अजय देवगण हे नाव आज बॉलिवूडच्या मोठ्या नावांपैकी एक आहे. त्याच्याशिवाय आज बॉलिवूड पूर्णच होऊ शकत नाही. अजय देवगणने बॉलिवूडमध्ये १९९१ मध्ये फुल और कांटे मधून एंट्री केली होती. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलंच नाही. अजयने आज पर्यंत एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे बॉलीवूडला दिले आहेत.
बॉलिवूडमध्ये यश मिळवलेला अजय देवगण संपत्तीच्या बाबतीत देखील मागे नाहीये. अजय देवगणकडे आज अमाप संपत्ती आहे. त्याच्यकडे महागड्या गाड्यांपासून स्वतःच प्रायव्हेट जेट देखील आहे. अजय देवगण आज २९८ कोटींचा मालक आहे. आज आपण अजय देवगणच्या संपत्तीचा आढावा घेऊया..
बॉलिवूडमध्ये अजय देवगण असा पहिला कलाकार आहे ज्याच्याकडे मासेराती क्वात्रोपोर्टे (Maserati Quattroporte) हि महागडी आलिशान गाडी आहे. अजय देवगणने हि कार २००८ मध्ये खरेदी केली होती. या आलिशान गाडीची किंमत दीड कोटी आहे.
या कारशिवाय अजय देवगनच्या गाड्यांच्या ताफ्यात रेंज रोव्हर वोग, मर्सिडीज एस क्लास, बीएमडब्ल्यू जेड ४ आणि जीएल क्लास, ऑडी क्यू ३ आणि ऑडी ए ५ स्पोर्टबॅक या गाड्या आहेत. अजयकडे जवळपास १० आलिशान कर आहेत.
या गाड्यांशिवाय अजय देवगणकडे रोल्स रॉयस कलिनन हि महागडी कार देखील आहे. अजय देवगणने खरेदी केलेल्या या महागड्या कारची किंमत ७ कोटींच्या घरात आहे. हि कार ५ सेकंदात ०-१०० किमी प्रति तास स्पीड पकडू शकते.
अजयकडे महागड्या कारशिवाय स्वतःचे आलिशान फार्महाऊस देखील आहे. २८ एकर मध्ये पसरलेल्या फार्म हाऊसची किंमत २५ कोटी आहे.अजयचे हे फार्महाऊस मुंबईजवळील कर्जत मध्ये आहे. या फार्महाउस मध्ये फळभाज्यांची शेती देखील केली जाते.
अजयकडे लंडनमध्ये करोडोंचा आलिशान बंगला देखील आहे. अजय देवगण पत्नी काजोल आणि मुलांसोबत सध्या जुहूमधील शिवशक्ती या आलिशान बंगल्यात राहतो. अजयकडे लंडनमध्ये असलेल्या बंगल्याची किंमत तब्बल ५४ कोटी रुपये आहे. त्याच्या बंगल्याजवळच शाहरुख खानचा देखील बंगला आहे.
रिपोर्टनुसार अजयकडे प्रायव्हेट जेटदेखील आहे. अजय देवगण असा पहिला अभिनेता होता ज्याच्याकडे प्रायव्हेट जेट आहे. अजयकडे ६ सीट असलेलं हॉकर ८०० विमान आहे. याचा वापर तो नेहमी प्रमोशन, शूटिंग आणि खासगी कामासाठी करतो. अजयच्या या विमानाची किंमत तब्बल ८४ कोटी रुपये आहे. अजयकडे स्वतःची आलिशान व्हॅनिटी व्हॅन देखील आहे. त्याच्या या व्हॅनची किंमत काही कधी बाहेर आली नाही.