भारतीय राजकारणामध्ये लालूप्रसाद यादव या व्यक्तिमत्वाने स्वतःची अशी एक वेगळी छाप उमटवली आहे. भारतीय राजकारणाची नस ना नस जाणून असणारा हा नेता आपल्या वक्तृत्व आणि विनोदशैलीबद्दल प्रसिद्ध आहे. त्यांचा स्वभाव मजेदार आहे. जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनाने प्रभावित होऊन राजकारणात त्यांनी प्रवेश केला. व्हायच्या अवघ्या २९ व्या वर्षी ते खासदार बनून संसदेत गेले. राबडीदेवी या त्यांच्या पत्नी होत. त्यांना सात मुली आणि २ मुलं आहेत. पाहूया लालूंचे काही खास किस्से…
तुरुंगात जाण्यापासून वाचण्यासाठी दवाखान्यातील सगळी औषधं गायब केली
विद्यार्थीदशेत असताना लालू यांनी जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनात भाग घेतला होता. आंदोलनादरम्यान एकदा त्यांना अटक झाली. त्यावेळी तुरुंगात जाण्यापासून वाचण्यासाठी सर्वांनी अल्सर झाल्याचे नाटक केले आणि सर्वांना पटनामधील पाटलीपुत्र हॉस्पिटलच्या कैदी वॉर्डमध्ये ऍडमिट करण्यात आले. तुरुंगात जाणं लांबणीवर टाकायचं असेल तर आपल्याला जास्तीत जास्त दिवस दवाखान्यात राहावं लागेल हे लालूंनी ओळखले होते.
अल्सरच्या निदानासाठी बेरियम मिल एक्सरे चाचणी घ्यावी लागायची. त्यावेळी लालूंनी स्टोअरलाच मॅनेज केले आणि बेरियम मिल एक्सरे चाचणीसाठी लागणारी पावडर गायब केली. पावडर नसल्याने चाचणीचा घेता आली नाही आणि लालूंचा डाव यशस्वी झाला.
मुस्लिम मतं मिळवण्यासाठी निवडणुकीत ओसामा बिन लादेनचा सारखा दिसणारा माणूस फिरवला
२००५ च्या बिहार विधानसभा निवडणूक लागल्या होत्या. लालू विरुद्ध नितीश कुमार असे त्या निवडणुकीला स्वरुप आले होते. निवडणुकीत मुस्लिम फॅक्टर महत्वाचा घटक होता. लालूंनी एक शक्कल लढवली. २००१ मध्ये ओसामा बिन लादेनच्या वर्ल्ड ट्रेंड सेंटरवरील हल्ल्यानंतर अमेरिकेने आपला मुस्लिमविरोध बळकट केला होता. हीच गोष्ट लालूंनी डोळ्यासमोर ठेवली. बिहारमधील मुस्लिमांना आपल्याकडे वळवण्यासाठी त्यांनी चक्क ओसामा बिन लादेन सारखे दिसणाऱ्या मिराज नूर नावाच्या व्यक्तीला प्रचारसभांमध्ये फिरवले. भाषणामध्ये अमेरिकेच्या मुस्लिमविरोधी नीतीवर टीका करवल्या. यावरुन त्याचाय्वर टिळकही झाली.
मुख्यमंत्री निवास सोडताना त्यात चक्क भूत सोडून गेले
२००५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत लालूराज संपून नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री बनले. त्यानंतर लालूंना मुख्यमंत्री निवासस्थान सोडावे लागले, कारण नितीश कुमार मुख्यमंत्री या नात्याने त्यात राहायला येणार होते. २००६ मध्ये प्रत्यक्ष ज्यावेळी नितीश कुमार मुख्यमंत्री निवासात राहायला आले, तेव्हा त्यांनी पाहिले की लालू आणि राबडी यांनी जाताना निवासस्थानावरुन दोन फूट खड्डा करुन त्यातील माती घेऊन गेले होते.
घरच्या भिंतींवर अनेक ठिकाणी छोट्या पुड्या ठेवल्या होत्या. नितीश कुमारांना हा काय प्रकार आहे ते कळत नव्हते. तेव्हा त्यांना लालूंचा एक जुना किस्सा आठवला. त्यात लालूंनी नितीश कुमारांना सांगितले होते की मी मुख्यमंत्री निवासस्थानी भूत सोडून आलोय. पण नितीश कुमार यांनी आपण आहे गोष्टींवर विश्वास ठेवत नसल्याचे सांगितले.