Monday , June 5 2023
Breaking News
Home / राजकारण / साधं विटांचं घर नसलेली मजुराची बायको चंदना बाउरी झाली बंगालची आमदार!

साधं विटांचं घर नसलेली मजुराची बायको चंदना बाउरी झाली बंगालची आमदार!

काल रविवारी बहुचर्चित पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. पश्चिम बंगालची निवडणूक अनेक कारणांनी चर्चेत होती. भाजपने आपली पूर्ण ताकत या निवडणुकीत झोकली होती. २०० पार चा नारा या निवडणुकीत भाजपने दिला होता. ३ आमदार असलेल्या भाजपला सत्ता येईल अशी आशा होती. पण बंगालची वाघीण ममता बॅनर्जी यांनी भाजपच्या आशा धुळीत घालत तिसऱ्यांदा बंगालचा गढ जिंकला. भाजपने देखील आपल्या जागा ३ वरून ७५ च्या वर नेऊन एकप्रकारे या निवडणुकीत यश मिळवले आहे.

भाजपकडून उभा राहिलेल्या अनेक उमेदवारांची निवडणुकीपूर्वी खूप चर्चा झाली होती. कारण भाजपने अनेक सामान्य व्यक्तींना तिकीट दिले होते. यामध्ये काही महिलांची घरची परिस्थिती तर अत्यंत बिकट होती. काही जणी दुसऱ्यांच्या घरी भांडे घासायच्या तर काहीना राहायला साधे घर देखील नव्हते. काहींचे पती मजुरी करतात. या लोकांना जनता साथ देईल का नाही असा प्रश्न होता. पण या निकालाने दाखवून दिलं कि लोकांनी मनात आणलं तर ते एका मजुराच्या बायकोला पण आमदार बनवू शकतात.

कालच्या निकालानंतर भाजपच्या एका महिला आमदाराची देशभरात चर्चा सुरु आहे. या महिलेने भाजपच्या तिकिटावर सालतोरा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या महिलेचं नाव आहे चंदना बाउरी. चंदना यांनी तृणमूल काँग्रेसच्या संदीप मंडल यांचा पराभव केला. चंदना बाउरीच्या आमदारकीची चर्चा होण्याचे कारण म्हणजे तिची एकूण संपत्ती आणि तिचे कुटुंब. चंदनाचे कुटुंब एवढे साधे आहे कि तिचे पती आजही मजुरी करायचे. त्यांना राहायला विटांचे साधं घर देखील नसून त्या एका झोपडीत राहतात. शिवाय घरी लाईटचे कनेक्शन देखील नाही.

चंदनाची एकूण संपत्ती म्हणजे ३१,९८५ रुपये. चंदना एका अनुसूचित जातीतून येते. पती मजुरी करतात तर चंदना देखील मजुरी करायची. चंदनाच्या संपत्तीमध्ये तीन बकऱ्या आणि ३ गाईंचा समावेश आहे. निवडणूक लढवताना शपथपत्रात दिलेल्या माहितीत चंदना यांच्या खात्यात फक्त ६३३५ रुपये होते. तर संपत्तीमध्ये ना कुठले दागदागिने न कुठली जमीन. चंदनाकडे बँकेतील आणि नगद अशी एकूण ३१९८५ रुपये संपत्ती असल्याचे निवडणूक आयोगाला म्हंटले होते. चंदनाच्या घरी शौचालय देखील नाहीये. पक्षाच्या प्रति तीच प्रेम खूप होतं.

चंदना रोज कमळाचं फुल प्रिंट केलेली भगव्या रंगाची सारी नेसून प्रचाराला जायची. चंदनाचे पती सरबन मजुरी करतात. ते मिस्त्री म्हणून काम करतात. आमदार पत्नी आणि पती दोघे मनरेगाचे अधिकृत मजूर आहेत. त्यांना ३ मुलं आहेत. चंदना मागील ७-८ वर्षांपासून भाजपसोबत जोडलेली होती. चंदनाने आपल्या मतदारसंघातील समस्या आक्रमकपणे मांडत प्रचारात आघाडी घेतली होती. गंगाजलघाटी च्या केलाई गावातून रोज सकाळी ८ वाजता तिचा प्रचार सुरु व्हायचा. लोकांना गुन्हेगारी, गरिबी शिक्षण, आणि पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर तिने मत मागितले. लोकांनी देखील तिला प्रतिसाद देत विजयी करून आमदार म्हणून विधानसभेत पाठवलं आहे.

चंदना यांनी तृणमूल काँग्रेसच्या संतोष कुमार मंडल यांना ४१४५ मतांनी धूळ चारली. चंदना यांना ९१,६४८ मतं मिळाली तर संतोष कुमार यांना ८७,५०३ मतं मिळाली. या मतदारसंघात सीपीआय एम चे नंदलाल बाउरी तिसऱ्या क्रमांकावर राहिले. त्याना अवघे १४०८४ मतं मिळाली. या मतदारसंघात यापूर्वी TMC चे स्वप्न बरुई २ वेळा आमदार होते. पण यावेळेस त्यांचं तिकीट कापून संतोष कुमार यांना तिकीट देण्यात आलं होतं.

About Mamun

Check Also

नसबंदीच्या बाबतीत हिटलरसुद्धा संजय गांधींचे पाय धुवून पाणी पिला असता

जर्मनीचा हुकूमशहा आणि नाझी पक्षाचा नेता असणाऱ्या एडॉल्फ हिटलरचे नाव जागतिक इतिहासातील क्रूरकर्मा म्हणून घेतले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *