एक काळ असा होता जेव्हा जगात राजेशाही होती. राजा महाराजांचा वेगळाच थाट सर्वत्र असायचा. पण आता हि राजेशाही भारतासह देशातील अनेक राज्यात समाप्त झाली आहे. पण आजही काही असे देश आहेत जिथे राजेशाही आहे. ब्रुनेई हा देखील एक असाच देश आहे. या देशात राज्य करतो सुलतान. या देशाच्या सु ल्तानचं नाव आहे हसनल बोलकिया.
ब्रुनेई हा देश इंडोनेशियाच्या खूप जवळ आहे. ब्रुनेईचे महाराजा हसनल बोलकिया यांच्याकडे एवढी संपत्ती आहे कि त्याची गणना होऊ शकत नाही. त्यांची तुलना जगातील सर्वात श्रीमंत राजांमध्ये होते. ते १९८० पर्यंत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. त्यांची एकूण संपत्ती १४७०० पेक्षाही अधिक आहे. त्यांच्या संपत्तीत तेलाचे भांडार आणि नैसर्गिक गॅस यातून मिळणारे उत्पन्न हातभार लावते.
हसनल बोलकिया यांचा राजवाडा हा देखील डोळ्याचे पारणे फेडणारा आहे. आलिशान अशा या राजवाड्यात अनेक गोष्टी सोन्याच्या आहेत. हा महाल त्यांनी १९८४ मध्ये बनवला होता. या महालास ‘इस्ताना नुरुल इमान पैलेस’ असे नाव दिलेले आहे.
हा राजमहाल २० लाख स्केवर फिट एरियामध्ये बनलेला आहे. या महालास असलेले सोनेरी घुमट या वास्तूचे सौंदर्य अधिक वाढवते. हे घुमत २२ कॅरेट सोन्याने बनलेले आहेत.
हसनल बोलकिया यांना हा महाल बनवण्यासाठी त्यावेळी २५५० कोटी रुपये लागले होते. या महालात १७०० पेक्षा अधिक खोल्या आहेत तर २५७ बाथरूम आणि ५ स्विमिंग पूल आहेत.
महालाच्या मध्ये ११० गॅरेज देखील बनवलेले आहेत. यामध्ये हा राजा आपल्या आलिशान ७००० कार ठेवतो. तर महालात २०० घोडे देखील आहेत. या राजाला महागड्या कारची खूप आवड आहे. त्यांच्याकडे असलेल्या या कारची किंमत ३४१ अरब आहे. या राजाच्या ताफ्यात ६०० रोल्स रॉयस आणि ३०० फरारी गाड्या आहेत.
महागड्या आलिशान कार व्यतिरिक्त राजाकडे प्रायव्हेट जेट देखील आहेत. यामध्ये बोईंग ७४७-४००, बोईंग ७६७-२०० आणि इयरबस ए ३४०-२०० जेटचा समावेश आहे. ते यामध्ये बसूनच आपला प्रवास करतात. बोलले जाते कि ७६७ ४०० मध्ये तर प्युअर सोनं देखील लावण्यात आलेले आहे. या सर्व जेटमध्ये राहण्यासाठी विशेष रूम, बेडरूम सहित अनेक आलिशान सुविधा आहेत.
या महाराजाचे सर्व राहणीमान हे राजाला शोभणारे आहे. ते आपले आयुष्य खूप चैनीत जगतात. तुम्हाला फोटो बघून अंदाज येईल कि राजाचे आयुष्य किती आलिशान आहे. असे आयुष्य प्रत्येकालाच मिळत नाही हे देखील खरं आहे.