Sunday , May 28 2023
Breaking News
Home / जीवनशैली / १० वर्षांनी मोठी असलेल्या २ मुलींच्या आईशी लग्न करायला या पठ्ठ्यासारखं मोठं मन लागतं!

१० वर्षांनी मोठी असलेल्या २ मुलींच्या आईशी लग्न करायला या पठ्ठ्यासारखं मोठं मन लागतं!

प्रेम हे कधीही कुठेही कुणावरही होऊ शकतं. याला ना वयाचं बंधन असतं ना दुसरं कोणतं बंधन. आजकाल तर खूप सहज कोणालाही प्रेम होतं. पण प्रेम करताना अनेकदा समोरची व्यक्ती कशी आहे हे बघणारे खूप जण असतात. आपल्या जोडीदाराचं सर्वकाही चांगलं असावं अशी इच्छा असते. पण असेही काही प्रेमी असतात जे स्वतःपेक्षा जास्त वयाच्या आणि २ मुलांच्या आईच्या प्रेमात पडतात आणि लग्नही करतात. घटस्फो ट झालेल्या २ मुलांच्या आईशी लग्न करायला खूप मोठं मन लागतं.

असंच मोठं मन आहे आपल्या भारतीय संघाचा धडाकेबाज फलंदाज शिखर धवनचं. शिखर धवनने हे मोठ्या मनाचे काम केले आहे. आजकालच्या तरुणांना अशी मुलगी आवडते जिचा आधी कोणी बॉयफ्रेंड नसेल. पण शिखर धवनला अशी मुलगी आवडली जिचं आधीच लग्न झालेलं होतं आणि ती २ मुलींची आई देखील होती. शिखर या महिलेच्या फक्त प्रेमातच पडला नाही तर दोघांनी लग्न देखील केलं.

शिखर धवनने मूळची भारतीय असणारी आणि ऑस्ट्रेलिया मध्ये राहणारी आयशा मुखर्जी सोबत लग्न केलं. आयशा हि मूळची बंगालची आहे. ती लहानपणीपासून ऑस्ट्रेलिया मध्ये राहते. तिचा जन्म भारतातच झाला होता. आयशा मुखर्जी हि खेळांमध्ये देखील बालपणीपासून पुढे राहीली आहे. रिंग बॉक्सिंग, टेनिस आणि क्रिकेटमध्ये तिला विशेष आवड होती.

आयशाला क्रिकेटची असलेली आवड शिखर अन तीच्या भेटीचं कारण ठरलं. आयशा हि भारताचा माजी गोलंदाज हरभजन सिंगची फेसबुक फ्रेंड होती. शेखरने तिला फेसबुकवरच पहिल्यांदा बघितलं. त्याला ती पहिल्याच नजरेत आवडली आणि त्याने तिला रिक्वेस्ट पाठवली. दोघे आधी फेसबुकला एकमेकांचे मित्र बनले. दोघांची भेट झाली. आणि तिथूनच त्यांच्या प्रेमकहाणीला सुरुवात झाली.

शिखर धवनला तिने सुरुवातीलाच सांगितलं कि तीचा घटस्फो ट झालेला असून तिला २ मुली देखील आहेत. पण शिखरने तरीही काही अडचण नसल्याचे तिला सांगितले आणि त्यांची लव्हस्टोरी बहरत गेली. शिखरने २०१२ मध्ये आयशा सोबत लग्न केलं. आयशा मेलबर्न मध्ये राहायची. शिखर हा आयशा पेक्षा १० वर्षांनी छोटा आहे.

दोघांनी २००९ मधेच एंगेजमेंट केली होती. पण लग्नासाठी शिखरने थोडा वेळ मागितला. त्याला आपल्या क्रिकेट करिअरकडे लक्ष द्यायचं होतं. २०१२ मध्ये दोघांनी लग्न केलं. आयशाचं हे दुसरं तर शिखरचं पहिलं लग्न होतं. शिखराच्या आधी आयशाने ऑस्ट्रेलियातील एका उद्योजकांशी लग्न केलं होतं. पण दोघांचं नातं जास्त काळ टिकलं नाही.

आयशा आणि तिच्या पहिल्या पतीच्या २ मुली आहेत. रेया आणि आलिया या २१ आणि १७ वर्षाच्या झाल्या आहेत. तर शिखर आणि आयशाला एक मुलगा असून त्याच नाव जोरावर आहे. शिखर आपल्या मुलींना देखील मुलासारखा जीव लावतो. शिखर हा या मुली आपल्या आयुष्यात आल्याने स्वतःला खूप नशीबवान समजतो. शिखरच्या या मनाच्या मोठेपणाचे तेव्हा खूप कौतुक झाले होते.

About Mamun

Check Also

आईच्या मृत्यूमुळे आतून तुटलेली अकाउंटंटची मुलगी दुसऱ्या प्रयत्नात टॉपर येत बनली IAS !

यश श्रीमंत किंवा गरीब किंवा लहान, मोठे पाहत नाही, जो योग्य दिशेने कठोर परिश्रम करतो, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *