Monday , June 5 2023
Breaking News
Home / जीवनशैली / सौरव गांगुलीने पिक्चर स्टाईल हिरॉईनला पळवून नेऊन केले होते लग्न

सौरव गांगुलीने पिक्चर स्टाईल हिरॉईनला पळवून नेऊन केले होते लग्न

सौरव गांगुलीच्या पत्नीचे नाव डोना आहे. ती एक सुप्रसिद्ध शास्त्रीय नर्तक आहे. सौरव आणि डोना हे शेजाशेजारी राहायला होते. दोघांची कुटुंबे शेजारी असली तरी आपल्याकडे असते तसेच दोघांच्या कुटुंबामध्येही चांगलेच शत्रुत्व होते. इतके शत्रुत्व की शेजारी राहूनही ते कधी एकमेकांच्या तोंडाकडे ढुंकूनही बघत नसत. त्यांच्या घराभोवतीच्या भिंती इतक्या उंच होत्या की कोणीही एकमेकांच्या घरात डोकावून बघू शकत नव्हतं. जसजसे सौरव आणि डोना मोठे होत होते, तसतशी त्यांच्या कुटुंबातील कटुताही वाढत चालली होती.

एका बाजूला आपली कुटुंब एकमेकांना पाण्यात बघत असताना मात्र सौरव आणि डोना मात्र एकमेकांच्या प्रेमात तल्लीन झाले होते. घरच्यांच्या नजर चुकवून हे दोघे बाहेर एकमेकांना भेटायचे. सौरव तर स्वतःच्या शाळेतून मधूनच पळून जाऊन डोनाला भेटण्यासाठी आणि तिच्यासोबत प्रेमाच्या गोष्टी करण्यासाठी तिच्या शाळेत जायचा. ही गोष्ट जेव्हा सौरवच्या वडिलांना समजली तेव्हा त्यांनी चांगलाच चोप दिला आणि परत त्या मुलीला भेटायचे नाही म्हणून दरडावले. पण ऐकेल तो सौरव गांगुली कसला ?

लग्न करेल तर डोना सोबतच करेल असे सौरवणे मनोमन ठरवले होते. दरम्यान त्याची भारतीय क्रिकेट संघात निवड झाली. १९९६ मध्ये इंग्लंडच्या लॉर्ड्स मैदानावर सौरवणे जेव्हा शतक मारले तेव्हा देशात तो हिरो बनला. बंगाल तर आनंदाच्या भारत नाहून निघाला. पण सौरव जेव्हा कलकत्यास परतला तेव्हा इतर कुणी नंबर लावण्याआधी डोनानेच सौरवला लग्नासाठी अल्टिमेटम दिला. सौरवणे लगेचच आपल्या काही ठराविक मित्रांच्या मदतीने लग्नाचा गुप्त प्लॅन बनवला.

एखाद्या चित्रपटात शोभावं असं सौरवने आपल्या हिरॉइनला म्हणजेच डोनाला घरातून गुपचूप पळवून आणले. आपल्या एका मित्राच्या घरी लग्नाचे प्लॅनिंग ठरले. लग्नाची कायदेशीर नोंद होण्यासाठी मॅरेज रजिस्ट्रारला देखील आणले.

त्याच्यासमोर दोघांनी एकमेकांना हार घालून लग्नाच्या नोंदणीपत्रावर सही केली. सर्व औपचारिकता संपल्यानंतर रजिस्ट्रारने घोषित केले की ते आता अधिकृत पती व पत्नी बनले आहेत. या गुप्त लग्नानंतर सौरव श्रीलंका दौर्‍यावर गेला होता.

सौरव गांगुली श्रीलंका दौर्‍यावरुन परत आल्यावर दोघांनीही आपापल्या कुटुंबीयांना आपल्या लग्नाबद्दल सांगण्याचे ठरले होते. परंतु ही गोष्ट अचानकी लीक झाली हे माहित नाही आणि वर्तमानपत्रात त्याबद्दलच्या बातम्या प्रकाशित झाल्या.

या बातम्या वाचून दोन्ही कुटूंबीय खूप रागावले होते, पण लग्न तर होऊन गेले होते. रागावून करणार काय ? शेवटी त्यांनीही या लग्नाला मान्यता दिली. नंतर कलकत्त्यात भव्य वेडिंग पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.

About Mamun

Check Also

आईच्या मृत्यूमुळे आतून तुटलेली अकाउंटंटची मुलगी दुसऱ्या प्रयत्नात टॉपर येत बनली IAS !

यश श्रीमंत किंवा गरीब किंवा लहान, मोठे पाहत नाही, जो योग्य दिशेने कठोर परिश्रम करतो, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *