा बिल्लाला पकडणे हा पोलिसांच्या आणि केंद्रातील सरकारच्या इज्जतीचा विषय बनला होता. दिल्ली पोलिसांनी जंग जंग पछाडले. घटनेच्या दोनच आठवड्यात ८ सपटंबर १९७८ रोजी त्यांना यात यश आले. रंगा बिल्ला हे दोघे आग्र्यामध्ये रेल्वे स्टेशनवर कालिका मेलमध्ये चढले. परंतु ते ज्या डब्यात चढले तो डब्बा सैनिकांसाठी आरक्षित होता. एका सैनिकाने वर्तमानपत्रात छापलेल्या चित्रावरुन रंगाबिल्लाला ओळखले. त्यानंतर त्यांना अटक करुन तिहार जेलमध्ये पाठवले.
चार वर्षे या प्रकरणाची सुनावणी चालली. १९८२ मध्ये रंगबिल्लाला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. ज्यावेळी दोघांना फाशी देण्यासाठी तख्ताच्या ठिकाणी आणण्यात आले. दोघांना फाशी देण्यात आली. २ तास दोघांचे देह लटकत ठेवल्यानंतर त्यांना खाली उतरवण्यात आले. उतरवल्यावेळी जेव्हा डॉक्टरांनी तपासणी केली, तेव्हा दोन तासानंतरही रंगाची नाडी चालू असल्याचे आढळले. त्यानंतर पुन्हा एकदा रंगाच्या फाशीचा दोर खेचण्यात आला आणि तेव्हा कुठे रंगाने प्राण सोडला.