कोरोनाची वाढती लोकसंख्या लक्षात घेता राज्यात लॉकडाऊन लागणार हे अटळ होतं. मागील ३-४ दिवसांपासून याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेक बैठक घेतल्या. अखेर आज राज्यात मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. उद्या म्हणजेच १४ एप्रिलला रात्री ८ वाजल्यापासून राज्यात कडक संचारबंदी लागू करण्यात आली. एखाद अत्यावश्यक काम सोडलं तर बाकी नागरिकांना घराबाहेर पडता येणार नाहीये.
या लॉकडाऊन मध्ये एक महत्वाची बाब म्हणजे मागील वेळी लॉकडाऊन मध्ये जसं सर्व वाहतूक व्यवस्था बंद झाली होती. तशी वाहतूक व्यवस्था बंद होणार नाहीये. सरकारी वाहतूक व्यवस्था अत्यावश्यक कामासाठी चालू राहणार आहे. १५ दिवसांसाठी हे कडक निर्बंध लागू राहणार आहेत. १४ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत कडक निर्बंध म्हणजेच एकप्रकारचा मिनी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.
१. उद्या रात्रीपासून अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व सेवा बंद राहणार आहेत. अत्यावश्यक सेवा देखील सकाळी ७ ते रात्री ८ या वेळात सुरु राहतील. २. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चालू राहणार आहे. लोकल, बस सुरू राहतील. पण त्या अत्यावश्यक, जीवनावश्यक सेवा देणाऱ्या वर्गाला येण्या-जाण्यासाठी चालू राहतील. व काही खर्च महत्वाचे कारण असेल तर नागरिकांना ते वापरता येईल.
३. बँका सुरू राहणार आहेत. दूरसंचार सेवा आणि त्यांच्याशी संबंधित देखभाल सेवा सुरू राहतील. अधिसूचनाधारक पत्रकारांना मुभा देण्यात आली आहे. पेट्रोल सेवांना मुभा देण्यात आली आहे. ४. बांधकाम साईट्सवर मजुरांची राहण्याची सोय करावी बांधकाम व्यावसायिकांना करण्यास सांगितले गेले आहे. ५. हॉटेल, रेस्टॉरंट यांच्यामधून होम डिलीव्हरी आणि टेक अवेला परवानगी असेल. तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं लसीकरण बंधनकारक असेल.
६. मंगळवेढा-पंढरपूरमध्ये पोटनिवडणूक असल्याने तिथे मतदान झाल्यावर निर्बंध लागू होणार आहेत. ७. जनावराचे रुग्णालय सुरु राहतील. ८. पावसाळी पूर्व कामं सर्व सूरू राहतील. ९. मेडिकल, किराणा दुकाने सुरु राहणार. १०. बी बियाणे, खताची दुकाने, शीतगृहे, शेतीची कामे सुरु राहणार. १०. औदयोगिक क्षेत्रातले उद्योगधंदे सुरु राहणार आहेत. ११. कामगारांसाठी वाहतूक व्यवस्था करावी लागणार. १२. हॉटेल रेस्टोरंट बार बंदच राहणार. १३. अत्यावश्यक सेवेतील सर्व उद्योग सुरु राहणार.
मुख्यमंत्र्यांनी केली मदतीची घोषणा-
१. पुढील एक महिन्यासाठी गरिब लाभार्थ्यांना तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ मोफत देणार. ७ कोटी लोकांना याचा लाभ मिळणार. २. गोर गरिबांना शिवभोजन थाळी एक महिना मोफत देणार ३. अधिकृत फेरीवाल्यांना १५०० रुपये आर्थिक मदत मिळणार. ४. नोंदणी असलेल्या रिक्षाचालकांना १५०० रुपये आर्थिक मदत मिळणार. ५. नोंदणीकृत बांधकाम कामगारांना प्रत्येकी १५०० रुपये अर्थसहाय्य. ६. आदिवासी बांधवांना खावटी सहाय्य योजनेतून २ हजार रुपये मिळणार.
७. कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी ५ हजार ४०० कोटी रुपयांची मदत. ८. आरोग्य सुविधा वाढवणे, व्हेटिंलेटर्स किंवा तत्सम सुविधांसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे ३ हजार ३०० कोटी रुपयांचा निधी तात्काळ उपलब्ध करून देणार. ९. संजय गांधी निराधार, श्रावळ बाळ योजना, इंदिरा गांधी निवृत्ती योजना अशा पेन्शन लाभार्थ्यांना १ हजार रुपये आगाऊ देण्यात येणार.