Monday , June 5 2023
Breaking News
Home / ट्रेंडिंग / रेल्वे स्टेशनवर अंध महिलेच्या लहान मुलाला वाचवणारा तो मुंबईचा पॉईंटमन नेमका आहे तरी कोण?

रेल्वे स्टेशनवर अंध महिलेच्या लहान मुलाला वाचवणारा तो मुंबईचा पॉईंटमन नेमका आहे तरी कोण?

आज सकाळपासून एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ वांगणी स्टेशनचा आहे. संध्याकाळी ५ वाजून ३ मिनिट या व्हिडिओमध्ये टाइम दिसत आहे. या व्हिडिओमध्ये एका महिलेसोबत प्लॅटफॉर्मवर चालणारा मुलगा अचानक तोल जाऊन खाली प डतो. तो मुलगा ट्रॅकवर पडला तेव्हाच समोरून एक ट्रेन येत असते. ती बिचारी महिला मात्र मुलगा कुठे पडला हे चाचपडत बघत होती.

कावरी बावरी झालेल्या त्या महिलेला मुलगा कुठे गेला हे कळेना झालं. लहान मुलगा जेव्हा रेल्वेच्या ट्रकवर पडला नेमक्या त्याच वेळेला उदयन एक्सप्रेस त्या मुलाच्या दिशेने येत होती. हे दृश्य एका व्यक्तीने बघितलं आणि ती व्यक्ती आपल्या जि वाची पर्वा न करता त्या मुलापर्यंत पोहोचली. पटकन त्याने मुलाला उचललं आणि प्लॅटफॉर्मवर फे कून दिलं आणि तो स्वतः विजेच्या गतीने प्लॅटफॉर्मवर चढला. तो व्यक्ती म्हणजे रेल्वेचा पॉइंटमन मयूर शेळके. मयूर हा वांगणी गावचाच रहिवाशी आहे.

मयूर कर्तव्यावर होता. त्याही परिस्थितीत त्याने आपल्या हातातील हिरवा झेंडा सोडला नाही. मयूर हा पॉईंटमन आहे. पॉईंटमन म्हणजे ट्रेनला पुढे जाण्यासाठी ट्रॅक सुरक्षित आहे म्हणून हिरवा झेंडा दाखवण्याचं काम असो की जिथे ट्रॅक एकमेकांत गुंतलेले असतात तिथे सगळं आलबेल आहे हे पाहण्याचं काम करतात. मयूर नसता तर त्या मातेने आपल्या मुलाला कायमचं गमावलं असतं. मोठा अ पघात आणि दुर्दैवी घटना होण्यापासून मयूर शेळकेने वाचवलं.

‘मयूर हा खराखुरा हिरो आहे, मयूर नसता तर त्या मुलाला वा चवले कठीण झालं असतं. कदाचित मयूरचा स्वतःचाही या झटापटीत जी व गेला असता किंवा त्याला अ पंगत्व आलं असतं. पण या सगळ्याची पर्वा न करता त्याने त्याला वाचवलं. मयूरचे काम इतरांसाठीही आदर्श घेण्यासारखे आहे. देव असला तर माणसातच असतो हे अशा घटनांतून अधिक प्रकर्षाने जाणवतं’ असे गौरवोद्गार काढले आहेत समीर गायकवाड यांनी.

मयूरने मीडियाला प्रतिक्रिया देताना म्हंटले आहे, “एक अं ध महिला फलटावरुन चालत असताना अचानक तो मुलगा तिच्या हातातून सटकला आणि रेल्वे रुळावर जाऊन पडला. त्याचवेळे मी झेंडा दाखवण्याचं काम करतो. माझ्यासमोर ही घटना घडत असल्याने याशिवाय उद्यान एक्सप्रेम मुंबईच्या दिशेना येताना बघून त्या मुलाला वाचवण्याची जिद्द माझ्या मनात आली. त्या मुलाला वाचवण्यासाठी शर्थीने प्रयत्न केले. मुलाला वाचवण्यात मला यश आलं. याबद्दल मला खूप आनंद झाला. मुलगा सुखरुप असल्याने मला समाधान वाटलं”.

या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज सकाळपासून प्रचंड वायरल झालं. हा व्हिडीओ बघून अनेकांनी मयूर शेळकेला राष्ट्रपती शौर्य पुरस्कार द्या अशी मागणी केली. या घटनेचा व्हिडीओ रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी देखील ट्विट केला आहे. त्यांनी ट्विट करत मयूरच्या धाडसाचं कौतुक केलं. तसेच मुंबईच्या डीआरएम यांनीही मयूरला पुरस्कार जाहीर करत त्याच्या धाडसाचं कौतुक केलं. तर वांगणीच्या ग्रामस्थांनीही त्याचं कौतुक करत त्याला राष्ट्रपती शौर्य पुरस्कार मिळावा, अशी मागणी केली.

बघा व्हिडीओ-

About Mamun

Check Also

धीरूभाई अंबानी यांनी नसली वाडियांची सुपारी दिल्याचा मुबई पोलीस आयुक्तांनी केला होता गौप्यस्फोट

धीरूभाई अंबानी आणि नसली वाडिया ही भारतीय उद्योग जगतातील बलाढ्य अशी नावे आहेत. गुजराती कुटुंबात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *