केंद्रीय रस्ते आणि महामार्ग विकास मंत्री आणि भाजपाचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांना भारताचे रोडमॅन म्हणून ओळखलं जाऊ लागलं आहे. नितीन गडकरींच्या कार्यकाळात देशात रेकॉर्डब्रेक अशी रस्त्यांची निर्मिती होत आहे. देशभरात चांगल्या रस्त्यांचं जाळं नितीन गडकरी खूप वेगाने विनत आहेत. देशात मागील आर्थिक वर्षात २६.११ किलोमीटरच्या गतीने जवळपास ७५७३ किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग निर्माण करण्यात आला आहे. रस्ते बनवण्यासाठी नितीन गडकरी हे आताच नाही तर अगदी १९९५ मध्ये ते राज्यात मंत्री होते तेव्हापासून प्रसिद्ध आहेत.
नितीन गडकरी यांच्याच कार्यकाळात मुंबई-पुणे हा प्रसिद्ध एक्सप्रेस वे बनवण्यात आला होता. नितीन गडकरींची खासियत म्हणजे ते रस्ता बनवण्यासाठी पैशांची कशी बचत होईल आणि तो कसा कमीत कमी मध्ये बनेल यासाठी प्रयत्न करतात. अगदी एकदा तर त्यांनी धीरूभाई अंबानी यांच्यासोबत पंगा घेतला होता. धीरूभाईंना त्यांनी मिशी काढून देईल असे चॅलेंज दिले होते. जाणून घेऊया काय आहे तो पूर्ण किस्सा..
धीरूभाई अंबानी हे एक खूप मोठे उद्योजक होते. त्यावेळी राज्यात युतीचं सरकार होतं. एका रोडच्या कामाचं टेंडर निघालं होतं. त्यात धीरूभाईंनी ३६०० कोटींचं सर्वात कमी टेंडर भरलं होतं. पण नितीन गडकरींना विश्वास होता कि तो रस्ता २००० कोटीत पूर्ण होईल. पण सर्वात कमी टेंडर तर ३६०० कोटींचं होतं. त्यामुळे मंत्रीमंडळातील सहकारी म्हणाले सर्वात कमी ज्याचं टेंडर त्याला ते मिळायला हवं. गडकरींनी उपमुख्यमंत्री मुंडेंना याबद्दल सांगितले. २००० कोटीच्या कामाला ३६०० कोटी खूप होताय असे ते म्हणाले. टेंडर रिजेक्ट करावे असे सुचवले.
पण त्यावेळी धीरूभाईंचा मोठा दबदबा होता. पण गडकरींनी मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि मुंडेंना समजावलं आणि मी स्वस्तात रोड करण्यासाठी मार्ग काढतो असे ते म्हणाले. सरकारकडे त्यावेळी एवढे पैसे नव्हते. त्यामुळे पैसे कुठून आणणार असा प्रश्न जोशींनी केला. गडकरी म्हणाले माझ्यावर विश्वास ठेवा मी करतो सोय. तू काहीही करू शकतो यावर विश्वास आहे म्हणून मुख्यमंत्री जोशींनी ते टेंडर नाकारलं.
धीरूभाईंचे बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजनांसोबत खूप चांगले संबंध होते. धीरूभाई टेंडर नाकारल्याने नाराज झाले. त्यांनी नाराजीही व्यक्त केली होती. प्रमोद महाजन यांनी नितीन गडकरींना धीरूभाईंना जाऊन भेटून समजव असे सांगितले. नितीन गडकरी एकेदिवशी धीरूभाईंना भेटायला गेले. अनिल मुकेश धीरूभाई आणि गडकरी यांनी सोबत जेवण केलं. जेवता जेवता धीरूभाई नितीनला म्हणाले कसा बनवणार रोड? टेंडर तर नाकारलं आता कसं होणार.
बोलता बोलता धीरूभाईंनी नितीन गडकरींना चॅलेंजच केलं. ते म्हणाले मी असे खूप बघितले करणारे पण काहीच होणार नाही. नितीन यांना देखील ते शब्द लागले. नितीन म्हणाले धीरुभाई हा रोड जर मी बनवला नाही ना तर या ज्या माझ्या मिशा आहेत त्या कापून टाकेल. बनवला तर तुम्ही काय करणार असं देखील विचारलं. त्यांची मिटिंग संपली. नितीन समजवायला गेले आणि चॅलेंज देऊन नाराजच करून आले.
नितीन गडकरींनी त्यावेळी राज्यात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची स्थापना केली. पैसे कुठून येणार हा प्रश्न होता. नितीन गडकरींनी अनेक कंपन्यांना पैशांसाठी प्रस्ताव पाठवले. त्या रस्त्यासाठी पैसे मिळाले. मनोहर जोशी आणि गोपीनाथ मुंडे यांच्या सहकार्याने आणि मुंगीरवार या अभियंत्यांच्या निगराणीत काम सुरु झाले. ते काम नितीन गडकरींनी २००० कोटींपेक्षा कमीतच करून दाखवल.
धीरूभाईंनी एकेदिवशी तो रोड झाल्याचं हेलिकॉप्टर मधून बघितलं. नितीन गडकरींना त्यांनी लगेचच भेटायला बोलावलं. मेकर चेंबरला ते पुन्हा भेटले. भेटल्यावर धीरुभाई म्हणाले ‘नितीन मै हार गया तुम जीत गये’. तू करून दाखवलंस आणि रोड झाला. नितीन गडकरींना धीरूभाई म्हणाले तुझ्यासारखे ४-५ लोक जर देशात असतील तर देशाचं नशीबच बदलेल. धीरूभाई सारख्या मोठ्या व्यक्तीसोबत सरकारचे पैसे वाचवण्यासाठी पंगा फक्त नितीन गडकरीच घेऊ शकतात. सलाम नितीनजींच्या कार्याला.