Monday , June 5 2023
Breaking News
Home / ठळक बातम्या / सचिन वाझेचा मुंबई पोलीस दलात किती दबदबा होता हे या किस्स्यावरून लक्षात येतं!

सचिन वाझेचा मुंबई पोलीस दलात किती दबदबा होता हे या किस्स्यावरून लक्षात येतं!

मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेरील स्कॉर्पिओ प्रकरणानंतर राज्याच्या राजकारणात मोठा गोंधळ उडाला. सचिन वाझे या मुंबई पोलीस दलातून १६ वर्ष निलंबित राहिलेल्या आणि पुन्हा सेवेत नियुक्त केलेल्या पोलीस अधिकाऱ्यानेच हे स्कॉपीओ पुराण घडवून आणल्याचे NIA तपासात उघड झाले होते. सचिन वाझेला NIA ने त्यानंतर अटक केली होती. या अटकेनंतर मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची पदावरून उचलबांगडी झाली होती.

परमबीर सिंग यांनी त्यानंतर मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहून राज्याच्या राजकारणात हाहाकार निर्माण केला होता. याच पत्रामुळे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना देखील राजीनामा द्यावा लागला. सचिन वाझेने हे गाडीपुराण घडवून आणल्यानंतर स्वतःला वाचवण्यासाठी गाडीमालक मनसुख हिरेन यांची देखील ह त्या केली होती. सचिन वाझे सध्या NIA च्या कोठडीत असून त्याच्याकडून अनेक मोठे खुलासे होणार असल्याची चर्चा सध्या राज्यात सुरु आहे.

सचिन वाझे हा ९० च्या दशकात मुंबई पोलीस दलात दाखल झाला होता. तेव्हा त्याने कमी काळातच पोलीस खात्यात मोठा दबदबा निर्माण केला होता. ६० पेक्षा अधिक ए न्काउंटर करणाऱ्या वाझेला २००४ मध्ये ख्वाजा युनुस प्रकरणात निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर तो खूप काळ पोलीस सेवेपासून दूर होता. पण २०२० मध्ये त्याला पुन्हा पोलीस सेवेत नियुक्ती मिळाली होती. हि नियुक्ती त्याचे शिवसेनेशी असलेल्या संबंधामुळे मिळाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. तर सध्याचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी वाझेची नियुक्ती परमबीर सिंग यांनी केल्याचे अहवालात म्हंटले आहे.

सचिन वाझेची पुन्हा पोलीस खात्यात नियुक्ती झाल्यानंतर त्याला नियम मोडून CIU पथकाचे प्रमुखपद मिळाले होते. त्याच्याकडे मोठ्या केसेस सोपवल्यामुळे तो चर्चेत आला होता. टीआरपी घोटाळ्यात अर्णब गोस्वामीला अटक हि वाझेनेच केली होती. तर डीसी अवंतिका केस, फेक इंस्टाग्राम फॉलोवर, हृतिक रोशन बनावट इमेल, टीआरपी स्कॅम हे मोठे प्रकरणं त्याच्याकडेच होते. त्याच्य दबदब्यामुळेच त्याने हे सर्व मोठे प्रकरण मिळवले. एकतर त्याच्या राजकीय वजनामुळे किंवा मग एखाद्या मोठ्या आयपीएस अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने त्याचा एवढा दबदबा होता असे बोलले जाते.

त्याच्या पोलीस खात्यातील दबदब्याचा अजून एक किस्सा चर्चेत आला आहे. सचिन वाझे हा मुंबई पोलीस दलाचा वन मॅन आर्मी बनला होता.२५ फेब्रुवारीला मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर गाडी आढळल्यानंतर तेव्हा हा किस्सा घडला होता. एक DIG दर्जाचे अधिकारी घटनास्थळी आले होते. सचिन वाझे तेव्हा तिथेच हजर होता. स्कॉर्पिओ घटनास्थळावरून हटवण्यात आली होती. प्रोटोकॉल नुसार API सचिन वाझेने त्या DIG अधिकाऱ्याला सॅल्यूट मारणे बंधनकारक होते.

पण तो DIG अधिकारी समोर आल्यानंतर सचिन वाझेने सॅल्यूट मारणे तर दूरच पण तो सँडविच खात उभा होता. DIG ने स्कॉर्पिओबद्दल विचारणा केली असता वाझेने उद्धटपणे मला माहिती नाही असे उत्तर दिले. शेवटी DIG अधिकाऱ्याला अतिरिक्त DG ला फोन करून माहिती घ्यावी लागली. एक API असतानाहि त्याने मोठ्या अधिकाऱ्याला थोडंही महत्व दिलं नव्हतं. एखाद्या मोठ्या आयपीएस अधिकाऱ्याचा किंवा नेत्याचा हात डोक्यावर असल्याशिवाय हा उद्धटपणा तो करू शकत नव्हता.

एवढंच नाही तर एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार कोणत्याही पोलीस स्टेशनला किंवा क्राईम ब्रँचला एखाद्या क्रिकेट बुकीवर छापा टाकायचा असेल तर डीसीपी किंवा सीपीची परवानगी लागते. पण काही काळापासून कुठेही छापेमारी करण्यापूर्वी सचिन वाझेशी बोला असा तोंडी आदेशच पोलिसांना होता. त्यामुळेच गृहमंत्र्यांवर १०० कोटींचं टार्गेट दिल्याचा आरोप झाला असावा असं म्हंटलं जातंय.

About Mamun

Check Also

रंगा-बिल्ला या गुंडांची इतकी दहशत होती की देशाचे प्रधानमंत्रीही तणावाखाली आले होते

रंगा-बिल्ला ही नावं आपण अनेकदा कुठे ना कुठे वाचली असतील. हिंदी किंवा मराठी चित्रपटामध्ये तर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *