सनराइजर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध कोलकाता नाइट राइडर्स (KKR) या काल झालेल्या सामन्यात KKR ने SRH चा १० धावांनी पराभव केला. या सामन्याचा हिरो ठरला कोलकाताचा सलामीवीर फलंदाज नितीश राणा. नितीश राणाने या सामन्यात ५६ चेंडूत ८० धावांची धडाकेबाज खेळी केली. यामध्ये त्याने ९ चौके आणि ४ छक्के मारले. या खेळीच्या बळावर कोलकाताने १८७ रन बनवले. नितीश राणा हा २०१८ पासून KKR कडून खेळत आहे. जाणून घेऊया त्याच्या आयुष्याबद्दल.
नितीश राणाचा जन्म हा २७ डिसेंबर १९९३ रोजी दिल्लीमध्ये झाला. त्याच्या कुटुंबात आई वडील, बहीण आणि पत्नीचा समावेश आहे. लहांपणीपासूनच क्रिकेटची आवड असलेल्या नितीशने दिल्लीच्या रणजी टीममध्ये चांगली कामगिरी करून भारतीय संघाचे दरवाजे देखील ठोठावले आहेत. २०१५ मध्ये त्याने रणजी खेळायला सुरुवात केली होती. तेव्हापासून त्याने खूप चांगली कामगिरी केली आहे.
नितीशला २०१५ मध्ये मुंबई इंडियन्सने खरेदी केले होते. मुंबईकडून त्याने चांगलं प्रदर्शन केलं होतं पण २०१८ च्या सिजनमध्ये त्याला KKR ने खरेदी केलं. २०१९ मध्ये नितीश राणासह अन्य काही खेळाडूंवर वय वाढवल्यामुळे केस देखील झाली होती. माजी क्रिकेटर कीर्ती आजाद यांनी हे प्रकरण समोर आणलं होतं. नितीश आज KKR कडून जबरदस्त कामगिरी करत आहे. नितीशची लव्हस्टोरी देखील खूप खास आहे.
फुटबॉल खेळताना झालं होतं प्रेम-
कालच्या सामन्यात नितीश राणाने अर्धशतक पूर्ण केल्यानंतर एक वेगळं सेलिब्रेशन केलं होतं. यामध्ये त्याने आपल्या बोटातील रिंग दाखवली होती. त्याने हि खेळी पत्नीला समर्पित केली होती. नितीश चं सांची मारवाह सोबत लग्न झालेलं आहे. २०१९ मध्ये नितीशने सांची सोबत लग्न केलं होतं. सांची दिसायला एखाद्या बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाहीये. ती पेशाने इंटेरिअर डिझायनर आहे. सांची आणि नितीशचे सुरुवातीला विचार खूप वेगवेगळे होते. दोघांची लाइफस्टाइल देखील खूप वेगळी होती.
सांची आणि नितीशने एकमेकांना लग्नापूर्वी ३ वर्ष डेट केलं आहे. सांची नितीशचा मित्र परमवीर ची बहीण आहे. परमवीर आणि नितीश सोबत फुटबॉल खेळायचे. क्रिकेट खेळून झाल्यावर नितीश नेहमी मित्रांसोबत फुटबॉल खेळत असे. सांची देखील मैदानावर फिरायला यायची. तेव्हा नितीशला समजलं कि सांची आपल्या मित्राचीच बहीण आहे. त्याला ती आवडली होती. त्याने तिला मेसेज केला. त्यानंतर दोघांची ओळख झाली. चांगले मित्र बनले आणि एकमेकांच्या प्रेमात पडले.
गोविंदाचा जावई आहे नितीश राणा-
नितीश राणा हा अभिनेता गोविंदाचा जावई देखील लागतो. गोविंदाचा भाचा कृष्णा अभिषेक याची सांची हि चुलत बहीण आहे. या नात्याने सांची गोविंदाची भाची लागते. तर नितीश हा गोविंदाचा भाचे जावई आहे.