Sunday , May 28 2023
Breaking News
Home / देश-विदेश / सुताराच्या हाताखाली काम करणारा एक चपराशी ते फेविकॉल सारख्या मोठ्या कंपनीचा मालक

सुताराच्या हाताखाली काम करणारा एक चपराशी ते फेविकॉल सारख्या मोठ्या कंपनीचा मालक

आपल्या आयुष्यात ध्येयाला जर इमानदारीची साथ मिळाली तर यश नक्कीच मिळतं. यशाचा हा मंत्र खरा करून दाखवला आहे बळवंत पारेख यांनी. जे फेविकॉल कंपनीने संस्थापक आहेत. एकेकाळी सुताराच्या हाताखाली काम करणाऱ्या बळवंत यांचं नाव आज देशाच्या त्या मोठ्या उद्योजकांमध्ये घेतलं जातं ज्यांनी आपल्या मेहनतीने यशाचा इतिहास रचला आहे. बळवंत पारेख यांनी मिळवलेलं हे यश एक दिवसाचं नाहीये.

या यशामागे आहे त्यांची दिवस रात्र केलेली मेहनत. एका चपराशी असलेल्या व्यक्तीला एवढी मोठी कंपनी उभी करायला किती कष्ट झेलावे लागले असतील हे काही शब्दात सांगता येणार नाही. ते फक्त बळवंत यांनाच माहिती. जाणून घेऊया त्यांचा एक चपराशी ते फेविकॉल कंपनीचा मालक असा जीवनप्रवास..

अरबो रुपयांची कंपनी असलेल्या फेविकॉलची स्थापना करणाऱ्या बळवंत पारेख यांचा जॅम १९२५ मध्ये गुजरात राज्यातील महुआ या गावात झाला. एका सामान्य कुटुंबातील बळवंत मोठं होऊन गुजराती लोकांप्रमाणे व्यापारी होऊ इच्छित होते. पण ते काही सोपं काम नव्हतं. घरच्यांची इच्छा होती कि बळवंतने चांगलं शिक्षण घ्यावं. त्याने वकिलीचे शिक्षण घेऊन वकिली करावी असे घरच्यांना वाटत होते. त्यासाठी त्यांना पुढील शिक्षणासाठी मुंबईला पाठवण्यात आलं. त्यानंतर त्यांनी सरकारी लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. आणि वकिलीचं शिक्षण सुरु झालं.

बळवंत यांच्या मनात वकिली बद्दल आवड नव्हती. फक्त घरच्यांच्या इच्छेखातर ते मुंबईला वकिलीचं शिक्षण घ्यायला आले होते. त्यांचं मन दुसरीकडेच लागलेलं होतं. त्याच दरम्यान देशात क्रांतीचा वणवा पेट घेत होता. देशातील युवकांमध्ये महात्मा गांधींच्या विचारांची आवड निर्माण होत होती. यामध्ये बळवंत यांचं नाव देखील जोडलं गेलं. ते गांधीजींच्या भारत छोडो आंदोलनात सहभागी झाले. हळू हळू ते या आंदोलनात एवढं गुंतत गेले कि त्यामुळे त्यांचं शिक्षणही सुटलं.

एक वर्षानंतर पुन्हा शिक्षण सुरु केलं. पण तेव्हा मात्र त्यांनी वकिली करायला घरच्यांना नकार दिला. सत्य आणि अहिंसेच्या वाटेवर निघालेल्या पारेख याना नंतर मुंबईत राहण्यासाठी नोकरी करावी लागली. जीवन जगण्यासाठी त्यांच्याकडे नोकरी करण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यांनी मुंबईत एका प्रिंटिंग प्रेसमध्ये नोकरीसाठी प्रयत्न केला. नोकरीची त्यांना आवड नव्हती पण मुंबईत राहण्यासाठी त्यांची ती मजबुरी होती. त्यांना स्वतःचा व्यापार करायचा होता. घरचे मात्र यासाठी तयार नव्हते. एक दिवस तर असा आला कि त्यांनी प्रिंटिंग प्रेसमधली नोकरी देखील सोडली.

त्यांनी त्यानंतर एका लाकडाचं काम करणाऱ्या सुताराकडे चपराशी म्हणून काम करायला सुरुवात केली. हि नोकरी त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरली. तो मालक लाकडाचा व्यापारी देखील होता. चपराशी असलेल्या बळवंत यांना जर्मनीला जाण्याची एक संधी आली. तेव्हा ते आपल्या बिजनेस आयडियावर देखील काम करत होते. त्यांनी पश्चिमी देशातून काही वस्तू आयात करायला सुरुवात केली. हळू हळू त्यांनी स्वतःचा बिजनेस चालू केला होता. दुसरीकडे देशाला स्वातंत्र्य मिळाले. तेव्हा व्यापाऱ्यांना देशी वस्तू बनवण्यासाठी प्रोत्साहन दिलं जात होतं.

हीच संधी ओळखून बळवंत पारेख यांनी १९५९ मध्ये पीडिलाइट या ब्रॅण्डची स्थापना केली. त्याचसोबत त्यांनी देशाला दिला मजबूत आणि सुगंधी फेविकॉल. आता अनेकांना प्रश्न पडू शकतो कि एका चपराशी राहिलेल्या व्यक्त्तीने जो भारत छोडो आंदोलनात सहभागी होता त्याच्या डोक्यात हि आयडिया आली कशी? तर झालं असं कि बळवंत पारेख हे जेव्हा त्या सुताराकडे काम करत होते तेव्हा त्यांनी बघितलं कि सुताराला लाकडं जोडण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागतेय. तेव्हा लाकडं जोडण्यासाठी चरबीचा वापर केला जायचा. हे काम कारागिरांसाठी खूप त्रासदायक होते. बस बळवंत यांनी डोकं चालवलं आणि जन्माला आला फेविकॉल.

त्याच दिवशी त्यांनी ठरवलं होतं कि आपण असं काही बनवूया जे या मेहनतीवर उपाय ठरेल. बळवंत यांच्या यशामध्ये त्यांच्या आयडियाप्रमाणे त्यांची मार्केटिंग देखील खूप महत्वाची होती. घरच्यांचं ऐकून वकिली न करता स्वतः काही करून दाखवण्याची जिद्द ठेवलेल्या बळवंत पारेख यांनी फेविकॉल हि आज अरबो रुपयांची असलेली कंपनी चालू केली. त्यांचा या प्रेरणादायी प्रवासाला सलाम.

About Mamun

Check Also

जेव्हा सलूनमध्ये पडलेल्या केसांवरुन “रॉ” अधिकाऱ्यांनी पाकिस्तानचा ऍटोमिक प्लांट शोधला होता

कुठल्याही देशाच्या सुरक्षेमध्ये गुप्तचर संस्थांची भूमिका खूप महत्वाची असते. भारतातही अशी एक गुप्तचर संस्था आहे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *