अमरावतीच्या मेळघाट हरिसाल व्याघ्र प्रकल्पात कार्यरत RFO आणि लेडी सिंघम दिपाली चव्हाण यांनी लिहिलेल्या नोटमध्ये विनोद शिवकुमार याच्यासोबत झालेल्या कॉलच्या रेकॉर्डिंगचा उल्लेख केला होता. यामध्ये दिपाली यांनी आपण विनोद कुमार यांच्याशी बोलत असल्याचा दावा केलाय. दिपाली यांनी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनाही हे कॉल रेकॉर्डिंग ऐकवलं होतं.
कोण आहेत दीपाली चव्हाण?
वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण यांची अत्यंत कर्तव्यदक्ष अधिकारी अशी त्यांची ओळख होती. दीपाली चव्हाण या मूळच्या मराठवाड्यातल्या होत्या. २०१५ मध्ये दीपाली यांनी महाराष्ट्र वनसेवा परीक्षेत यश मिळवलं होतं. मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या गुगामल वन्यजीव विभागात हरिसाल येथे गेल्या पाच वर्षांपासून त्या कार्यरत होत्या. तडफदार अधिकारी असलेल्या दिपाली चव्हाण दोन वर्षांपूर्वीच राजेश मोहिते यांच्यासोबत विवाह बंधनात अडकल्या होत्या.
दीपाली चव्हाण यांचं सासर अमरावती जिल्ह्यातील लोणी टाकळी हे होतं. त्यांचे पती राजेश मोहिते हे अमरावती जिल्हा कोषागार कार्यालय येथे शासकीय सेवेत कार्यरत आहेत. धारणी येथून २५ किमी अंतरावरील हरिसाल येथे वन्यजीव विभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून पोस्टिंग मिळाल्यांनंतर दीपाली खूप खूष होत्या.
विनोद शिवकुमार या वरिष्ठ अधिकाऱ्याने त्यांना मानसिक त्रास दिला व दबाव टाकला. शिवकुमारला अटक झाली असून निलंबनाची कारवाई देखील झाली आहे. ऐका रेकॉर्डिंग..
दीपाली चव्हाण यांच्या कॉल रेकॉर्डिंगमध्ये नेमका काय संवाद आहे? ऐका-