इंटरनेटवर रोज नवेनवे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. वायरल होणारे व्हिडीओ सोशल मीडियावर त्याची कसलीही सत्यता न तपासता मोठ्या प्रमाणात शेअर केले जातात. असाच एक व्हिडीओ मागील २-३ दिवसांपासून सोशल मीडियावर तुम्हाला जिकडे तिकडे दिसत असेल. स्कुटीवर फोनवर बोलणाऱ्या मुलीचा हा व्हिडीओ जोरदार शेअर केला जात आहे.
इंस्टाग्रामवर असो कि ट्विटर फेसबुक असो सर्वत्र या व्हिडीओने धुमाकूळ घातला. या व्हिडिओमध्ये मुलगी हि फोनवर बोलत स्कुटी चालवते आणि रोडवर मध्येच एका गाडीसमोर थांबवते. बाइकवरील मुले तिला ध डकता धडकता थोडक्यात वाचतात.
बाइकवरील मुले तिला प्रश्न करतात तर ती मुलगी त्यांना उ द्धटपणे बोलते आणि मधले बोट दाखवते. ती त्या मुलांनाच म्हणते मी फोनवर बोलत आहे दिसत नाही का? त्यानंतर मुलगा तिला रा गात बरंच बोलतो. व्हिडिओमध्ये मुलगी तिची चूक मान्य न करता मुलांनाच द मदाटी करायला लागते.
बाईकवरील तरुण खूप वेळा तिला समजून सांगायला बघतो पण ती काही ऐकत नाही. ती मुलगी चूक मान्य न करता तरुणावर अनेक आरोप करते. बाइकवरील तरुण पुढे गेल्यावर मुलगी पुन्हा एकदा बाइकसमोर येते आणि भां डते. हा व्हिडीओ बघून तुम्हाला मुलीचा खूप रा ग आला असेल. मुली किती गै र फायदा घेऊ शकता असा समज झाला असेल. पण थांबा या व्हिडिओची सत्यता दिसते तशी नाहीये.
बघा व्हिडीओ-
या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या मुलीचे नाव आहे जिया खान. जिया हि एक नवोदित अभिनेत्री आणि मॉडेल आहे. या व्हिडिओमध्ये दिसते ती सत्यता नसून हे सर्व स्क्रिप्टेड होतं असा धक्कादायक खुलासा तिने केला आहे. अमेय भोसले नावाच्या युट्युबर ने जियाला व्हिडीओ बनवण्यासाठी संपर्क केला. त्याने व्हिडिओमध्ये एक छोटंसं भांडण करायचं असल्याचं सांगितलं.
हा व्हिडीओ डोंबिवली मध्ये डी मार्टजवळ शूट करण्यात आला आहे. शूटिंग करताना त्यांनी आजूबाजूच्या लोकांना कल्पना दिली आणि शूट केलं. त्यानंतर ते सोबतच तिथून निघून गेले. हा व्हिडीओ फेक असल्याचं तेथील लोकांना तर माहिती होते पण या युट्युबर तरुणाने मात्र चॅनेलच्या प्रसिद्धीसाठी हा व्हिडीओ खरा असल्यासारखा वायरल केला.
या तरुणीची बद नामी झाल्याने तिने आता या तरुणाविरुद्ध माफी न मागितल्यास पोलिसात जाणार असल्याचे सांगितले आहे. जियाकडे या तरुणासोबत चॅटिंगचे पुरावे आणि कॉल रेकॉर्ड देखील आहेत. या व्हिडीओवरून आपल्या सर्वाना एक मात्र समजून घ्यायला पाहिजे कि सोशल मीडियावरील सर्व गोष्टींवर विश्वास ठेवायचा नसतो.