आपल्या तोंडावर अनेकदा पिंपल्स येत असतात. सर्वानाच कधी ना कधी पिंपल्स येऊन गेलेले असतात. पण याच तोंडावर येणाऱ्या पुळ्या फोडायची आपल्याला सवय असते. तोंडावर आलेले पिंपल्स हाताने फोडणे हे खूप महागात पडू शकते. खरंतर पिंपल्स येण्याला शरीरातील हार्मोनल बदल आणि धूळ, तेलकट त्वचा कारणीभूत असतात.
हेच नाही तर असंख्य कारणाने चेहऱ्यावर पिंपल्स येत असतात. चेहऱ्यावर आलेले पीपल्स हे आपल्या गोरेपणाच्या हव्यासापोटी देखील येऊ शकतात. अनेकदा मुलं मुली गोरं होण्यासाठी वेगवेगळ्या क्रीम वापरतात. या क्रीम्समुळे देखील पिंपल्स येतात.
चेहऱ्यावर लावण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या क्रिम्समुळे, सतत मेकअप केल्यामुळे, सतत फेशिअल केल्यामुळे त्वचेची छिद्र बुजली जातात. हि छिद्र बंद झाल्यामुळे पिंपल्स येतात. हे आलेले पिंपल्स आपोआप जातात. किंवा तुम्ही त्यावर काही आयुर्वेदिक किंवा इतर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेऊ शकतात. पण हे पिंपल्स हाताने मात्र चुकूनही फोडू नका.
नाकावरचे पिंपल्स हाताने फोडणे तुमच्या जीवावर देखील बेतू शकते. कारण चेहऱ्यवरील काही पिंपल्स आलेल्या भागातील पेशींचा थेट मेंदूशी संबंध असतो. डॉक्टरांच्या माहितीनुसार नाकाच्या टोकावर ज्या पुळ्या येतात त्यांना ट्रायंगल ऑफ डेथ म्हंटल जातं. तिथून तिथून दोन्ही बाजूच्या गालाच्या सुरुवातीच्या भागापर्यंत महत्त्वपूर्ण पेशी असतात. या भागाला नुकसान पोहोचल्यास संक्रमण मेंदूपर्यंत पोहोचतं.
याला cavernous sinus thrombosis असं म्हटलं जातं. यास्थितीत मेंदूमध्ये रक्त गोठून गुठळ्या तयार होतात. नंतर हे संक्रमण नाक, कान आणि दातांपर्यंत पसरत जातं. अशा स्थितीत रुग्णाचं वाचणं कठीण असतं. 3 पैकी एका रुग्णाला मृत्यूचा सामना करावा लागतो.
डेलीमेलच्या वृत्तानुसार चीनच्या तरुणीला असेच नाकावरील पुळ्या फोडणे खूप महागात पडले आहे. चीनच्या झेजियांग भागातील निंघई शहरात वास्तव्यास असलेली १९ वर्षीय यांग हि तरुणी. तिच्या नाकावर देखील अशाचप्रकारे पुळ्या आल्या होत्या. तिने हाताने त्या फोडून चेहरा क्लीन करण्याचा प्रयत्न केला. पण तिला हे खूप महागात पडलं.
तिच्या नाकावर आलेली पुळी तिने वैतागून फोडली. ती फोडल्यानंतर तिच्या डोळ्याखाली असह्य वेदना सुरु झाल्या. डोळ्याला सूज आली व एका बाजूची त्वचा लाल झाली. तापही आला. तिला रुग्णालयात दाखल केल्यानंतर मेंदूमध्ये गंभीर इन्फेक्शन झाल्याचं समोर आलं आहे. यांगची स्थिती आता नाजूक असून तिच्यावर उपचार सुरु आहेत.