Sunday , May 28 2023
Breaking News
Home / जीवनशैली / विनोद जांगिडचे डोके चालले नसते तर मयूर शेळकेसह त्या लहान मुलाचेही गेले असते प्राण!

विनोद जांगिडचे डोके चालले नसते तर मयूर शेळकेसह त्या लहान मुलाचेही गेले असते प्राण!

मध्य रेल्वेवरील वांगणी स्टेशनवर घडलेल्या घटनेच्या व्हिडीओ तुम्ही आतापर्यंत बघितलाच असेल. १७ एप्रिलला एक लहान मुलगा संध्याकाळी ५ च्या सुमारास आपल्या अंध आईसोबत प्लॅटफॉर्मवरून चालत होता. पण चालला चालता तो तोल जाऊन ट्रॅकवर पडला. त्याचवेळी समोरून उदयन एक्सप्रेस सुसाट वेगाने येत होती. अन त्याची आई अंध असल्याने तीला तो कुठे गेला हेच समजत नव्हते. ती त्याला शोधात होती पण तो काही तिला कुठे आहे समजत नव्हतं.

ती अंध आई खूप बावरली होती. तर मुलगा देखील प्लॅटफॉर्मवर चढायचा प्रयत्न करत होता. पण प्लॅटफॉर्मची उंची जास्त होती त्यामुळे तो चढू शकत नव्हता. पण नेमकं त्याचवेळी तिथे ड्युटीला असलेल्या पॉईंटमन मयूर शेळकेने आपल्या प्राणाची पर्वा न करता धावत येऊन त्या मुलाला आधी प्लॅटफॉर्मवर ठेवले आणि स्वतः देखील वर उडी मारली. हा सर्व घटनाक्रम घडला अवघ्या ४-५ सेकंदात. कारण मयूर थोडाही अडखळला असता तर अनर्थ झाला असता. १-२ सेकंद मागे पुढे झाले असते तर त्या लहान मुलासह मयूर देखील आपल्या प्राणाला मुकला असता.

या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज २ दिवसांनी सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर मयूरवर देशभरातून कौतुकाचा वर्षाव झाला. मयूरच्या या कामगिरीचे सामान्यांनीच नाही तर अनेक दिग्गजांनी कौतुक करत त्याच्या कामगिरीला सॅल्यूट केला. पण या घटनेबद्दल आता एक नवीन माहिती समोर आली आहे. मयूर शेळके याने जे शौर्य दाखवले त्याला आणखी एका व्यक्तीची साथ होती. त्या व्यक्तीने समयसूचकता दाखवली नसती तर कदाचित मयूर शेळके आणि तो लहान मुलगा या जगात दिसला नसता. जाणून घेऊया काय घडलं..

मयूर आणि त्या लहान मुलाचे प्राण वाचवणारी व्यक्ती म्हणजे त्या रेल्वेचे लोको पायलट विनोद जांगीड. ते आजपर्यंत समोर आले नव्हते. शिवाय त्यांचे कोणीही ना कौतुक केले ना त्यांना एखादा पुरस्कार मिळाला. पण त्यांनी जे काम केले ते शब्दात सांगणे कठीण आहे. विनोद जांगीड हे उदयन एक्सप्रेस घेऊन मुंबईच्या दिशेने येत होते. वांगणी स्टेशनच्या आधी एक मोठं वळण आहे. त्यामुळे वांगणी स्टेशन जवळ येईपर्यंत दिसत नाही. त्यावेळी एक्सप्रेस १०५ च्या स्पीडने स्टेशनकडे येत होती. गाडी स्टेशनकडे आल्यावर विनोद याना अचानक लहान मुलगा ट्रॅकवर दिसला. तर मयूर देखील धावत येताना दिसला.

अचानक समोर अशी परिस्थिती उद्भवल्यावर पायलट सहसा ब्रेक लावायला मागे पुढे बघतात. कारण एवढ्या कमी वेळात गाडीचा इमर्जन्सी ब्रेक लावून ती थांबवणे अवघड आहे. पण विनोदने समयसूचकता दाखवली आणि त्या परिस्थितीत गाडीचा इमर्जन्सी ब्रेक लावला. ब्रेक लावून गाडी थांबणार नाही हे तर त्यांना माहिती होतं. पण याचा फायदा असा झाला कि १०५ च्या स्पीडने असलेली एक्सप्रेस अवघ्या २ सेकंदात ८०-८५ स्पीडवर आली. यामुळे गाडी मयुरकडे २-३ सेकंद उशिरा पोहचली. याच २-३ सेकंदात मयूरने आपले काम पार पाडले. विनोदने जर गाडीचा स्पीड कमी केला नसता तर कदाचित अनर्थ घडला असता. विनोदने गाडी ब्रेक केल्यामुळे ती थोडी पुढे जाऊन थांबली.

विनोदने अशी कामगिरी पहिल्यांदाच नाही केली. त्यांनी यापूर्वीही अशा घटनांना तोंड दिलं आहे. पण त्यांना कधी कौतुकाची थाप मिळाली नाही असे ते म्हणाले. अनेकदा जनावर समोर येतात. त्यांना धक्का लागतो. ते जातातहि. पायलटचं मन विचलित होतं पण ते गाडीत असणाऱ्या हजारो लोकांना सुरक्षित त्यांच्या ठिकाणी पोहोचवायचं काम करतात. एखाद्या व्यक्तीचा जर ट्रेनमुळे जीव गेला तर २-३ दिवस झोप लागत नाही असे विनोद म्हणाले.

मयूरवर बक्षिसांचा वर्षाव, अर्धी रक्कम दिली अंध मातेला-

देवदूत बनून आलेल्या मयूरवर कौतूकासह बक्षिसांचा वर्षाव झाला. त्याच्या कामगिरीची दखल घेत रेल्वे मंत्रालयाने त्याला ५० हजाराचे बक्षिस जाहीर केले. मयूरने या रकमेतील अर्धी रक्कम म्हणजे २५ हजार रुपये त्या अंध मातेला देऊन माणुसकीच दर्शन घडवलं आहे. याशिवाय मयूरला जावा या महागड्या मोटरसायकल बनवणाऱ्या कंपनीने ३ लाखांची एक महागडी बाईक देखील गिफ्ट केली आहे.

About Mamun

Check Also

आईच्या मृत्यूमुळे आतून तुटलेली अकाउंटंटची मुलगी दुसऱ्या प्रयत्नात टॉपर येत बनली IAS !

यश श्रीमंत किंवा गरीब किंवा लहान, मोठे पाहत नाही, जो योग्य दिशेने कठोर परिश्रम करतो, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *