हिंदू धर्मात नारळाचे खूप महत्व आहे. कोणत्याही शुभ कार्याच्या आधी नारळ फोडलं जाते. नारळ पूजा पाठ सोबतच खाण्यापिण्यासाठी देखील वापरले जाते. नारळ हे फक्त धार्मिक नसून त्यात अनेक आरोग्यासाठी गुणकारी असणारे गुण देखील आहेत. भारतात स्त्रिया मात्र कधीच नारळ फोडत नाहीत. भारतात स्त्रियांना नारळ फोडणे अशुभ मानले जाते.
स्त्रियांनी नारळ फोडू नये हे तर आपल्याला माहिती आहे पण ते का फोडू नये हे तर आपणास माहिती नसते. भारतात प्रत्येक गोष्टीमागे काही ना काही धार्मिक कारण असते. भारतात फार पूर्वीपासून रूढी परंपरा चालत आलेल्या आहेत. अशीच स्त्रियांना नारळ न फोडू देणे देखील एक परंपरा आहे. जाणून घेऊया कारण.
शाश्त्रानुसार नारळ हे फक्त एक फळ नसून ते एक बीज आहे. ज्याला प्रजनन क्षमतेसोबत जोडून बघितले जाते. त्यामुळे असे मानले जाते कि स्त्री हि देखील एका बीजाच्या रूपात जन्म देते, तर मग ती स्त्री एका बीजाला कस फोडू शकेल. असे मानले जाते कि स्त्रियांनी नारळ फोडले तर तिची प्रजनन क्षमता कमी होते व संततीवर देखील दुःखाचा डोंगर कोसळतो.
याच कारणांमुळे स्त्रियांना नारळ फोडणे अशुभ मानले जाते. नेहमी पुरुषच नारळ फोडतात.शास्त्रानुसार नारळ हा असे फळ आहे जे स्वतः भगवान विष्णूने लक्ष्मी मातेला दिले होते. त्यामुळे या फळावर फक्त लक्ष्मी मातेचा अधिकार आहे. त्यामुळे इतर महिला नारळ फोडू शकत नाही. असे मानले जाते कि जेव्हा भगवान विष्णू पृथ्वीवर आले होते तेव्हा ते फक्त ३ गोष्टी घेऊन आले होते.
या ३ गोष्टी होत्या माता लक्ष्मी, कामधेनू आणि नारळ. भगवान विष्णू नाराज होऊ नये म्हणून देखील स्त्रियांना नारळ फोडू दिले जात नाही. नारळाला आपण नेहमी श्रीफळ म्हणतो. नारळ हे विष्णू आणि लक्ष्मीचं फळ आहे. ज्यामध्ये ब्रम्ह, विष्णू आणि महेश हे त्रिदेव विराजमान आहेत. याच मुले नारळाला श्रीफळ म्हंटले जाते.