बाॅलीवुड मध्ये जेवढे सिनेमे येतात त्या पेक्षा जास्त बाॅलीवुड मधील स्टारच्या आयुष्यात वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात. काहींचं आयुष्य चढउत्तरांचे तर काहींचे सरळ असते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत जॅकी दादा म्हणजेच जॅकी श्रॉफ यांची प्रेम कहाणी. जॅकी श्नाफ यांचा सिनेमा राम लखनला रिलीज होऊन ३२ वर्ष पूर्ण झालेत. हा सिनेमा १९८९ साली रिलीज झाला होता.सुभाष घई यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. हा सिनेमा त्या काळात खुप हिट ठरला होता. सिनेमा त्यामधील गाण्यांमुळे जास्त हिट झाला होता. सिनेमातील माय नेम इज लखन हे गाणं ऐकलं कि आजही अनेक जण झूलतात.
राम लखन मध्ये अनिल कपूर, जॅकी श्नाॅफ, माधुरी दीक्षित, डिंपल कपाडिया, राखी, अनुपम खेर हे कलाकार मुख्य भूमिका मध्ये होते. हा सिनेमा सुरू होण्यापूर्वी जॅकी श्रॉफने आपल्या गर्लफ्रेंड म्हणजे आयशा सोबत लग्न केले. दोघांनी लव मॅरेज केले होते. या दोघांची लव स्टोरी पण फिल्मी आहे.
१३ वर्षाच्या मुलीवर जॅकी श्रॉफ याना झालं होतं प्रेम-
जॅकी श्नाॅफ यांनी आयशाला बघताच प्रेमात पडले होते. त्या वेळी ते आणखी कोणा सोबत तरी रिलेशन मध्ये होते. दोघांची लव स्टोरी पुर्ण पणे फिल्मी आहे. जॅकी आणि आयशा यांची भेट अचानक झाली होती. त्यानंतर ते एकमेकांच्या जवळ येत गेले. तिथून पुढे त्यांच्या प्रेम कहाणीला सुरुवात झाली.
जॅकी एका दिवशी रस्त्यात बस ची वाट बघत उभा होते. त्या दरम्यान त्यांना १३ वर्षाची मुलगी शाळेच्या युनिफॉर्म मध्ये तिथे येताना दिसली. जॅकी त्या मुलीला बघताच प्रेमात पडले. त्या मुलीचे नाव पण आयशा होते. आयशा ला बघताच जॅकी तिच्या जवळ गेले आणि तिला तिचे नाव विचारले आणि म्हणाले ते एका रेकॉर्डिंग स्टोर कडे जात आहेत. तु माझ्या सोबत येशील का.
तिथूनच दोघांची मैञी वाढत गेली. दोघांचा भेटायाची सुरुवात इथ पासुन सुरू झाली आणि दोघेही खुप लवकर एकमेकांच्या प्रेमात पडले. पण त्यांच्या नात्यात एक अडचण होती. ती म्हणजे जॅकी ची एक गर्लफ्रेंड होती आणि ती अमेरिकेला गेलेली होती आणि ती भारतात आल्या नंतर ते दोघे लग्न करणार होते.
त्या नंतर आयशाला काहि सुचत नव्हते मी काय करू. तिने ठरवले की जॅकी च्या त्या गर्लफ्रेंडला सरळ पञ लिहायचे आणि सगळ काही खरं सांगायचं. त्यांनी पत्र लिहून सगळं सांगून टाकलं. पत्रात लिहीले कि आम्ही दोघेही एकमेकांवर खुप प्रेम करतोत आणि लवकरच लग्न करनार आहोत.
त्या काळात जॅकी चाळित राहत होते आणि आयशा राॅयल फॅमिली मधून होती. आयशा च्या आईला हे लग्न मान्य नव्हते कारत त्या काळात जॅकी खुप गरीब होते. शेवटी ५ जुन १९८७ मध्ये लग्न केले आणि दोघे पविञ बंधनात बांधले गेले. आज दोघांना दोन मुले आहेत, टायगर श्नाॅफ , कृष्णा श्नाॅफ. आयशा आल्या मुळे जॅकी श्रॉफ यांचे पुर्ण आयृष्य बदलुन गेले. त्यांच्या बोलण्या पासुन ते राहण्या पर्यत सर्व काही बदलुन गेले. पुढे बॉलिवूड मध्ये देखील ते यशाच्या शिखरावर पोहचले.