Sunday , May 28 2023
Breaking News
Home / ठळक बातम्या / सयाजीराव गायकवाडांनी चांदीच्या ताटात १०१ सुवर्णमुद्रा आणून सुरु केलेली बँक म्हणजे बँक ऑफ बडोदा !

सयाजीराव गायकवाडांनी चांदीच्या ताटात १०१ सुवर्णमुद्रा आणून सुरु केलेली बँक म्हणजे बँक ऑफ बडोदा !

बडोदा म्हणलं की त्याच्या जागोजागी महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या आठवणी पाहायला मिळतात. बडोदा संस्थानाचे अधिपती असताना त्यांनी बडोद्याचा जो कायापालट केला, त्यामुळे देशाच्या नकाशात त्याला महत्वाचे स्थान प्रपात झाले.

बडोदा संस्थानातील सामाजिक सुधारणा, प्रशासन, शिक्षणव्यवस्था, आर्थिक सुधारणा, इत्यादिमध्ये सयाजीरावांनी राबविलेल्या धोरणांचा परिपाक दिसून येतो. खऱ्या अर्थाने सयाजीरावांना बडोदानरेश हा उपाधी सार्थ ठरते. आज आपण बँक ऑफ बडोदा सयाजीरावांच्या योगदानातून कधी उभी राहिली ते पाहणार आहोत.

मंडळी, बँक ऑफ बडोदा ही भारतातील स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँक यानंतरची तिसरी सर्वात मोठी राष्ट्रीयीकृत बँक आहे. ही बँक जगभरातील १९ देशांमध्ये आपल्या सेवा देते. जगभरात या बँकेचे जवळपास १४ कोटींहून अधिक ग्राहक आहेत. ८००० हुन अधिक शाखा, १०००० हुन अधिक एटीएम, ८४००० हुन अधिक कर्मचारी अशी बँक ऑफ बडोदाची ठळक ओळख सांगावी लागेल, म्हणजे तुम्हाला या बँकेचा विस्तार लक्षात येईल.

बँक ऑफ बडोदाची स्थापना बडोदानरेश महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी त्यांच्या बडोदा संस्थानात केली होती. तो दिवस होता २० जुलै १९०८ ! महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी संपतराव गायकवाड, रॅल्फ व्हाइटनेक, विठ्ठलदास ठाकरे, तुलसीदास किलाचंद आणि एनएम चोकसी अशा सहकाऱ्यांना सोबत घेऊन या बँकेची स्थापना केली.

त्यावेळी ही एक खाजगी बँक म्हणून स्थापन झाली. १८ जुलै १९०८ च्या सकाळी ११ वाजता सयाजीराव महाराज हत्तीवर बसून बडोदा शहराच्या मधोमध भाड्याने घेतलेल्या एका खोलीत आले. त्यांनी आपल्याजवळची चांदीच्या ताटात असलेल्या १०१ सुवर्णमुद्रा बँकेत जमा केल्या आणि बँकेचे औपचारिक उदघाटन केले.

About Mamun

Check Also

रंगा-बिल्ला या गुंडांची इतकी दहशत होती की देशाचे प्रधानमंत्रीही तणावाखाली आले होते

रंगा-बिल्ला ही नावं आपण अनेकदा कुठे ना कुठे वाचली असतील. हिंदी किंवा मराठी चित्रपटामध्ये तर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *