Monday , June 5 2023
Breaking News
Home / जीवनशैली / स्वतःचे 42 लिटर दुध अनाथांना दान करून ‘या’ अभिनेत्रीने वाचवले अनेक नवजात बाळांचे प्राण..

स्वतःचे 42 लिटर दुध अनाथांना दान करून ‘या’ अभिनेत्रीने वाचवले अनेक नवजात बाळांचे प्राण..

बाळाचा जन्म आईवडिलांसह कुटुंबासाठी आनंदाची गोष्ट असते. बाळाला आईचे दूध हे जन्मानंतर खूप महत्वाचे असते. पण अनेकदा आई बाळाला जन्म दिल्यानंतर आजारी पडते आणि मग संकट निर्माण होतं. अशा परिस्थितीत आईचे दूध त्या बाळाला कोणी दान केले तर ते खूपच चांगलं आहे. बाळाला जन्म दिलेली आई प्रत्येक २ तासाने दूध दान करू शकते. २ तासांनी शरीरात दूध निर्माण होतं. हेच दान करण्याचं कौतुकास्पद काम करत आहे एक अभिनेत्री. जाणून घेऊया या आदर्श निर्माण करणाऱ्या अभिनेत्रीबद्दल..

या अभिनेत्री आहेत चित्रपट निर्मात्या निधी परमार हिरानंदानी. त्यांनी लॉकडाऊनच्या काळात स्वत:चे ४२ लीटर दूध दान केले आहे. निधी या ४२ वर्षाच्या असून त्यांनी नुकताच बाळाला जन्म दिला होता. पण त्यांच्या लक्षात आलं कि जास्त ब्रे-स्ट मि-ल्क त्या दान करू शकतात. सुरुवातीला नातेवाईकांनी त्यांना दुध दान करण्यास वि-रोध केला. पण त्यांनी न ऐकता दूध दान करण्याचा निश्चय केला.

त्यांनी इंटरनेटवर माहिती शोधून अशी देणगी केंद्रे शोधण्यास सुरवात केली. त्यांच्या स्त्री-रो-गत-ज्ज्ञांनी मुंबईतील रूग्णालयाबद्दल सांगितले ज्यांनी गेल्या एका वर्षापासून ब्रे-स्ट मिल्क बँक सुरु केली आहे.

निधीला जेव्हा दूध दान करायचे होते तेव्हा लॉकडाऊन लागला होता. पन रुग्णालयाने त्यांना कोणताही संपर्क न होता तुमच्या घरी येऊन दूध कलेक्ट करु असे तिला आश्वासन दिले. या वर्षाच्या मे पासून आतापर्यंत निधीने सूर्य रुग्णालयाच्या न-वजात इंटेंसिव्ह केअर यूनिटमध्ये ४२ लीटर दुध दान केले आहे.

एका मुलाखती मध्ये बोलताना निधीने सांगितले की, काही दिवसांपूर्वीच मी रु-ग्णालयात गेले होते. मला माहिती पाहिजे होते की मी दान केलेल्या दूधाचा कसा वापर केला जात आहे. मी पाहिले की ६० अशी मुले होती ज्यांना दूधाची गरज होती. त्यानंतर मी आता असा निर्णय घेतला आहे की, पुढील एक वर्ष मी येथे दूध दान करण्याचा प्रयत्न करणार आहे.

निधीच्या मते आपल्या समाजात याप्रकारच्या दानाची चर्चा होत नाही. पण खरे तर हे एक खूप कौतुकास्पद काम आहे. यामुळे असंख्य मुलांचे प्राण वाचले आहेत. आपल्या जाणून आश्चर्य वाटेल की निधी सारख्या अशा ३४०० हून अधिक मातांनी राज्य महिला रुग्णालयात असलेल्या मदर मिल्क बँकेत पोहोचून दुध दान केले असून आतापर्यंत सुमारे ३७०० मु-लांचे प्रा-ण वाचवले आहेत.

अशा बर्‍याच माता आहेत ज्यांनी इतर मु-लांसाठी अनेकदा दू-ध दान केले आहे आणि त्यांचे मू-ल देखील निरोगी आहे. या सर्व निरोगी माता आपल्या बा-ळांना दू-ध देऊ शकतात. याचा कोणताही वा-ईट परिणाम त्यांच्या आ-रोग्यवर होत नाही.

तसेच तारापूर जवळील कुशलबास गावच्या सुनिताची महिला रुग्णालयात प्र-सूती करण्यात आली. यावेळी, जेव्हा तिला दूध दानाचे महत्त्व सांगितले तेव्हा ती लगेच तयार झाली. तिने मदर मिल्क बॅंकेला ९ वेळा ३० लीटर दूध दान केले.

सुनीता सांगते की दुधाचे दान केल्याने मला समाधान वाटले आहे, कारण दान केलेले दूध आ-जारी मु-लांचे आयुष्य वाचवण्यासाठी वापरले जाईल. प्रत्येक आईने दूध दान करावे असे तिने सांगितले आहे.

About Mamun

Check Also

आईच्या मृत्यूमुळे आतून तुटलेली अकाउंटंटची मुलगी दुसऱ्या प्रयत्नात टॉपर येत बनली IAS !

यश श्रीमंत किंवा गरीब किंवा लहान, मोठे पाहत नाही, जो योग्य दिशेने कठोर परिश्रम करतो, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *