जीवनात अनेकदा अडचणी येत असतात. पण त्या अडचणींचा सामना तुम्ही कसा करता आणि त्यावर कशी मात करता यावर तुमचं यश अवलंबून असतं. आज एका अशा मुलाबद्दल जाणून घेऊया जो आपल्या वडिलांसोबत चहाच्या टपरीवर काम करत होता तो आज CA बनला आहे. त्याने मिळवलेला यश हे प्रत्येक गरिबाला प्रेरणा देणारे आहे.
एकदा का आयुष्यात काही करायचं ठरवलं आणि त्याला मेहनत आणि जिद्दीची साथ मिळाली तर यश मिळतंच हे दाखवून दिल आहे आग्रा शहरातील मनोज अग्रवालने. गोष्ट २०१६ ची आहे जेव्हा मनोज हा २२ वर्षांचा होता. मनोजचे नाव सर्व मीडियामध्ये झळकले होते. कारण तो वडिलांसोबत चहा विकून CA बनला होता.
मनोज हा आग्रा राष्ट्रीय महामार्गाच्या जवळ आपल्या वडिलांसोबत चहाच्या दुकानावर मदत करायचा. तो चहा विकायचा खरा पण त्याचे करिअरकडे देखील लक्ष होते. तो खूप अभ्यास करायचा. मनोजला ५ बहीण भाऊ आहेत. तो या सर्वांमध्ये जास्त शिकलेला आहे. मनोजला शिक्षण घेण्याची प्रेरणा हि वडिलांच्या संघर्षामुळेच मिळाली.
वडिलांचा संघर्ष बघूनच शिक्षण घेऊन मोठं काही तरी करायचं असं त्याने ठरवलं. वडिलांनी देखील मनोजला खंबीर साथ दिली. आज मनोज त्याच्या यशाचे श्रेय वडिलांनाच देतो. वडिलांनी सपोर्ट केला नसता तर मी CA बनलोच नसतो असे तो सांगतो. वडील कधी शाळेत नाही गेले. कुटुंबाचे पोट भरण्यासाठी सासुरवाडीला हॉटेलमध्ये देखील काम केले.
वडिलांची मेहनत बघूनच काही तरी करण्याची गाठ मनाशी बांधली. आज मनोज CA असून आपल्या कुटुंबाचे नाव मोठं वेगळ्या उंचीवर घेऊन गेला आहे. कुटुंबाला चांगले आयुष्य मनोजमूळेच जगायला भेटत आहे. मनोज हा रोज ६-७ तास अभ्यास करायचा. याशिवाय तो २ तास वडिलांना चहा विकण्यास मदत देखील करायचा.
मनोजचे वडील आज चहा विकत नसल्याने त्याला खूप आनंद होतो. मनोजची हि गोष्ट त्या प्रत्येकासाठी प्रेरणा देणारी आहे ज्यांना वाटत स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी श्रीमंत असणं आवश्यक आहे. एक गरीब व्यक्ती देखील मेहनतीने स्वतःचे स्वप्न पूर्ण करू शकतो हे मनोजने दाखवून दिले.